शेतकरी संपाचा हाबाडा...

शेतकरी संपाचा हाबाडा...

शेतकऱ्यांच्या संपावर अनेक विधानं राजकीय नेते करीत आहेत...त्यामुळं शेतकरी बिथरण्याची शक्यता आहे...शेतकऱ्यांच्या संपला चेहरा नाही..नेता नाही..प्रत्येक शेतकरी आंदोलनकर्ता आहे...त्यामुळं भीती जास्त आहे...गावोगावी संघर्ष पेटला तर पोलीस तरी कुठं कुठं पुरतील? शेतकरी संपाचा वणवा पेटण्याआधीच शांत होणं गरजेच आहे...

  • Share this:

- सिद्धार्थ गोदाम, आैरंगाबाद ब्युरो चीफ, आयबीएन लोकमत

भारताच्या आदर्श लोकशाहीनं आपल्याला नागरिक म्हणून संपाचा अधिकार दिलाय... आपण आतापर्यंत केवळ  कामगार संप करताना बघत आलोय...आता शेतकरी संप करतोय हे आपल्याला थोडे वेगळं वाटत असेल...कारण  शेतकरी संप करेल याबद्दल आपल्या मनात कल्पनाही आजपर्यंत नव्हती...कारण शेतकरी सहनशील आहे...  आपला अन्नदाता आहे...जगाचा पोशिंदा आहे...शेतकरी दिलदार बळीराजा...अशा मोठमोठ्या उपाध्या आपण  शेतक-यांना दिल्यात...त्यामुळं शेतकरी कधी अडचणीत सापडला हे सरकार आणि प्रशासनाला कळायला उशीर  झाला...तोपर्यंत शेतकरी देशोधडीला लागला...लाखो शेतकऱ्यांच्या तोपर्यंत आत्महत्याही झाल्या...शेतकरी  अडचणींचा बेशरम राजकारण्यांनी केवळ आपल्या फायद्यासाठीच वापर केला...जो कोणता पक्ष विरोधात राहिला  तोपर्यंत आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी त्यानं शेतकऱ्यांसाठी तोंडफाटेपर्यंत आवाज केला...तोच विरोधी पक्ष सत्तेत आला की त्यानं शेतकऱ्यांना वाऱ्यांवर सोडलं आणि शेतकरी समस्यांना बगल दिली...हे गेल्या अनेक दशकांपर्यंत चालू राहील आजही तसंच आहे...

शेतकरी विरोधी पक्षाला आपल्या हक्काचा हुकमी एक्काच  वाटतो..तोच पक्ष सत्तेत आला की शेतकरी त्याला अडचणीचा वाटायला लागतो...हा आजपर्यंतचा इतिहास  आहे...मुजोर नेत्यांनी शेतकऱ्यांची हवी तशी मानहाणी केली कधी कधी त्याला शिव्याही घातल्यात..तरी शेतकरी  शांत कारण तो सहनशील आहे आपला पोशिंदा आहे...आता याच सहनशील पोशिंद्यानं आपला हाबाडा दाखवायची तयारी केली... शेतकऱ्यांचा संप हा गेल्या अनेक दशकांपासून जमिनीखाली खदखदत असलेल्या  लाव्ह्यासारखा आहे...वेळेआधीच शेतकऱ्यांना न्याय नाही मिळाला तर हा लाव्हारूपी शेतकऱ्यांचा संप आपल्या  सगळ्यांच्या जगण्याची समस्या निर्माण करू शकतो...कारण आपण पैसे खाऊन जगू शकत नाही..

शेतकरी संप हे कुणाचं पाप?

खऱ्या अर्थानं शेतकरी संप हे राजकारण्यांचं, कृषी धोरणांचं पापच आहे...शेतकऱ्यांना हमीभाव हा शेतकऱ्यांच्या  सर्व समस्यांचं मूळ कारण आहे...शेतकी मालाला खर्च्याएवढा सुद्धा भाव मिळत नाही...त्यामुळं शेतकऱ्यांसाठी  शेती म्हणजे "घर जाळून कोळशाचा धंदा" करण्यासारखेच आहे...शेतकऱ्यांसाठी राजकारण्यांची कर्जमाफीची  मागणी म्हणजे रोग वेगळा आणि उपचार वेगळा अशीच आहे...शेतकऱ्यांची एकदा कर्जमाफी झाली मात्र शेतकरी  पुन्हा कर्जबाजारी झालाच..त्यामुळं कर्जमाफीवरून राजकीय पक्ष केवळ आपली राजकीय पोळी भाजून  घेतायेत..शेतकऱ्यांना हमीभाव दिला तर शेतकरी कर्जाचे पैसे बॅंकेच्या तोंडावर मारेल...आणि सरकार समोरही  कर्जमाफीसाठी हात पसरणार नाही..

अराजकतेची भीती...!

शेतकरी संपाचा फटका तसा शहरी भागांना बसणारच आहे तसाच तो शेतकऱ्यांनाही बसणार आहे...शहरी  भागाचं जीवनच ग्रामीण भागातून येणाऱ्या रसदीवर अवलंबून आहे..शेतकऱ्यांनी फळ...अन्नधान्य...भाज्या आणि  दूध रोखलं तर शहरी भागात शेतकऱ्यांविषयी कारण नसताना राग निर्माण होऊ शकतो...आणि शहरी विरूद्ध  ग्रामीण असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे...शेतकऱ्यांसाठीही हा संप अडचणीचा ठरू शकतो...सध्या  पेरणीचा हंगाम आहे दूध..फळ..भाज्या..अन्नधान्याच्या विक्रीतून शेतकऱ्यांना रोजच्या रोज हातात पैसा  येतो..त्यातूनच अनेक शेतकरी पेरणीची कामं करतात...आता पैसा शेतक-याच्या हातात आला नाही तर पेरणीची  समस्या निर्माण होईल..त्याचा परिणाम अन्नधान्याचा तुटवडा पुढील काळात होईल...

शेतकऱ्यांना डिवचू नका...

शेतकऱ्यांच्या संपावर अनेक विधानं राजकीय नेते करीत आहेत...त्यामुळं शेतकरी बिथरण्याची शक्यता  आहे...शेतकऱ्यांच्या संपला चेहरा नाही..नेता नाही..प्रत्येक शेतकरी आंदोलनकर्ता आहे...त्यामुळं भीती जास्त आहे...गावोगावी संघर्ष पेटला तर पोलीस तरी कुठं कुठं पुरतील? शेतकरी संपाचा वणवा पेटण्याआधीच शांत  होणं गरजेच आहे...शेतकऱ्यांचा सन्मान महत्वाचा आहे..शेतकऱ्यानं शेतमालाला भाव मागितला तर शिवी मिळते,  पाणी मागितलं तर लघवीची भाषा ऐकावी लागते..शेतकऱ्यानं जाब विचारला तर सभेतून हाकलून दिलं  जातं..हक्काच्या हमीभावाची भीक मागावी लागते..शेतकी अनुदान मागितलं तर लाठ्याकाठ्या आणि गोळ्या  मारल्या जातात...तरी शेतकरी राजा सहनशीलच राहावा ही अपेक्षा चुकीचीच आहे...शेतकऱ्याच्या संपाचा हाबाडा आवश्यकच आहे... मात्र दूध, फळं आणि भाज्यांची नासाडी नको...शेवटी हे सुद्धा शेतकऱ्यांच्या मेहनतीचं फळ  आहे... स्वत:च्या मेहनतीचा स्वत:च्याच हातानं अपमान नको...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 1, 2017 08:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading