ही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती!

ही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती!

ती गेली... मुक्त झाली... असं वाटत असेल तर ते खोटं आहे... माणसांचा नराधमपणा इथेच थांबत नाही. कठुआतला रानटीपणा वाचून डोकं बधीर झालंय. वाटतंय उठावं आणि घालाव्यात गोळ्या नराधमांना.

  • Share this:

विलास बडे, प्रतिनिधी, न्यूज18 लोकमत

राञीचे दोन वाजलेत पण झोप लागत नाहीय. संताप, चीड, अस्वस्थता ज्वालामुखीसारखी आत खदखदतीय. तिला बाहेर काढण्यासाठी म्हणून बदडत बसलोय बेराञी किबोर्डची बटणं. कठुआतला रानटीपणा वाचून डोकं बधीर झालंय. वाटतंय उठावं आणि घालाव्यात गोळ्या नराधमांना.

8 वर्षाचं कोवळं लेकरू. तिचं अपहरण केलं जातं, बलात्कार केला जातो, पुन्हा पुन्हा तिच्या शरीराचे लचके तोडले जातात... नशेचं इंजक्शन टोचलं जातं, ती बधीर होते...तरीही नराधम तिला भोगत राहातात. तिच्या डोक्यात दगड घालून ठेचलं जातं. शरीर रक्तानं माखलं. शरीररातून प्राण गेला, तरी निष्प्राण देहावरही लिंगपिसाट कुञे तुटून पडले.

लचके तोडत राहिले. त्या हिंस्र राक्षसांच्या टोळीत वर्दीतलाही नराधम होता. हे जिथं घडलं ते मंदीर होतं. त्या चिमुरडीच्या किंकाळ्यांनी गाभाऱ्यातला देवही थिजला असेल. हे सगळं लिहितानाही हात कापताहेत, त्या नराधमांना काहीच वाटलं नसेल का? त्या नरक यातना सहन करताना त्या इवल्याशा जीवाला काय वाटलं असेल? या हिंस्र श्वापदांच्या रानटी वस्तीत आपण का राहातोय? असा प्रश्न वारंवार पडतो आहे.

ती गेली... मुक्त झाली... असं वाटत असेल तर ते खोटं आहे... माणसांचा नराधमपणा इथेच थांबत नाही. तिच्या बलात्कार आणि हत्येचं आरोपपत्रं दाखल करायला पोलिस कोर्टात निघाले. दारावर काळ्या डगल्यांनी आडवलं. कथित हिंदुत्ववादी रस्त्यावर उतरले. भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. तिरंगा फडकवत रस्त्यानं जथ्ये नाचू लागले. बलात्काऱ्यांच्या, खुन्यांच्या बाजूनं. कारण ती धर्मानं मुसलमान होती आणि आरोपी हिंदू.

लहानपणी आईच्या मांडीवर झोपून ऐकलेला हा हिंदू धर्म नाही. आरोपींना जात,धर्म,लिंग,वय काहीही नसते. आरोपी हा आरोपीच असतो. अशा घटनांचं चुकूनही समर्थन करणारे हे मानवतेचे पहिले शत्रू आहेत. 8 वर्षाच्या त्या लेकराला कसला आलाय धर्म? हैवानांच्या समर्थनार्थ तिरंगा घेवून नाचवणाऱ्या धर्मांधळ्यांनो, तुमच्या जिंदगीवर थू...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2018 03:41 PM IST

ताज्या बातम्या