Elec-widget

विशेष : मंगळसूत्र, स्वाभिमान की समजूतदारपणा ?

विशेष : मंगळसूत्र, स्वाभिमान की समजूतदारपणा ?

पण दारू पिऊन मारहाण करणाऱ्या, रस्त्यांवर पिऊन पडणाऱ्या बाईला वाटेल का स्वाभिमान मंगळसूत्राचा..?

  • Share this:

हलिमा कुरेशी, पुणे

मंगळसूत्र हा दागिना आहे. सगळ्या विवाहित महिलांच्या गळ्यात दिसणारा. यात अनेक प्रकार आहे. पूर्ण सोन्याचं आणि मनींचे, सोन आणि डायमंड. ४ ते ५ ग्रॅम पासून ते अगदी १० तोळ्यांपर्यंत उपलब्ध असणारा. महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा ,कोकण, मालवण,खान्देश,विदर्भ असं सगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र घातले जातात.

अलीकडे नोकरी करणाऱ्या तरुणी, महिला अतिशय नाजूक डिझाईन घेतात. हे सगळं लिहायचं कारण पीएन गाडगीळच्या जाहिरातींवरून सुरू झालेल्या चर्चा.

मंगळसूत्र महोत्सवात जाऊन ऑफर सहित मंगळसूत्र खरेदी केले जातात. पण ''माझे मंगळसूत्र माझा स्वाभिमान" ही जाहीरात पाहताच अनेकांनी यावर टीका केलीय. महिलांनी यावर प्रतिक्रिया देताना मंगळसूत्र हा दागिना आणि संस्कृतीचा भाग असल्याचं म्हटलंय पण मंगळसूत्रात स्त्रीचा अभिमान आहे हे त्यांना मान्य नाही.

एका महिलेले प्रतिक्रिया देताना पतीच्या प्रकारावर मंगळसूत्राचा अभिमान अवलंबून असल्याचंही प्रतिक्रिया दिली. नवरा काळजीवाहू, निर्व्यसनी सुखात ठेवणारा असेल तर तिला नक्कीच स्वाभिमान वाटेल. पण दारू पिऊन मारहाण करणाऱ्या, रस्त्यांवर पिऊन पडणाऱ्या बाईला वाटेल का स्वाभिमान मंगळसूत्राचा..?

Loading...

शिक्षिका असलेल्या तेजश्री म्हणतात, "बाईचा स्वाभिमान मंगळसूत्र मुळीच नाही. तीच व्यक्तिमत्वातला आत्मविश्वास, भारत देश हा स्वाभिमान आहे."

आयटी इंजिनिअर असलेली शीतल म्हणते, "माझं करिअर,मला मिळत असलेला सन्मान, आदर हा माझा स्वाभिमान आहे. अलीकडे मुली मंगळसूत्र घालणं जरुरी वाटत नाही. एव्हाना लायसन्स म्हणून ते आवश्यक असत असं त्यांना वाटतं."

माझी पत्रकार मैत्रीण एकदा म्हणाली, "नोकरीसाठी पुणे शहर सोडलं दुसऱ्या शहरात बातमी करताना ऑफिसातल्या सहकाऱ्यानेच तू विवाहित आहेस तर मंगळसूत्र का

घालत नाही विचारलं. तर तिने यावर त्याला चांगलंच सुनावलही. विवाहित महिलांनी मंगळसूत्र घालणं जरुरी असेल तर विवाहित पुरुषांना देखील का दिलं जात नाही एखादा चिन्ह लग्न झाल्याचं.

असो. उद्देश एकच ज्या महिला मंगळसूत्र घालत नाही. त्यांना स्वाभिमान नाही असं म्हणायचं का मग, माझी एक मैत्रीण चिडून बोलत होती. "हे सगळं ज्यामुळे आपण बोलतोय त्या जाहिरातीवर मात्र संचालकांनी समर्थन केलंय."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2017 05:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com