उपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका!

शेतकऱ्यांचं हे अन्नत्याग आंदोलन आणि आणि केवळ राजकारण करण्यासाठी केलेलं काँग्रेस आणि भाजपनं केलेलं आंदोलन हे शेतकरी आणि राजकारण्यांमधली दरी दाखवून देण्यासाठी पुरेसं आहे. बरं हे उपवास आंदोलन करण्यासाठी लागणार नैतिक बळ आणि ताकद हे आज कुठल्याही राजकीय पक्षांकडे नाही

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2018 11:02 AM IST

उपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका!

गोविंद वाकडे, प्रतिनिधी, न्यूज18 लोकमत

नाव- साहेबराव करपे

दिनांक -19 मार्च 1986

वेळ - दुपारी 4:30

ठिकाण- चिल गव्हाण-(यवतमाळ)

Loading...

घटना - जेवणात विष मिसळून आपल्या 2 मुलं आणि बायकोसह आत्महत्या

32 वर्षांपूर्वी विदर्भातल्या शेतकऱ्यांने आपल्या कुटुंबा समवेत केलेल्या आत्महत्येची, पहिली आत्महत्या म्हणून सरकार दप्तरी नोंद आहे. मात्र आज अचानक त्या आत्महत्येची आठवण का झाली असा प्रश्न तुम्हला साहजीकच पडला असेल. पण हा प्रश्न आपल्याला पडण्याऐवजी, आज जे उपोषण करतायत त्यांना पडणं गरजेच होतं आणि ते लक्षात आणून देण्यासाठी करपेंचं स्मरण महत्वाचं आहे.

सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब ह्यांनी मागच्याच वर्षी करपे कुटुंबियांच्या स्मरणार्थ 19 मार्च 17 ला अन्नदात्यासाठी ,अन्न त्याग असं आंदोलन केल होतं, देशभरातील जनतेला त्यासाठी आवाहन केलं गेलं, बहुतांश शेतकरी कुटुंबियांनी त्या दिवशी अन्नाला शिवलं सुद्धा नाही, आंदोलना मागचं कारण एकच होत की, आपल्याला अन्नाचं, अन्नदात्याचं, भुकेमुळे पोटात उठलेल्या आगडोंबाचं आणि एकूणच उपाशी पोटी राहण्याचा त्रास कळाला पाहिजे, आणि त्याहुनही लाखांचा पोशिंदा जेव्हा समाज व्यवस्थेचा बळी ठरतो त्यावेळी आपणही त्यासाठी जबाबदार आहोत याची जाणिव व्हावी ही त्यामागची भावना होती.

शेतकऱ्यांचं हे अन्नत्याग आंदोलन आणि आणि केवळ राजकारण करण्यासाठी केलेलं काँग्रेस आणि भाजपनं केलेलं आंदोलन हे शेतकरी आणि राजकारण्यांमधली दरी दाखवून देण्यासाठी पुरेसं आहे. बरं हे उपवास आंदोलन करण्यासाठी लागणार नैतिक बळ आणि ताकद हे आज कुठल्याही राजकीय पक्षांकडे नाही. त्यामुळं उपवासाचा उपहास झाला ही वस्तुस्थिती आहे. 7 लाख बेरोजगारांसाठी केवळ 70 जागा काढल्या जातात तेव्हा या राजकीय पक्षांना उपवास करून प्रयाचित्त घ्यावं असं का वाटत नाही हा खरा प्रश्न आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 12, 2018 09:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...