News18 Lokmat

गुडबाय ऑर्कुट !

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Sep 30, 2014 11:02 AM IST

गुडबाय ऑर्कुट !

blog amruta durve ibn lokmat- अमृता दुर्वे,सीनिअर  एडिटर प्रॉड्यूसर,IBN लोकमत

ऑर्कुट... हे नाव वाचूनच अनेकजण नॉस्टॅल्जियामध्ये गेले असतील....

प्रोफाईल, टेस्टिमोनियल्स, स्क्रॅप, वॉल...अशा सगळ्या शब्दांमधून ऑर्कुटने सोशल नेटवर्किंगची ओळख करून दिली...2004मध्ये सुरू झालेली ही वेबसाईट...त्याआधी फ्रेंडस्टर नावाचं एक नेटवर्क सुरू झालं होतं...पाठोपाठ महिन्याभरातच फेसबुकचा जन्म झाला...

गुगलच्या 'The 20 percent' प्रोजेक्टमधून ऑर्कुटचा जन्म झाला...गुगलच्या प्रोजेक्टमध्ये कर्मचार्‍यांना त्यांच्या कामाचा 20 टक्के वेळ हा एखाद्या खास प्रोजेक्टसाठी वापरता येतो...त्यातूनच डेव्हलप झालेल्या अनेक गोष्टींपैकी एक - ऑर्कुट. ऑर्कुटचं नाव ठेवण्यात आलं, या वेबसाईटचा जनक Orkut Büyükkökten वरून.

तोपर्यंत ई-मेल आणि चॅटिंगचं असलेलं प्रस्थ सोशल नेटवर्किंग वेबसाईट्सनी कमी केलं. चॅटिंग, चॅटरूम्सची जागा भारतात ऑर्कुट प्रोफाईल्स आणि कम्युनिटी ग्रुप्सनी घेतली. अनेक जुन्या-नव्या सोबत्याच्या संपर्कात राहण्याचा हा फंडा चांगलाच प्रसिद्ध झाला... पण ब्राझील आणि काही प्रमाणात भारत वगळता जगात इतरत्र ऑर्कुटने फारशी पकड घेतलीच नाही. ऑर्कुटचं पुनरुज्जीवन करण्याचा, सोशल नेटवर्किंगच्या क्षेत्रात पाय रोवण्याचा प्रयत्न पुन्हा पुन्हा करूनही गुगलला त्यात अपयश आलं. ऑर्कुटची ब्राझीलमधली प्रसिद्धी पुढे अमेरिका- युरोपमध्येही पसरेल ही गुगलची अपेक्षा फोल ठरली...ऑर्कुट हळूहळू मागे पडत असताना फेसबुकने मात्र मूळ धरलं. मागून आलेलं ट्विटरही ठराविक वर्गात रुजलं. पण गुगलला मात्र या सोशल नेटवर्किंगच्या क्षेत्रात फारसं यश मिळालं नाही.

Loading...

orkur

ऑर्कुट मागे पडायला लागल्यानंतर गुगलचा सोशल नेटवर्किंगचा पुढचा प्रयत्न होता - गुगल वेव्ह. पण हा प्रयत्न सपाटून आपटला. गुगलला हा वेव्ह प्लॅटफॉर्म बाद करावा लागला. पण 10 वर्षं गुगलने ऑर्कुटची ही वेबसाईट मात्र जिवंत ठेवली. गुगल प्लसचा पर्याय उपलब्ध झाला. पण तोही फेसबुक, ट्विटर इतका लोकप्रिय झाला नाही.

आता ऑर्कुट बंद करून गुगल आपलं लक्ष यू ट्यूब आणि गुगल प्लसवर केंदि्रत करणार आहे. 30 सप्टेंबरपासून ऑर्कुट बंद होणार असल्याचं गुगलने जाहीर केलंय. गुगल रीडर पाठोपाठ बंद केली जाणारी ही गुगलची दुसरी सेवा असेल. पहिली सोशल नेटवर्किंग साईट असल्याने अनेकांनी अजूनही आपले इथले अकाऊंट्स डिलीट केलेले नाहीत. अनेकजण फक्त जुन्या आठवणी म्हणून मधूनच कधीतरी हा अकाऊंट उघडून पाहतात. पण आता या सगळ्या डेटाचं काय?

google-plus-featured

तर या सगळ्या डेटाचा बॅकअप तुम्हाला घेणं शक्य आहे.

  • ऑर्कुटला लॉग इन करायचं असेल, तर फार वर्षांपूर्वीचा जुना पासवर्ड आठवत बसायची गरज नाही. आता गुगलचं एकच लॉगइन गुगलच्या सगळ्या सेवांसाठी चालतो. त्यामुळे तुमचं जीमेल लॉग इन वापरून तुम्हाला ऑर्कुट ऍक्सेस करता येईल.
  • ऑर्कुटवर असलेले तुमचे सगळे फोटो तुम्हाला गुगल प्लसवर एक्स्पोर्ट करता येतील
  • त्यासाठी गुगल प्लसला साईन इन करा (जीमेल आयडी वापरून)
  • http://www.orkut.com/AlbumsExport या लिंकवर जा.
  • जे अल्बम्स एक्स्पोर्ट करायचे असतील त्यावर क्लिक करा किंवा सिलेक्ट ऑलचा ऑप्शन क्लिक करा.
  • इम्पोर्ट सिलेक्टेडवर क्लिक करा.
  • तुम्ही इम्पोर्ट केलेले अल्बम्स बाय डिफॉल्ट - प्रायव्हेट सेटिंगला असतील. म्हणजे इतर कोणालाही ते पाहता येणार नाहीत.
  • गुगल टेक आऊट सेवा वापरून तुम्हाला तुमचं ऑर्कुट प्रोफाईल, स्क्रॅप्स, टेस्टिमोनियल्स, आणि कम्युनिटी पोस्ट्स सेव्ह करता येतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 30, 2014 08:20 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...