अॅप्लिकेशनची दुनियादारी !

अॅप्लिकेशनची दुनियादारी !

  • Share this:

blog amruta durve ibn lokmat- अमृता दुर्वे, सीनिअर  एडिटर प्रॉड्यूसर,IBN लोकमत

लाख दुखों की एक दवा... तसं काहीसं सध्या गॅजेट्सबद्दल झालंय. म्हणजे ट्रॅफिक अपडेट्सपासून ते हवामानाच्या अंदाजापर्यंत आणि कामाचं नियोजन करण्यापासून ते प्रत्यक्ष काम पूर्ण करण्यापर्यंतच सबकुछ गॅजेट्सवरून होऊ शकतं. तुमच्याकडचा स्मार्टफोन - टॅब्लेट वापरून हातात असलेला थोडा वेळ सत्कारणी लावण्याचे हे काही मार्ग.

पल्स न्यूज

तुम्हाला आवडणारे ब्लॉग्स, देशी-विदेशी वर्तमानपत्रं, मॅगझिन्स, सोशल नेटवर्क्स... गोष्टी एकत्र गाठायचा उत्तम मार्ग म्हणजे पल्स न्यूज अॅप्लिकेशन. तुम्हाला जे जे काही वाचायला आवडतं त्याची फक्त एकदा नोंद केलीत की मग तुम्हाला हव्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी इथे वाचायला मिळतील. म्हणजे अगदी खास तुमच्यासाठी तयार केलेलं मॅगझिन. तुम्ही फीडवर दिसणाऱ्या स्टोरीज लगेच वाचू शकता किंवा नंतर वाचण्यासाठी मार्क करून ठेवू शकता. अगदी तुम्ही पूर्णवेळ इंटरनेटशी जोडलेले नसलात, तरी तुम्हाला अगदी ऑफलाईनही या सगळ्या गोष्टी वाचता येतील. शिवाय एखादी गोष्टी शेअर करायची झाली तर ईमेल्स, फेसबुक किंवा ट्विटरवरून शेअरही करता येईल. गुगल रीडर आता बंद झालाय. पण त्याचसारखी सेवा तुम्हाला पल्स देईल. शिवाय अॅण्ड्रॉईड, iOS दोन्हीवर हे अॅप उपलब्ध असल्याने तुमच्या सगळ्या गॅजेट्स याच्याशी लिंक करता येतील.

 business-mobile-apps

गुगल ड्राईव्ह

स्कॅन केलेला एखादा महत्त्वाचा कागद नेमका कुठे सेव्ह केलाय, ते शोधावं लागणं किंवा त्याहूनही वाईट म्हणजे ते डॉक्युमेंट ज्यावर सेव्ह केलं ती हार्ड डिस्क किंवा पेन ड्राईव्ह सोबत नसणं वैताग देणारं असतं. प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टी एकत्र बाळगणंही कटकटीचं असतं. यावर उपाय - गुगल ड्राईव्ह. म्हणजे तुम्हाला जे जे हवंय ते सगळं तुमच्या या ऑनलाईन ड्राईव्हवर सेव्ह करा. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे मोबाईल फोन - लॅपटॉप - टॅब्लेट सगळीकडचा मालमसाला इथे एकत्र साठवता येईल. म्हणजे तुमचे फोटोज, व्हिडिओज्, महत्त्वाची डॉक्यमेंट्स, गाणी या सगळ्या गोष्टी इथे राहू शकतात. तुम्हाला जर एखादी गोष्ट कुणासोबत शेअर करायची असेल तर तीही करता येईल. इंटरनेट नसताना एखादी गोष्ट पाहायची असेल तर तसंही सेटिंग आहे. या गुगल ड्राईव्हवर स्प्रेडशीट्स तुम्हाला तयार करून एडिटही करता येतील. शिवाय तुमची अख्खी टीम मिळून एकाच स्प्रेडशीटवरही काम करू शकेल.

CamCard

एखाद्या नवीन व्यक्तीशी ओळख झाली की आपण बिझनेस कार्डसची देवाणघेणाण करतो. सेल्स - मार्केटिंग, स्वतःचा उद्योग असलेल्या व्यक्ती, पी.आर. या सगळ्यांसाठी तर ही कार्डस खूप महत्त्वाची. पण ती साठवणं आणि त्या गठ्ठ्यातून नेमकं हवं ते शोधणं कठीण जातं. त्याच्यासाठीचं खास अॅप कॅमकार्ड या कार्डचा वापर करून तुम्ही तुम्हाला हव्या त्या बिझनेस कार्डचा फोटो काढायचा, की त्यावरची सगळी माहिती तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सेव्ह केली जाते. शिवाय या कॅमकार्ड अॅप्लिकेशनच्या तुमच्या अकाऊंटमध्ये देखील हे कार्ड दाखल होतं. ही सगळी कार्ड तुम्ही तुम्हाला हव्या त्या पद्धतीने ऑर्गनाईझ करू शकता, वेगवेगळे ग्रुप्स तयार करू शकता आणि वेळ पडल्यास ते शोधू शकता. शिवाय तुम्ही तुमच्या स्वतःच्या बिझनेस कार्डवरही याच अॅप्लिकेशनच्या मदतीने अधिकची माहिती अॅड करू शकता. म्हणजे इतर कोणी या अॅप्लिकेशनच्या मदतीने तुमचं कार्ड स्कॅन केलं तर त्या माणसाला तुमच्या विषयीची ही अधिकची माहितीही आपोआप मिळते. शिवाय तुम्ही समजा कंपनी बदलली, कार्डात काही बदल केलेत तर ती माहितीदेखील तुम्ही अपडेट करू शकता.

First published: February 25, 2014, 11:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading