पुणे शहरातील कचऱ्याचं राजकारण

पुणे शहरातील कचऱ्याचं राजकारण

पुणे महानगरपालिकेत ३४ गावांचा समावेश करण्यात यावा असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत. या गावांचा समावेश झाल्यानंतर पुणे पालिका राज्यातील सर्वात मोठी पालिका होईल. सध्या या ३४ गावांत मात्र कचरा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत.

  • Share this:

हलिमा कुरेशी, पुणे

पुणे महानगरपालिकेत ३४ गावांचा समावेश करण्यात यावा असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत. या गावांचा समावेश झाल्यानंतर पुणे पालिका राज्यातील सर्वात मोठी पालिका होईल. सध्या  या ३४ गावांत मात्र कचरा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत. बेसुमार लोकसंख्या वाढल्याने ग्रामपंचायतींची यंत्रणा तोकडी पडतेय.

कचऱ्याचा ढीग ,दुर्गंध ,घाणीचं साम्राज्य हे चित्र आहे खडकवासला, किरकटवाडी ,शिवणे गावांमध्ये सरार्स पाहायला मिळतं. उरुळीदेवाची फुरसुंगी  ग्रामस्थांनी  आंदोलन केल्यामुळे पुणे शहरात २३ दिवसांची कचरा कोंडी झाली होती. शहरात दुर्गंधी आणि बकाल स्वरूप आलं होत. उरुळीदेवाची फुरसुंगी सहित ३४ गावांचा पालिकेत समावेशाची मागणी आहे. पण या ३४ गावात कचराडेपो नसल्याने कचरा रस्त्यांवर ,पाण्यात टाकला जातो. यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होतोय. किरकटवाडी , नांदेड फाटा ,नर्हे आंबेगाव  या गावात दुर्गंधी आणि घाणीचं साम्राज्य  आहे.

खरं तर १९९७ साली  खडकवासला  परिसरातील ९ गावांचा समावेश पालिकेत करण्यात आला होता ,मात्र नंतर ही गावं वगळण्यात आली होती. आत्ता गावांची लोकसंख्या  लाखांच्या  घरात गेल्याने कचरा विल्हेवाट कशी करायची हा यक्ष प्रश्न पालिकांना पडलाय.

१९९७ साली भाजपा शिवसेना सरकारने पुणे पालिकेत २३ गावांच्या समावेशाचा प्रस्ताव मांडला होता. खडकवासला आणि परिसरातील ९ गावांना  पालिकेत समावेश करण्यात आला, नंतर  ती गाव वगळण्यात आली. २० वर्षानंतर ३४ गावांच्या समावेशाचा प्रस्ताव आघाडीच्या काळात ठेवला गेला .

पुणे पालिकेचं सध्याचं क्षेत्रफळ - २४३ चौ. किमी.

३४ गाव समाविष्ट झाल्यानंतर होणारं  क्षेत्रफळ - ४५६ चौ किमी

पीएमआरडीएची स्थापना होऊन २ वर्ष झाली , पीएमआरडीए (पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने )मध्ये ही गावं आली.  मात्र कचरा ,रस्ते ,वाहतूक यासंदर्भात काहीही उपाययोजना झाल्या  नाहीत.पुण्यात कचराप्रक्रिया प्रकल्पाच्या संदर्भात नागरिक आणि विरोधी पक्षांनी लढा उभारला आहे. नुकतंच हडपसर येथील रामटेकडी येथे नियोजित कचराप्रकल्पाला विरोध होतोय.

एकंदरितच कचराप्रक्रिया प्रकल्पावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचं राजकारण पुणे महापालिकेत गेली २५ वर्ष सुरू आहे. त्यामुळे कचराकोंडीतून शहराची मुक्तता कधी होणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2017 08:13 PM IST

ताज्या बातम्या