ऑपरेशन लालू...

ऑपरेशन लालू...

या प्रकरणाने बिहारचे राजकारण ढवळून निघणार आहे, पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आपली प्रतिमा जपण्यासाठी नेहमी तत्पर रहणारे नितीश कुमार काय भूमिका घेतील?

  • Share this:

कौस्तुभ फलटणकर ,नवी दिल्ली

रेल्वे मंत्री असतांना एका प्रायव्हेट कंपनीला अनअधिकृत फायदा पोहचवल्या बद्दल शुक्रवारी सीबीआई च्या विशेष पथकाने लालू प्रसाद यादव, राबड़ी देवी आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या देशभरतील 12 ठिकाण्यावर छापेमारी करून त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवली. या प्रकरणाने बिहारचे राजकारण ढवळून निघणार आहे, पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आपली प्रतिमा जपण्यासाठी नेहमी तत्पर रहणारे नितीश कुमार काय भूमिका घेतील?

राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएला पाठिंबा देऊन नितीश कुमार यांनी बिहारच्या महागठबंधनमध्ये ठिणगी पाडली. काँग्रेस मीरा कुमार यांना उमेदवार करणार हे माहिती असून नितीश यांनी मुद्दाम घाई घाई त कोविंद यांना पाठिंबा घोषित केला. नितीश यांच्या जवळच्या लोकांच्या मते या मागे महत्वाचा उद्देश लालू प्रसाद यादव यांना डिस्टर्ब करणे हा होता. कधी काळी एकमेकांचे धुर विरोधी नितीश-लालू बिहार विधानसभा निवडणुकीत एकत्र आले. पण या निवडणुकीत लालूंची प्रतिमा विकास बाबू नितीश पेक्षा भारी ठरली आणि लालुंच्या पक्षाने नितीश यांच्या 73 पेक्षा जास्त 81 जागा जिंकल्या.

लालू यांचे दोन्ही मुल नितीश मंत्रीमंडळात मंत्री झाले. आपला मुलगा तेजस्वी यांनी बिहारचे मुख्यमंत्री व्हावे ही लालू-राबडींची इच्छा आहे हे नितीश कुमार यांना माहिती होत पण राबड़ी देवींनी मध्यंतरी असे जाहीर वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. आपल्या मुलाला मुख्यमंत्री करण्यासाठी लालू प्रसंगी पार्टी तोड़तील ही भीती नितीश कुमार यांना वाटायला लागली आणि त्यानंतर सुरु झाले ऑपरेशन लालू...

यानंतर अचानक भाजप नेते माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी लालू परिवाराविरोधात रोज भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप कागदपत्रानिशी करायला लागले. मुख्य म्हणजे या सगळ्या काळात नितीश सहयोगी म्हणून कधीच लालू यांच्या बाजूने उभे राहिले नाही. जदयूमध्ये कुजबुज आहे की नितीश कुमार यांनी पडद्या मागून सुशील मोदींना रसद पोहचवली. कारण लालू आणि परिवार जेवढा कुमकुवत होईल तेवढं नितीश च्या राजकारणाला फ़ायदेशीर होणार आहे.

पण मग आता नितीश पुन्हा भाजपसोबत येणार का ? भाजपा नेते या प्रश्नावर मोठा श्वास घेतात आणि आकाशाकड़े बघतात. कारण नरेंद्र मोदींप्रमाणेच नितीश यांच्या मनात काय आहे याचा थांगपत्ता लागने कठीण आहे. सद्याच्या राजकीय स्थितीत 2019 मध्ये आपले पंतप्रधान होणे कठीण आहे हे आता नितीश सुद्धा समजतात आहे. आणि म्हणूनच नितीश कुमार यांचा मोठा प्लॅन तयार आहे. भाजपला वाटतं नितीश यांना सोबत घावे पण नितीश यासाठी स्वतः हुन प्रयत्न करण्या पेक्षा मोदींकडून संकेताची वाट पाहत आहे. दुसरीकडे राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेसला नाराज केल्यानंतर उपराष्ट्रपती निवडणुकीत समर्थनाची तयारी दाखवून विरोधकांचे सुद्धा एक बोट त्यांनी पकडून ठेवले आहे.

वास्तविकत: नितीश कुमारांसाठी दोन्हीकडून ही स्थिती आहे. कारण लालू आणि भाजप-काँग्रेसला असलेली नितीश कुमार यांची गरज हे बघता नितीश राष्ट्रीय राजकारणात हार्ड बार्गेनिग करून आपले स्थान अणखी मजबूत करतील. पण या साठी ऑपरेशन लालू भविष्यात आणखी मेजर होणार हे नक्की.

First published: July 7, 2017, 6:52 PM IST

ताज्या बातम्या