S M L

GST आणि MRP चा नेमका घोळ काय ?

जीएसटी लागू झाला खरा पण अजूनही सर्वसामान्यांच्या जेवणात लागणाऱ्या काही वस्तूंच्या MRP मध्येच दुकानदारांना 50 ते 70 टक्के नफा घेण्याची मुभा पाहायला मिळतेय.

Sachin Salve | Updated On: Aug 11, 2017 06:04 PM IST

GST आणि MRP चा नेमका घोळ काय ?

दिनेश केळुसकर, सिंधुदुर्ग

जीएसटी लागू झाला खरा पण अजूनही सर्वसामान्यांच्या जेवणात लागणाऱ्या काही वस्तूंच्या MRP मध्येच दुकानदारांना 50 ते 70 टक्के नफा घेण्याची मुभा पाहायला मिळतेय. स्पर्धा असल्यामुळे  दुकानदार छापील किमतीपेक्षा कमी विकत असले तरी काही वस्तूंच्या पॅकिंगवर नवीन  एमआरपीचे स्टिकर्स लावले गेले नसल्यामुळे ग्रामीण भागातल्या ग्राहकांना याचा जबर भुर्दंड सोसावा लागू शकतो. खाद्य तेलांच्या किमतींचा आम्ही रत्नागिरीच्या बाजारपेठेतून आढावा घेतला तेव्हा हीच गोष्ट आमच्या निदर्शनास आलीये.

उदाहरणार्थ, सनरिच तेलाच पॅकिंग जे एक लिटरचं रत्नागिरीच्या बाजारात विकलं जातं जे जुलै 2017 चं पॅकिंग आहे, त्याची MRP आहे 120 रुपये. आणि दुकानदार विकतात 80 रुपयाला. त्यात त्याना दोन चार रुपयाचा नक्कीच फायदा मिळतो. तेच रुची गोल्ड या तेलाच्या बाबतीत. रुची गोल्डच्या एक लिटरच्या पॅकिंगची MRP आहे 90 रुपये आणि दुकानदार विकतात 63 रुपयाला. जेमिनी तेलाच्या बाबतीतही तेच. जेमिनीच्या एक लिटरच्या पॅकिंगची MRP 120 आणि विकतात 90 रुपयाला. या सगळ्या व्यापाऱ्यांना आम्ही विचारलं की, एवढा कमी किमतीत विकण्याची गरज काय ? आणि तुम्हाला फायदा काय ? त्यावर त्यांचं उत्तर असं होतं की, "बाजारात खूप कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे कमी नफा घेऊन आम्ही तेल विकतो."पाहिलंत ?, 120 रुपये छापील किमतीचं तेल 90 रुपयाने विकूनही दुकानदाराला फायदा होतोय. GST च्या नियमाप्रमाणे GST पूर्वी पॅकिंग झालेल्या वस्तू नव्या MRP चे स्टीकर लावून 30 सप्टेंबपर्यंत विकण्याची परवानगी आहे. मग प्रश्न पडतो तो हा की जुलै मध्ये पॅकिंग झालेल्या खाद्यतेलासारख्या अत्यंत गरजेच्या वस्तूची MRP एवढी जास्त का ठेवली जातेय. शहरात एकमेकांच्या स्पर्धेमुळे कमी फायदा घेऊन दुकानदार तेल विकत असले तरी ग्रामीण भागातला एखादा एकमेव दुकानदार हेच तेल MRP ने विकू शकतो ना !

म्हणूनच सर्वसामान्य विचारतायत 'वन नेशन वन टॅक्स' चा फायदा कधी मिळणार ? जान्हवी जाधव ही शिलाई करून घर चालवणारी महिला म्हणते की, "तेल खरेदी करायला गेलं की त्यात फरक असा असतो की कधी कधी 30 रुपयाचा फरक असतो, 20 रुपयाचा फरक असतो. मग ते दुकानदार कसे.. बाहेर गावात त्याच किमतीने विकू शकतात. आम्ही इथल्या इथे रत्नागिरीत घेतो. बाहेर थोड्या अंतरावर गेलो की दहा रुपये वाढतात. प्रत्येक पिशवीवर घेतात ते. मग आम्हाला GST लागू झाला त्याचा फायदा काय?"

प्रश्न हाच आहे की MRP मध्ये तब्बल 50 ते 70 टक्के नफा कमवायची मुभा का ठेवली जातेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 11, 2017 06:04 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close