ज्ञानयोगी...

ज्ञानयोगी...

  • Share this:

kumar_ketkarकुमार केतकर, ज्येष्ठ पत्रकार

गोविंद तळवलकर हे कुठल्याही ठराविक विचारधारेचे नव्हते. त्यांचे विचार अतिशय प्रभावी आणि कधीच तडजोड न करणारे असले तरीही. ब्रिटिश परंपरेप्रमाणेच ते उदारमतवादी होते. ते महात्मा गांधींचे खूप मोठे चाहते होते. पंडित नेहरूंमुळेच देशात उदार लोकशाही व्यवस्था सुरू झाली, यावर त्यांचा विश्वास होता. आपल्या लेखणीच्या आणि व्यासंगाच्या जोरावर त्यांनी अनेक दशकं वाचकांच्या मनावर अधिराज्य केलं. मराठी मध्यमवर्गाचेही ते दैवत होते. म्हणूनच त्यांच्या निधनाची बातमी आली, तेव्हा त्यांच्याबद्दलची कौतुकाची,आदराची भावना पुन्हा एकदा दिसून आली.

खरं तर ते दोन दशकांपूर्वीच निवृत्त झाले होते. पण तरीही अमेरिकेहून त्यांनी आपलं लिखाण सुरूच ठेवलं. तिथे ते आपल्या दोन मुलींसोबत स्थायिक झाले होते. ते खरं तर सगळ्या वयांच्या पलिकडले होते. वयाच्या 92व्या वर्षी ते मराठी वर्तमानपत्र, मासिकं यांच्यासाठी ते इतकं नियमित लिखाण करायचे की ते पाहून त्यांच्याहून अर्ध्या वयाच्या पत्रकारांनी शरमेनं मान घाली घातली पाहिजे. नुसती त्यांच्या लिखाणाची संख्या नव्हती, तर संकल्पना,विषय ते ज्या पद्धतीनं हाताळायते ते खूप मोठे होते.

17व्या शतकात भारतातला सत्ताबदल असो, आणि इस्ट इंडिया कंपनीची ब्रिटिश राजवट असो, रशियन कम्युनिझमचा उदय आणि पतन असो, आधुनिक भारताचं निरीक्षण असो, वा 20व्या शतकातलं युरोपमधलं वैचारिक वादळ ते भारतातला हिंदुत्ववाद आणि त्याचा भारतातल्या राज्यांवर पडणारा प्रभाव...इतिहासाचा प्रत्येक पैलू त्यांनी अभ्यासला होता, त्याचं संशोधन केलं होतं, त्यावर आपली जोरदार मतं मांडली होती आणि भरपूर लिखाण केलं होतं.187c68_282cae5ed7ae42f09a52ca14e148fb5e-mv2_d_4128_2322_s_2

त्यांच्याकडे अमाप पुस्तकं होती आणि त्या पुस्तकांबद्दल त्यांना प्रचंड प्रेम, विशेष करून स्वामित्वाची भावना होती. आणि ही भावना खराखुरा पुस्तकप्रेमीच समजू शकतो. नेपोलियन ते नेहरू,लिंकन ते लेनिन, अशा अनेक बुद्धिमान व्यक्तिमत्त्वांची भुरळ त्यांना पडली होती. इतरांप्रमाणेच त्यांच्याकडेही रोज 24 तासच होते. पण त्यांनी ते 24 तास वाचन आणि संशोधनासाठी 48 तासांमध्ये केले होते. आणि या अर्थानं पाहता त्यांची कामाची वर्ष 150 होती,असं म्हणता येईल.

त्यांचा जन्म कनिष्ठ मध्यवर्गात झाला. सुरुवातीला ते डोंबिवलीत राहात होते. आपल्या अभ्यासू वृत्तीनं त्यांच्या राजकीय संकल्पना वृद्धिंगत झाल्या. एम.एन.राॅय यांचा मार्क्सवाद आणि संपूर्ण मानवतावाद यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. पण तसे ते 'राॅयिस्ट' बनले नाहीत. बुद्धिवादी जगाशी संपर्क आल्यानं ते पत्रकारितेकडे ओढले गेले. सुरुवातीला 'सेमी-राॅयिस्ट' लोकसत्तामध्ये ते काम करायचे आणि त्यानंतर ते महाराष्ट्र टाइम्समध्ये आले. टाइम्स ग्रुपनं त्यावेळी मराठी वर्तमानपत्र सुरू करायचं ठरवलं होतं. ते साल होतं 1962. 1968मध्ये ते पूर्ण वेळ संपादक बनले आणि 1995 पर्यंत त्यांचं हे काम अविरत सुरू राहिलं.

त्यांची ही इनिंग फारच उत्कृष्ट होती. त्यांनी नेहरूंचा काळ, नेहरूंनंतरचा काळ आणि इंदिरा गांधींचं युग सगळ्यावरच भाष्य केलं. राजीव गांधींच्या भारताला कम्प्युटर्सनी आधुनिक करायच्या प्रयत्नाला पाठिंबा दिला. GOVIND TALWALKARव्ही.पी.सिंग,आरएसएस,भाजप यांच्यावर टीका केली. कारण ही मंडळी देशाला अधोगतीकडे नेतायत, असं त्यांना वाटलं होतं. त्यांनी हिंदुत्वाच्या संकल्पनेला पूर्ण नाकारलं. ते धर्मनिरपेक्षतेशी बांधिल होते. त्यांचा पाश्चिमात्य विचारांवर विश्वास होता. आंबेडकर-नेहरूच्या संकल्पनेतल्या धर्मनिरपेक्ष भारतावर त्यांचा विश्वास होता. उधळ राजकारण त्यांना आवडायचं नाही.

अॅलन बुलाॅक ते विल्यअम शिरेर, आॅथर कोस्लर, बर्नाड रसेल ते सिया बर्लिन असे अनेक जण त्यांचे बौद्धिक सहकारी होते. ते त्यांचं बौद्धिक कुटुंब होतं. त्यांची पुस्तकं त्यांचे मित्र होते. यशवंतराव चव्हाण, इंद्रकुमार गुजराल,निखिल चक्रोबर्ती, शाम लाल, दिलीप पाडगावकर हे त्यांचे काही मोजके मित्र होते. ते कधी कुठल्या पार्टीला जायचे नाहीत. कुठल्याही सामाजिक कार्यक्रमाला ते जायचे नाहीत. त्यांना दिलेलं 'सेलिब्रिटी' स्टेटस त्यांना कधीच आवडायचं नाही. ते 'लाइफस्टाइल सेलिब्रिटी पेज 3' अजिबात नव्हते. ते शांत आणि माणसांबद्दल चोखंदळ होते.

त्यांचा चाहता वाचकवर्ग भरपूर होता. पण त्यांनी त्यांचं लांगूलचालन कधीच केलं नाही. ते रोखठोक होते. तर्कनिष्ठ होते. अनेकदा याच स्वभावामुळे त्यांनी त्यांच्या जवळच्या माणसांना दुखावले देखील. त्यांचे अनेक सत्ताधाऱ्यांशी संबंध असले तरी त्यामुळे आपल्याला राज्यसभेत राजकीय स्थान मिळावं यासाठी त्यांनी कधीच प्रयत्न केले नाहीत. त्यांच्यासाठी सुखाची गोष्ट म्हणजे पुस्तकं आणि अजून पुस्तकं.

ते अद्वितीय होते. आताच्या पिढीला असा संपादक, असं व्यक्तिमत्त्व सापडणं दुर्लभच. ते फक्त हे जग सोडून गेले नाहीत, तर त्यांच्यासोबत ते त्यांचा वारसाही घेऊन गेले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2017 05:16 PM IST

ताज्या बातम्या