मराठी बातम्या /बातम्या /ब्लॉग स्पेस /रणांगण कर्नाटकचं : ३ दशकांचा इतिहास बदलणार का ?

रणांगण कर्नाटकचं : ३ दशकांचा इतिहास बदलणार का ?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच तापायला लागलाय. १५ मे ला काॅंग्रेस पुन्हा सत्तेत येणार की दक्षिण भारतात पुन्हा एकदा कमळ फुलणार याचं उत्तर मिळणार आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच तापायला लागलाय. १५ मे ला काॅंग्रेस पुन्हा सत्तेत येणार की दक्षिण भारतात पुन्हा एकदा कमळ फुलणार याचं उत्तर मिळणार आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच तापायला लागलाय. १५ मे ला काॅंग्रेस पुन्हा सत्तेत येणार की दक्षिण भारतात पुन्हा एकदा कमळ फुलणार याचं उत्तर मिळणार आहे.

  विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी, न्यूज18लोकमत

  कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच तापायला लागलाय. १५ मे ला काॅंग्रेस पुन्हा सत्तेत येणार की दक्षिण भारतात पुन्हा एकदा कमळ फुलणार याचं उत्तर मिळणार आहे. तसंच स्वत:चं अस्तित्व टिकवून ठेवायची जेडीएसची धडपड किती सफल होणार याचाही फैसला तेव्हाच लागेल.

  गुजरातच्या निवडणुकीनंतर कर्नाटकाकडे सगळ्या देशाचं लक्ष असणार याची पुरेपूर राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना होती. त्यामुळे त्यांनी गेल्या वर्षाभरापूर्वीच निवडणुकीची तयारी सुरु केली आणि विरोधकांना बॅकफूटवर टाकलं.

  कर्नाटकातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षानं विद्यमान प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा यांच्यावर पूर्णपणे भिस्त ठेवली होती. पण येडीयुराप्पा यांच्या प्रभावहीन प्रचारामुळे पक्षानं पुन्हा एकदा पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे निवडणुकीची धुरा सोपवण्याची तयारी सुरू केलीय. येडीयुराप्पा यांचा प्रभाव पडत नसल्यामुळे भाजपची हवा तयार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय दुसरा कोणीही तारणहार नाही असं हे एव्हाना पक्षाच्या राज्यातील नेत्यांच्या लक्षात आलंय.

  या निवडणुकीतील तिसरा कोन म्हणजे जनता दल (धर्मनिरपेक्ष). या पक्षाची खरी तर अस्तित्वाचीच लढाई आहे असं म्हणायला हवी. भाजप आणि काॅंग्रेसला विरोध आणि बहुजन समाजवादी पार्टीला जवळ करत त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली तरच आपल्याला फायदा आहे असं या पक्षाला वाटतं. गेल्या ११ वर्षांपासून सत्तेबाहेर असलेल्या जेडीएसला निवडणुकीच यश मिळालं नाही तर पक्षाच्या अस्तित्वालाच धोका आहे याची पुरेपूर जाणीव पक्षाचे अध्यक्ष एच डी देवेगौडा आणि पक्षाचे राज्यप्रमुख एच डी कुमारस्वामी यांना आहे.

  २००८ साली जेडीएसनं केलेल्या दगाफटक्याच्या मुद्यावर भाजप सत्तेवर आलं तर २०१३ साली भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावर काॅंग्रेसनं सत्ता मिळवली. या सगळ्या पार्श्वभूमीवर सिद्धारामय्या आपल्या सरकारनं पाच वर्षात विकास केल्याचा दावा करतायंत. त्यासोबतच लिंगायत समाजाला वेगळ्या धर्माचा दर्जा, राज्याचा स्वत:चा ध्वज, राज्यात कन्नडिगांना प्राधान्य देत अस्मितेचं राजकारण, उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत अशा पारंपरिक वादाचा जोड देत ते निवडणूक लढवतायत. निवडणूक घोषित होण्यापूर्वी झालेल्या सर्वेक्षणांत सत्ताविरोधी लाट फारशी नसल्याचं म्हणण्यात आलंय. सिद्धारामय्या यांच्या पाॅप्युलिस्ट योजना, त्याप्रमाणे त्यांनी ओबीसी, अल्पसंख्यांक, दलित हा आपला मतदार आपल्या सोबत ठेवलाय असं चित्र तयार केलंय. तसंच दुस-या बाजूनं हिंदूंच्या सोबत आहोत हेही ठळकपणे दिसावं यासाठी अनेक मठ आणि मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेणंही चुकवले नाहीये.

  आत्तापर्यंतचं राज्यातले राजकारण पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिद्धरामय्या हे तिथल्या निवडणुकीचा अजेंडा सेट करतायत आणि अजून तरी भाजप गोंधळलेल्या अवस्थेत आहे. येडीयुराप्पांकडे आत्ता तरी काॅंग्रेसविरोधात आश्वासक उत्तर नाहीये. त्यामुळे पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणुकीच्या प्रचाराची धुरा वाहावी लागणार हे निश्चित आहे. त्यामुळे येडीयुराप्पा विरुध्द सिद्धरामय्या असा सामना होण्याऐवजी सिद्धरामय्या विरुद्ध मोदी असा सामना होणार अशीच चिन्हं दिसतायत.

  या निवडणुकीत आपण जर तग धरून ठेवू शकलो नाही तर आपल्या राजकीय अस्तित्त्वालाच नख लागेल याची पूर्ण जाणीव जेडीएसच्या नेत्यांना आहे. निवडणुकीनंतर त्रिशंकू विधानसभा आल्यास आपला फायदा होईल असा जेडीएसचा विचार आहे. त्यामुळेच त्यांनी बहुजन समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसशी युती करत १२६ उमेदवरांची यादीच घोषित केली आहे. राहुल गांधी आणि सिद्धरामय्या या दोघांनीही जेडीएस भाजपची ‘बी’ टीम म्हणत खिल्ली उडवत टीका केली आहे.

  सिद्धरामय्या यांचे गुरू असलेल्या रामकृष्ण हेगडे यांनी १९८५ सलग दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली होती. १९८९ नंतर मात्र गेल्या जवळपास ३० वर्षात सत्ताधारी पुन्हा दुसऱ्यांदा निवडणूक जिंकू शकलेला नाहीये. आता सिद्धरामय्या हे चक्र मोडणार का भाजपला आजवरच्या इतिहासाचा लाभ मिळणार हे १५ मे ला स्पष्ट होईल.

  First published:

  Tags: Jds, Karnatak election, Siddharamayya, Yediyurppa