'शिक्षणाचा आयचा घो...!'

'शिक्षणाचा आयचा घो...!'

आम्ही मुंबई विद्यापीठातून शिकलो आणि परीक्षा दिली ही आमची चूक झाली का...? असा संतप्त सवाल विद्यार्थी विचारतायेत.

  • Share this:

उदय जाधव, प्रतिनिधी

गेले महिनाभर मुंबई विद्यापीठ गाजतंय ते विद्यार्थ्यांचे निकाल लावण्यानरून. विद्यार्थ्यांचे निकाल लावता लावता आता विद्यापीठाचाच पुरता 'निकाल' लागतो का...? अशी परिस्थिती निर्माण झालीय. राज्यपालांनी मुंबई विद्यापीठाला दिलेली ३१ जुलै ही डेडलाईन पाठवा आली नाहीच, उलट विद्यापीठानेही स्वत: जाहीर केलेली ५ आॅगस्ट ही देखील डेडलाईन पाळता आली नाही. आता तर पार १५ ते २५ आॅगस्टपर्यंत निकाल जाहीर होतील असं आश्वासन कुलगुरूंनी राजकीय पक्षांच्या आंदोलकांना दिलीय. अशा प्रकारे विद्यापीठाच्या तारीख पे तारीख धोरणामुळे पुरती नाचक्की झालीय.

देशातील अग्रगण्य अशी बिरूदावली मिरवणारी आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुंबई विद्यापीठावर अशी वेळ का यावी...? याचा शोध घेतल्यावर, त्यामागे विद्यार्थ्यांच्या हीता पेक्षा स्वता:चं आर्थिक हीत जपणारे, राजकीय आणि प्रशासकीय हात असल्याचं दिसतंय. स्वत:ला पारदर्शक आणि हायटेक सरकार म्हणवून घेणाऱ्यांनी, कोणतीही पूर्व तयारी न करता, चालू शैक्षणिक वर्षातच आॅनलाईन असेसमेंट प्रक्रिया अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचा थेट सर्वात मोठा परीणाम परीक्षार्थीं विद्यार्थ्यांवर झाला. त्यानंतर विद्यापीठाने आॅनलाईन असेसमेंटसाठी नियुक्त केलेल्या प्राध्यापकांवरही झालांय.

Interior of Mumbai university convocation Hall. Express Photo by Amit Chakravarty 06-06-2014, Mumbai

सध्या महिनाभर विद्यार्थी, राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटना बोंबा मारतायेत. पण प्राध्यापक बिचारे काय करणार...? त्यांना तोंड दाबून मुक्क्यांचा मार सहन करावा लागतोय. आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी त्यांची अवस्था झालीय. नाही म्हणायला एका वरीष्ठ प्राध्यापकांनी बंड करत थेट राजीनामाच दिलाय. पण इतरांना ते काही जमत नाहीये. कारण कुटुंब उदरनिर्वाह आहे. आणि ते काही अंशी बरोबर देखील आहे. निकालांना झालेल्या दिरंगाईमुळे सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसतोय म्हणजे नक्की काय होतंय. याचाही तपशील बघीतला तर पुढील शिक्षणासाठी, जूनमध्येच सुरू झालेली अॅडमिशन, विदेशात शिक्षणासाठी प्रयत्न करणारे विद्यार्थी, आणि व्यवसायासाठी आवश्यक असणारी निकालाची प्रत, त्यासाठी आतुरतेने वाट पहाणारे विद्यार्थी आणि पालक. हे प्रश्नं अजूनही सुटलेले नाहीत. त्यामुळे हे चालू शैक्षणिक वर्ष वाया जातंय का...? अशा गंभीर प्रश्नं विद्यार्थ्यांना पडलाय. याचं ठोस उत्तर अजूनही विद्यापीठ देत नाही आहे.

आम्ही मुंबई विद्यापीठातून शिकलो आणि परीक्षा दिली ही आमची चूक झाली का...? असा संतप्त सवाल विद्यार्थी विचारतायेत. विद्यार्थ्यांच्या या भीषण अवस्थेला सर्वस्वी जबाबदार आहेत ते थेट सरकार, शिक्षणमंत्री आणि बेजबाबदार विद्यापीठ प्रशासन. कोणतीही पूर्व तयारी न करता आॅनलाईन असेसमेंटसाठी विद्यापीठ तयारच कसं झालं. ही आॅनलाईन असेसमेंट प्रक्रिया करण्यासाठी ज्या कंपनीला कंत्राट दिलंय. त्यामागे कोणाचा राजकीय हात आहे...? याची चर्चा सध्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राजकीय वर्तुळात आणि पत्रकारांमध्ये सुरू आहे. कोण कुणाचे हीत संबंध जपतोय...? आणि कुणाला बळीचा बकरा करतोय...? याचेही आडाखे बांधले जातायेत. या सर्वांवर कडी म्हणजे खरा सूत्रधार पडद्यामागेच आहे. आणि तो रहाणार हे देखील तितकंच स्पष्टं आहे. कारण खेळ शेवटी राजकीय कटशहाचा आहे. पण या राजकारणात ज्यांचा काही संबंध नाही ते विद्यार्थी आणि पालक मात्र भरडून निघतायेत.

तुमचं राजकारण आणि भ्रष्टाचार गेला चुलीत..आमचा त्याच्याशी काहीच संबंध नाही. कृपा करून आमचा निकाल लवकर लावा, अशी हाताच्या कोपरापासून हात जोडून विनंती विद्यार्थी करतायेत. त्यांची केविलवाणी अवस्था ही या स्पर्धेच्या युगात, जिथे प्रत्येक सेकंद, मिनिटं, तास आणि दिवस महत्वाचा आहे. अशा जीवघेण्या स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी आहे. तशी त्यांची मजबुरीच आहे. पण या विद्यार्थ्यांचा आक्रोश राजकीय पुढारी, मंत्री आणि प्रशासनाला अजून ऐकू गेलेला नाहीये. त्यामुळे उद्वीग्नं विद्यार्थी टाहो फोडतायेत...शिक्षाणाचा आयचा घो...!'

First published: August 10, 2017, 10:49 PM IST

ताज्या बातम्या