विशेष : पेपर विकणारा ते बिल्डर, डीएसके नेमकं कुठे चुकले ?

'घराला घरपण देणारी माणसं' ही त्यांची टॅगलाईन घराघरात पोहोचली होती वाहन उद्योगात डीएसके टोयोटा हा नवा सेवा क्षेत्रातला ब्रँड पुढे आणला. डीएसके हे पुण्याच्या उद्योग जगतातल मोठ नाव झालं. डीएसकेंचा हा प्रवास विस्मयाचकित करणारा होता.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 2, 2017 10:29 PM IST

विशेष : पेपर विकणारा ते बिल्डर, डीएसके नेमकं कुठे चुकले ?

वैभव सोनवणे, पुणे

प्रामाणिकपणा सचोटी हे जेव्हा बिल्डर या शब्दाला जोडले जातात तेव्हा डीएसकेंच अर्थात डीएस कुलकर्णी यांचं नाव चर्चेत यायच पण याच डीएसकेंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. ८ हजार गुंतवणुकदाराच्या ठेवी, त्याच व्याज गेले १५ महिने डीएसके देऊ शकलेले नाहीत. कोण होते डीएसके ..काय झालेत डीएसके?? पाहूयात स्पेशल रिपोर्ट

"मी टेलिफोन पुसून त्यात सेंट भरायचो तिथून इथंपर्यंत आलोय प्रचंड कष्ट घेतलेत - डीएसके कुलकर्णी"

तरूणांना प्रोत्साहनपर भाषणं देताना दिपक सखाराम कुलकर्णी आपली कहाणी कायम सांगायचे. स्वत:च्या कष्टाच्या कहाणीतून तरूणांनी धडा घ्यावा असा त्यांचा आग्रह असायचा...त्यांची कहाणी ही तितकीच विलक्षण होती. अगदी छोटी छोटी काम करत डीएसके हा ब्रँड उभा करायचा त्यांचा प्रवास विलक्षण आहे. आपण चुकीच काम करत नाही, अस सांगत पुण्यातले सर्वात प्रामाणिक विश्वासू बिल्डर अशी प्रतिमा त्यांनी उभी केली.

बांधकाम व्यावसायात त्यांनी सातासमुद्रापार झेप घेतली. 'घराला घरपण देणारी माणसं' ही त्यांची टॅगलाईन घराघरात पोहोचली होती वाहन उद्योगात डीएसके टोयोटा हा नवा सेवा क्षेत्रातला ब्रँड पुढे आणला. डीएसके हे पुण्याच्या उद्योग जगतातल मोठ नाव झालं. डीएसकेंचा हा प्रवास विस्मयाचकित करणारा होता.

Loading...

राजकारणातही अपयशी

डीएसके हे केवळ उद्योगातच रमले नाहीत. समाजकारणात सहभागी होण्यासाठी त्यांनी डीएसके फाऊंडेशन,डीएसके गप्पा असे लोकप्रिय उपक्रम घेतले. २००४ साली थेट राजकारणात यायचा निर्णय त्यांनी घेतला. लोकसभा निवडणुकीत मायावतींच्या सोशल इंजिनियरिंगचा भाग म्हणून त्यांनी बसपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली मात्र त्यांचा पराभव झाला. २००९ मध्ये ही आपकडून निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत असलेले डीएसके निवडणुकीत मात्र दिसलेच नाहीत. पुन्हा एकदा चर्चा झाली ती डीएसके भाजपच्या व्यासपीठावर गेल्यानंतर मात्र राजकारणात डीएसकेंच्या वाट्याला कुठलंच यश आल नाही. अखेर व्यवसायावर पूर्ण लक्ष केंद्रित केलेल्या डीएसकेंनी ड्रीमसिटी हे नव स्वप्न पाहिलं. त्याच काम सुरू केलं, आपली सगळी आर्थिक ताकद त्यांनी या प्रकल्पात झोकून दिली आणि तिथूनच डीएसकेंच्या उद्योगविश्वाला घरघर लागली.

डीएसकेंचं ड्रीम प्रोजेक्ट "ड्रीमसिटी"

८००० ठेवीदारांचे पैसे न दिल्यामुळे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेले दहा महिने डीएसके यांचा औद्योगिक डोलारा कोसळत होता,आर्थिक घडी विस्कटली होती मात्र इतकी वर्ष व्यवसायात लक्षणीय प्रगती करणारे व्यावसायिक म्हणून नावलौकिक होता.

अगदी शून्यातून विश्व निर्माण करणारे प्रामाणिक व्यावसायिक म्हणून पुण्यात डीएसके यांची ओळख होती, रास्ता पेठेतल्या अश्विनी या एका इमारती पासून सुरू झालेला बांधकाम व्यवसायाचा त्यांचा प्रवास अगदी ६ हजार उंबऱ्यांच्या डीएसके विश्व या मॉडर्न गावापर्यंत पोहोचला, अगदी देश परदेशातही त्यांनी घर बांधायचा उद्योग केला. डीएसके टोयोटा,डीएसके ह्योशांग या सारख्या वाहन उद्योगातही डीएसके यांनी भक्कमपणे पाय रोवले होते. अगदी परदेशातही बांधकाम व्यवसायाची पायाभरणी डीएसके यांनी केली होती मग अचानक पाने डीएसके यांच्या विरोधातल्या चेक बाउंस च्या तक्रारींपासून सुरुवात झाली. डीएसके गोत्यात आल्याची चर्चा सुरू झाली. निमित्त ठरलं डीएसकेंचं ड्रीम प्रोजेक्ट "ड्रीमसिटी "

पुण्याच्या मांजरीजवळ अतिभव्य अंतर्गत जलवाहतूक असलेला दहा हजार घरांचा प्रकल्प बांधण्याची तयारी डीएसके यांनी केली होती त्यासाठी जमिनी घेण्यात आल्या प्रत्यक्षात काम सुरू झालं. डीएसके यांनी या प्रोजेक्ट ची ना भूतो ना भविष्य अशी जाहिरात केली. परदेशात असते तशी रहिवासी प्रकल्पात कृत्रिम नदी तयार करण्याचा त्यांचा संकल्प होता त्यासाठी सगळी भांडवली ताकद डीएसकेंनी ड्रीमसिटी मध्ये गुंतवली. दरम्यानच्या काळात झालेल्या नोटबंदीने बांधकाम व्यवसायावर मंदी आली घरांची विक्री होत नव्हती,नवी गुंतवणूक थांबली आणि ज्यांनी ठेवीदार म्हणून पैसे डीएसके कडे विश्वासाने ठेवले होते त्यांचे पैसे ही डीएसके यांनी या प्रकल्पात गुंतवले तरीही परिस्थिती सुधारलीच नाही मग ,डीएसके टोयोटा,ह्योशांग या कंपन्यांची भांडवली गुंतवणूक ही ड्रीमसिटीकडे वळल्याने  उद्योग ही बंद पडले. या सगळ्या आर्थिक धक्क्यांनी  डीएसके यांची भांडवली बाजारातली पतही संपुष्टात आलीये.

420 चा गुन्हा दाखल

आर्थिक अडचणीमुळे अडचणीत आलेल्या डीएसकेंवर ठेवीदारांचे पैसे न दिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलाय. ठेवीदारांचे पैसे परस्पर वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये गुंतवल्यामुळे एमपीआयडीए कायद्यांतर्गत डीएसकेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ज्याद्वारे ठेवीदारांच्या पैशातून खरेदी केलेल्या मालमत्ता गोठवून त्याची विक्री करून ठेवीदारांचे पैसे देण्याची तरतूद होणार आहे त्यामुळे पैसे ठेवीदारांना मिळणार की नाही असा प्रश्न आहे.

ठेवीदारांच्या पैशातून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये भांडवली गुंतवणूक डीएसकेंनी केली होती त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने डीएसके यांचे या वेगवेगळ्या आस्थापना,कार्यालयांवर छापेमारी केलीये. डीएसके यांनी ठेवीदारांचे घेतलेले पैसे परत न केल्यामुळे त्यांच्यावर फसवणुकीच्या ४२० आणि एमपीआयडीए कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे ज्यामध्ये ७ वर्षापर्यंत डीएसकेना शिक्षा होऊ शकते..

कायद्याच्या या कारवाईनंतर तरी ठेवीदारांचे पैसे परत मिळतील का असा प्रश्न आहे. ठेवीदारांचे पैसे परत मिळण्याची प्रक्रिया ही मोठी आहे. अवसायक नेमूण ताब्यात घेतलेल्या मालमत्ता लिलाव करून ठेवीदारांचे पैसे परत देण्याची तरतूद कायद्यांन्वये करण्यात आली आहे त्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया ही मोठी वेळखाऊ आहे. त्यामुळे न्यायालयात केल्या जाणाऱ्या प्रक्रियेत सामायिक करार डीएसके आणि ठेवीदार मिळून करू शकतात ज्यामुळे लवकर हा मुद्दा निकाली निघू शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2017 10:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...