S M L

ग्लोबल अजेंडा : घडतं, बिघडतं...अमेरिका

Sachin Salve | Updated On: Jan 26, 2017 07:45 PM IST

ग्लोबल अजेंडा : घडतं, बिघडतं...अमेरिका

vinod_raut_ibn_lokmatविनोद राऊत, सीनिअर प्रोड्युसर, आयबीएन लोकमत

1. अमेरिकन अध्यक्ष आणि विजनवास

अमेरिकेत नव्या अध्यक्षांनी एकदा धुरा सांभाळली की माजी राष्ट्राध्यक्षांनी मुख्य प्रवाहातून, प्रसारमाध्यमांच्या लखलखाटापासून दूर राहायचं. थोडक्यात रिटायरमेंट घेतल्यावर विजनवासात जायचं अशी अलिखित परंपरा आहे. त्यामुळे तुम्हाला जिमी कार्टर, जॉर्ज बुश (सीनिअर), बिल क्लिंटन, जॉर्ज बुश (ज्युनिअर) हे तूम्हाला मीडियामध्ये फार कमी दिसतात. जॉर्ज बुश बाप-लेकाचा कार्यकाळ युद्धाने गाजला. बुश सीनिअर यांच्या कार्यकाळात पहिल्यांदा इराकवर हल्ला झाला. तर 9/11 नंतर अमेरिकेसह संपूर्ण जग बदललं होतं, या काळात जॉर्ज बुश (ज्युनिअर) यांनी इराक, अफगाणिस्तानमध्ये युद्ध पुकारलं. त्यांच्या कडव्या धोरणामुळे अमेरिका जगात एकाकी पडलं होतं.


मात्र  जेव्हा बुश (ज्युनिअर) यांचा कार्यकाळ पूर्ण झाला, तेव्हा ते अभावाने मीडियात झळकले. त्यांच्या ध्येयधोरणामुळे अमेरिकेची आर्थिक, लष्करी वाताहत झाली होती. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्यावर खूप टीका झाली, मात्र ते कधीही स्पष्टीकरण देण्यासाठी मीडियासमोर आले नाहीत. दूसरे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी निवृत्तीनंतर क्लिंटन फाऊंडेशनच्या माध्यमातून जगभर समाजकार्य सुरू केलं. बिल यांची डेमोक्रॅट पक्षावर पकड कायम राहिली, मात्र असं असतानाही ते राजकारणात कधीच सक्रिय नव्हते. केवळ हिलरी क्लिंटन यांच्यासाठी ते मैदानात उतरले होते. अगदी बराक ओबामा आठ वर्षांच्या कार्यकाळानंतर अखेरचे 20 जानेवारी दिसले, ट्रम्प यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रं सोपवल्यानंतर ओबामा कॅलिफोर्नियात सुट्टीवर गेलेत. त्यानंतर ते प्रसारमाध्यमातून गायब आहेत. अगदी दुसऱ्या दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांनी ओबामा यांच्या कार्यकाळाचा ठसा मिटवण्याचा प्रयत्न केला. ओबामा केअर हा कायदा ट्रम्प यांनी रद्द केला. मात्र परंपरा जोपासत ओबामा यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र बराक एक बाब बोलून गेले, जेव्हा अमेरिकेच्या मूलभूत  स्वातंत्र्यावर आक्रमण होईल तेव्हा मात्र मी चूप बसणार नाही...मैदानात उतरेल.

2. निवृत्तीनंतर ओबामा काय करणार?

President Obama Speaks At The SelectUSA Investment Summitजगातील सर्वात शक्तिशाली असलेला अमेरिकेचा अध्यक्ष निवृत्तीनंतर काय करतो असा प्रश्न अनेकांना पडत असतो. साधारणत: प्रत्येक अध्यक्ष आपल्या कार्यकाळाच्या अखेरच्या वर्षी निवृत्तीचा प्लॅन आखतो. ओबामा यांनीसुद्धा आपला रिटायरमेंट प्लॅन तयार केलाय. क्लिंटन दांम्पत्यासारखं चॅरिटीची कामं करण्याचा मानस बराक-मिशेल ओबामा यांचा आहे.त्यासाठी त्यांची वेबसाईट तयार आहे - ओबामा ऑर्ग नावाने. साधारणत: अध्यक्ष निवृत्तीनंतर वॉशिंग्टनमध्ये राहत नाही. मात्र ओबामा त्यांच्या आवडत्या शिकागो शहरात परतणार नाही, त्यांनी वॉशिंग्टनमध्ये भाड्याचं घर घेतलं, ते सुद्धा व्हाईट हाऊसच्या अगदीजवळ. त्यामागे कारण आहे बराक यांची मुलगी साशा... शाळा सुरू असल्यामुळे तिचं  पदवीचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत अजून काही वर्षे वॉशिंग्टनमध्ये राहायचं ओबामांनी ठरवलंय. त्यामुळे निवृत्तीनंतरही व्हाईट हाऊसच्या शेजारी राहणारे ओबामा हे अमेरिकेचे पहिले अध्यक्ष असतील. माजी उपाध्यक्ष ज्यो बिडेन यांनी ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर तडक रेल्वेनं आपलं शहर डेलवर गाठलं.

Loading...

44 वर्षे राजकारणात, सिनेटमध्ये काढलले ज्यो बिडेन अत्यंत मितभाषी गृहस्थ आहे. मात्र त्याचं वैयक्तिक आय़ुष्य दु:खाने भरलेलं आहे. 1972 मध्ये त्यांची पहिली पत्नी आणि मुलगी रेल्वे अपघातात ठार झाले तर 2015 मध्ये त्यांचा मुलगा कॅन्सरने मरण पावला. ज्यो बिडेन होमसिक आहेत, ते  कायम आपल्या शहराशी कनेक्ट असतात. अगदी वॉशिंग्टनमध्ये राहत असतानाही आठवड्यातून दोन दिवस तरी  डेलवरला घरी जायचे. निवृत्तीनंतर बिडेन आपल्या मित्राला सोबत देण्यासाठी वॉशिंगटनमध्ये राहणार आहेत. ते बराक ओबामा यांच्या घराशेजारी घर घेण्याचा त्यांचा विचार आहे. तिथल्या स्थानिक शाळेत ज्यो आपला आवडीचा इंग्रजी विषय शिकवणार आहे. अमेरिकेचे अनेक उपाध्यक्ष पुढे  पुढे अध्यक्ष झालेत. यामध्ये जॉन अॅडम्स, थॉमस जेफरसन, जॉर्ज बुश (सीनिअर), रिचर्ड निक्सन अशी नावे आहेत. मात्र सध्यातरी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा बिडेन यांचा कुठलाही प्लॅन नाही.. मात्र ऑप्शन ओपन आहेत हे सांगायला बिडेन महाशय विसरले नाहीत.

3. माध्यमद्वेषी ट्रम्प, पत्रकार चिंतेत..

अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतरही ट्रम्प यांचा माध्यमाविरोधातला राग कमी झाला नाही. ट्विटर, पत्रकार परिषदांच्या माध्यमातून पत्रकार  खोटारडे आहेत, फेक मीडिया अशा प्रकारे ट्रम्प कायम पत्रकारांचा उध्दार करत असतात.अध्यक्षपदाची शपथ घेतल्यावर दुसऱ्याच दिवशी ट्रम्प यांनी पत्रकार हे पृथ्वीतलावरचे सर्वात खोटारडे, अप्रामाणिक लोक आहेत, या शब्दात टीका केली. पत्रकारांसोबत ट्रम्प यांचा छत्तीसचा आकडा बघता व्हाईट हाऊस प्रेस कॉर्प (व्हाईट हाऊस कव्हर करणाऱ्या पत्रकाराची संघटना) संघटनेपुढं आता काय करावं हा प्रश्न पडलाय. मात्र   पत्रकार परिषद, विशिष्ट नेत्याच्या कव्हरेजवर बहिष्कार घालण्याची पध्दत अमेरिकेत नाही. (ती आपल्याकडे आहे) त्यामुळे ट्रम्प यांना टॅकल कसं करायचं हा प्रश्न त्याच्यापुढं आहे. दुसरं म्हणजे व्हाईट हाऊसमध्येच पत्रकारांना आपल्याकडे असलेल्या विधिमंडळ वार्ताहर संघासारखं छोटेखानी कार्यालय दिलं गेल होतं. मात्र ट्रम्प यांचा रुद्रावतार बघून या कार्यालयातून आपल्याला हिसकावून लावतील की काय ? अशी चिंता आता पत्रकारांना पडली आहे. दूसर महत्त्वाचं म्हणजे  ट्रम्प विरुद्ध पत्रकार अशा शीतयुध्दाच्या वातावरणात व्हाईट हाऊस आता पहिल्यासारखं कव्हर करता येईल का हा प्रश्न कायम आहेच. त्यामुळे ट्रम्प यांच्या कार्यकाळात व्हाईट हाऊसमधील पत्रकारांना एक हात दूर ठेवण्यात येईल अशी चिन्हं आहेत.

4. ट्रम्प कॅबिनेट, अनुभवाची कमी...

donald trump4नियमानूसार प्रत्येक अध्यक्षाला प्रशासनातील महत्वाच्या जांगावर आपल्या माणसांची नियुक्ती करतो. अमेरिकेत 622 महत्वाच्या पदावर विवीध क्षेत्रातले तज्ञांच्या नेमणुका कराव्या लागतात. मात्र बोलघेवड्या ट्रम्प यांनी आतापर्यंत केवळ 22 जागांवर नियुक्त्या केल्यात. प्रत्येक महत्वाच्या नियुक्तीला सिनेटच्या मंजुरीची गरज आहे. कॉंग्रेसमध्ये बहुमत असल्यामुळे या  नियुक्ती रद्द करण्याचा शक्यता तशी कमी आहे. ट्रम्प यांनी त्यांचे जावई जॅरेड कुशनर यांची वरिष्ठ सल्लागार या पदावर नियुक्ती केली आहे. धर्मानं ज्यू असलेल्या कुशनर यांना इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्यात समेट घडवून आणण्याची महत्वाची आणि कठीण जबाबदारी दिली आहे. एकंदरीत ट्रम्प यांची इस्रायलशी घसट बघता, पॅलेस्टाईन पंतप्रधान कुशनर यांच्या प्रयत्नांना किती प्रतिसाद देणार हे बघावं लागेल.

दुसरीकडे ट्रम्प यांच्या गाठीशी प्रशासनाचा किंवा लष्कराचा कुठलाही अनूभव नाही. मात्र अस असतांना ते कॅबिनेटमध्ये अनूभवी माणसं घेतील अशी आशा होती. मात्र ट्रम्प यांनी भ्रमनिरास करत, मात्र कॅबीनेटमध्ये महत्वाच्या पदावर  नव्या लोकांनाच स्थान मिऴालंय. त्यामुळे भारतात मोदी कॅबिनेटमधील स्मृती इराणी यांच्याबद्दल जशी टीका झाली, त्या स्वरूपाची टीका आता ट्रम्प यांच्या कॅबिनेटवर सुरू झालीये. उदाहरणार्थ बेटसी डेवोस यांच्याकडे शिक्षण खात्याचा प्रभार दिला गेलाय. मात्र त्यांना शिक्षण क्षेत्राबद्दल काहीच माहिती नाही. शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यावर जोर देण्यापेक्षा शांळामधील हिंसाचार रोखण्यासाठी शिक्षकांनी बंदूक बाळगली पाहिजे असा अजब तर्क लावला. रेक्स टिलेरसन यांच्याकडे परराष्ट्र खातं दिलंय, रेक्स एक्सॉन मोबिल या जगातल्या पहिल्या क्रमांकाच्या तेल कंपनीचे सीईओ होते. पदभार स्वीकारताच रेक्स यांनी चीनसंदर्भात बाष्कळ विधान केलं, दक्षिण चीन समुद्रात चीनला रोखू असही ते म्हणाले..त्यामुळे येणाऱ्या काळात ट्रम्प यांचं कॅबिनेट जगातील महत्वाचे आणि कळीचे मुद्दे कसे हँडल करतात, ते बघावं लागेल.

4. ओबामा आणि गोल्फ मैदानाचा वाद..

obama_golfअध्यक्षपदावर असतांना वेळात वेळ काढून ओबामा गोल्फ मैदानावर रमायचे. ओबामांनी आता वॉशिंग्टनमध्ये राहायचं ठरवलंय. त्यामुळे ते गोल्फ कुठे खेळणार हा प्रश्न आलाच आणि वाद सुरू झाला. वॉशिंग्टनमध्ये खास ज्यू धर्मीयांसाठी वेडमॉन्ट कंट्री क्लब नावाचा मोठा गोल्फ क्लब आहे. विस्तीर्ण मैदानामुळे हा क्लब अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. क्लबच्या अध्यक्षांनी ओबामा आणि मिशेल यांना क्लबचं मेंबरशिप घेण्याचं आमंत्रण पाठवलं. त्याला काही सदस्यांनी विरोध केला.

ओबामा यांचे इस्रायलशी फार सलोख्याचे संबंध कधीच नव्हते, अगदी जाता जाता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत त्यांनी इस्रायलच्या निंदा प्रस्तावावर अंग काढून घेतलं. वेस्ट बँक या पॅलेस्टाईनच्या भागात ज्यूंच्या वस्त्या जबरदस्तीने वसण्याच्या मोहिमेलासुद्धा बराक ओबामा यांनी कायम विरोध केला. त्यामुळे ज्यूद्वेष्ट्या ओबामांना या क्लबचं सदस्यत्व देऊ नये अशी भूमिका काही सदस्यांनी घेतली. मात्र या क्लबची 103 वर्षांची परंपरा बघता ओबामा यांना मेंबरशिप देण्याचा निर्णय घेतला. त्या निषेधार्थ दोन सदस्यांनी राजीनामा दिला. मुळात ओबामा यांनी या क्लबच्या सदस्यपदासाठी अर्जदेखील केला नाही. अमेरिकेच्या या माजी अध्यक्षाला या क्लबची मेंबरशिप काही फ्री नाही. (भारताप्रमाणे) त्यासाठी त्यांना तब्बल 80 हजार डॉलर्स मोजावे लागतील.

5. अल्टरनेटिव्ह फॅक्ट्स म्हणजे काय रे भाऊ ?

फॅक्ट्स मांडा, पाल्हाळ लावू नका, असं पत्रकारितेत कायम सांगितलं जातं. एखाद्या बातमीमध्ये अनेक अॅँगल असू शकतात, मात्र फॅक्ट्स एकच असते हे आजपर्यंत आपल्याला माहिती होतं...मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नवा शब्द रूढ केला आहे..अल्टरनेटिव्ह फॅक्ट्स... शपथविधी सोहळ्याला विक्रमी गर्दी जमली होती, मात्र माध्यमांनी जाणीवपूर्वक वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष केलं. फॅक्ट्स मांडले नाहीत असा आरोप ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला होता. त्यावेळी त्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यानं आम्ही आता अल्टरनेटिव्ह फॅक्ट्स मांडणार असं म्हणत हा नवा शब्द मार्केटमध्ये आणला. सध्या ट्विटरवर या शब्दाची जोरदार खिल्ली उडवणं सुरू आहे. अमेरिकेत लाखो लोक हॅश टॅगसह या शब्दाचा वापर करताहेत. अनेक वर्षांपूर्वी लहान मुलांना पक्षांची माहिती देण्यासाठी देअर इज अल्टरनेटिव्ह फॅक्ट्स नावाचं गोल्डन बुक आलं होतं. मी खोटं बोललो मात्र त्यामागे दुसरेही (अल्टरनेटिव्ह) फॅक्ट्स आहे... असं आता अनेक अमेरिकनं गमतीत म्हणताहेत.

6. CIA, FBI वर अविश्वास..

म्हणतात की अमेरिका सेफ आहे...याच कारण अमेरिकेच्या गुप्तचर संस्था सशक्त आहेत. या संस्थेच्या माहितीच्या आधारावर अमेरिकेनं आतापर्यंत अनेक मोठे मोठे दहशतवादी, सायबर हल्ले परतवून लावले. जगभरात अमेरिकेविरोधातील कारवाया हाणून पाडल्या आहेत. CIA चं 1997 या वर्षीचं बजेट 26.6 बिलियन डॉलर्स एवढं होतं.  यावरुन या संस्थेचा पसारा किती मोठा आहे ते कळू शकतं.. महत्वाचं म्हणजे या संस्थेवर अमेरिकेच्या प्रत्येक अध्यक्षाचा प्रचंड विश्वास असतो. मात्र ट्रम्प यांनी या सुरुवातीपासून या संस्थेवर सातत्यानं अविश्वास दाखवला. रशियाने अमेरिकन निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी जाणीपूर्वक डेमोक्रॅट पक्षाची वेबसाईट हॅक केली, असा चौकशी अहवाल सीआयएनं फाईल केला. मात्र या अहवालाची ट्रम्प यांनी जाहीर खिल्ली उडवली.

दुसरीकडे FBI चे डायरेक्टर कॉमे यांनी ऐन निवडणुकीत क्लिंटन यांची बंद झालेली चौकशीची फाईल परत उघडली आणि हिलरी क्लिंटन यांच्या पराभवाला हातभार लावला. मात्र कामी पडलेल्या कॉमे यांचा कार्यकाळ वाढवण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली.  या CIA, FBI चे डायरेक्टर नियमानुसार अध्यक्षांना दररोज ब्रिफिंग करतात. मात्र मला दररोज ब्रिफिंगची गरज नाही असं ट्रम्प यांनी अधिकाऱ्यांना सुनावलंय. ट्रम्प यांच्या सातत्यानं दाखविलेल्या अविश्वासामुळे या गुप्तहेर एजन्सीसच्या अधिकाऱ्यांचं मनोबल खचलंय. काही आठवड्यापूर्वी  ट्रम्प यांनी सीआयएची तुलना चक्क जर्मनीच्या नाझीयुगासोबत केली होती. त्यामुळे येणाऱ्या काळात या संस्था आणि ट्रम्प यांचे संबंध कसे असतील यावर जगाचं लक्ष राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 26, 2017 06:30 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

Vote responsibly as each vote
counts and makes a difference

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close