शिवजयंती विशेष - कोणी विचार तरी केला असेल का बरं?

शिवजयंती विशेष - कोणी विचार तरी केला असेल का बरं?

कसा होता बरं 18 फेब्रुवारी 1630चा तो दिवस? कोणाला वाटलं असेल का की, एका नवीन पर्वाला उद्यापासून सुरवात होणार आहे?

  • Share this:

मुस्तान मिर्झा, 19 फेब्रुवारी : कसा होता बरं 18 फेब्रुवारी 1630चा तो दिवस? कोणाला वाटलं असेल का की, एका नवीन पर्वाला उद्यापासून सुरवात होणार आहे? उद्या एका वादळाची सुरवात होईल ज्या वादळाच्या कचाट्यात येऊन मुघल सल्तनंत उध्वस्त होईल. असा कोणी विचार तरी केला असेल का?

19 फेब्रुवारीच्या त्या पूर्वसंध्येचा चंद्र आणि त्यादिवशीचा सूर्य उगवताना एक वेगळाच प्रकाश देत असेल. आणि सांगण्याचा प्रयत्न करत असेल की, आज त्या योद्धाचा जन्म होणार आहे. ज्याची शौर्यगाथा भविष्यात हजारो वर्षे सांगितलं जाईल. ज्याचा जन्मदिवस एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा केला जाईल. ज्याच्या तलवारीची धास्ती घेऊन शत्रूंची पळताभुई होईल. सूर्य म्हणत असेल की, मी सर्वांना ऊर्जा देण्याच काम करतो, पण त्याच्या येण्यानं मला ऊर्जा मिळणार आहे. त्या पहाटे पक्ष्याचा किलबिलाट सांगत असेल की, त्यांना राजाच्या येण्याची चाहूल लागली आहे. सिंह वाघाला सांगत असेल मी तर फक्त जंगलाचा राजा आहे, पण आज जगाच्या राजाचा जन्म होणार आहे.

आणि तो ऐतिहासिक क्षण आला असेल ज्यावेळेस जिजाऊ नावाच्या वाघिणीने 'शि' 'वा' 'जी' नामक वाघाला जन्म दिला.

ज्यावेळेस बालशिवबाला अंघोळ घातली जात असेल त्यावेळी कोणी विचार केला असेल का की, या बाळाचा पुढे मोठ्या थाटात राज्यभिषेक होईल.

कोणाला वाटलं असेल का? की हे चिमुकले हाथ मोठे होऊन अफजलखाना सारख्या महाधिप्पाड प्राण्यांचा कोथळा काढतील.

कुणाला भनक तरी लागली असेल का? की हा बालशिवबा दिन दलित, बहूजन, अठरापगड जातीच्या लोकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात तलवार उठवून स्वराज्याची स्थापना करेल.

हे सर्व विचार करून अंगावर शहारे येतायेत. आणि ओढ लागते त्या ऐतिहासिक दिनाची म्हणजे 19 फेब्रुवारीची. शिवरायांच्या या धाडसी कार्याला स्मरुन त्यांच्या मानाचा मुजरा...! जय जिजाऊ, जय शिवराय

First published: February 19, 2018, 10:37 AM IST

ताज्या बातम्या