...'पैसा' तर आड आणत नाही ना !

...'पैसा' तर आड आणत नाही ना !

  • Share this:

Prafulla Pathak2- प्रफुल्ल पाठक, सेक्रेटरी जनरल, सोलार एनर्जी सोसायटी ऑफ इंडिया, दिल्ली

आपल्या लहानपणी लहान गावात, लहान खोल्यात, जमिनीवर झोपून मोठे झालेलो आपण..आपल्या त्या जुन्या काळाला विसरलो आणि नसत्या पैशाच्या आणि पैशाने सगळे विकत घेत येते. या विचाराचे झालो."प्रेम द्यायला विसरलो. दुसर्‍याला आपलं करायाल विसरलो...तर आपल्यासाठी आत्मियतेने कोण धावणार."आजही भारतात जोडले तर चांगले संबंध जोडता येतात. अर्ध्यारात्री धावणारी माणसे आहेत. आपण तसे संबंध निर्माण करण्यात "पैसा " तर आड आणत नाही न.

 

माझे चुलत सासरे. पनवेल ला राहायला गेले. अपार्टमेंटमध्ये. वय वर्षे ७०. पण तंदुरुस्त. कोणी ओळखीचे न पालखीचे. वेळ जाता जाईना. आपल्या अपार्टमेंटच्या आवारात पसरलेले दगड विटा बाजूला करून त्यांनी कामाला सुरुवात केली. त्यांना २-३ जणांनी बघितले. काही बोलले नाही. ३-४ दिवसांनी एकानी त्यांना म्हटले. हे काय करताय. आपले काम नाही त्यांनी विचारले  का? ' ते बिल्डरने करून द्यायला पाहिजे. पैसे मोजलेत आपण.' उत्तर आले. ते म्हणाले, आज आपल्याला जाता येता, या मुळे त्रास होतो. माझा वेळ जातो. थोडी अंग मेहनत होते. सर्वांची सोय होते. उरलेलं काम भले ही बिल्डर करो. माझ्या लहानपणी आम्ही हे सहज करायचो. माझ्या १ एकरच्या बंगल्यात, बाग काम करताना, गेली कित्येक वर्ष मी हे केले आहे. 'मला सवय आहे आणि मुख्य म्हणजे मला यात लाज वाटत नाही'. हातावर पाणी टाकायला विना मोबदला नौकर-चाकर असताना पण मी बागेत "सहज" मातीत काम करायचो. झाले त्या इतर २-३ जण आणि हे मिळून ४ जण एकत्र आले. सगळे पांढरपेशे. सगळे निवृत्त. सरकारी वा खाजगी सेवेतून.

 

"आपल्या स्वतःसाठी जे करायचे त्यात कसली लाज."अशी पहिली पाटी त्या सोसायटीच्या तळ मजल्यावरच्या १२-१२ च्या खोलीत ८-१० दिवसात लागली. त्या पूर्वी ह्या ३-४ निवृत्तांचे ६-७ झाले होते. रोज सकाळ संध्याकाळ व सोयीच्या वेळेला ते भेटायला लागले. रिकामी खोली ताब्यात घेताना शंका आली होती. बिल्डर उद्या आला  तर, भांडला, अंगावर आला तर. अर्थातच त्या परिस्थितीत पुढे होण्याची तयारी कोणी दाखवली हे वाचणाऱ्याच्या ध्यानात आले असेलच. आणि ४थ्या दिवशी आलाच तो.

 

"किसने किया ये". तो मोठ्या आवाजात ओरडला. त्याला  उत्तर गेले. "मी केले.   तुम्हाला मराठी येतं "बिल्डर ने उत्तर दिले  'हो.' त्याला उत्तर गेले 'एखादी जागा दुर्लक्षित आणि घाणेरड्या अवस्थेत असलेली "स्वछ निट  करणे "हे चूक आहे का..? आणि आम्ही त्याचा ताबा नाही घेतला, फक्त व्यवस्थित केली. आम्हाला बसायला जागा झाली. तुम्हाला जेव्हा काम असेल तेव्हा तुम्हाला मिळेल.  ५ मिनिटानंतर त्याच बिल्डर ने तिथे बसायला बाकडे आणून द्यायचे फर्मान आपल्या माणसाला सांगितले  वर "आजोबा,आणखी काय लागले तर सांगा" म्हणाला. आणि हसत परत गेला.

 

त्याच जागेत मराठी पुस्तके, वर्तमानपत्र आणि कोरे कागद आले. आजोबाना चित्र, फक्त पेंन्सील ने अन खूप सुंदर काढता यायची. पण पहिले काम त्यांनी केले ते त्या जागेत "आपल्या स्वतःसाठी जे करायचे त्यात कसली लाज."  अशी  पाटी लावली. अशा आजोबांच्या टीम चे सदस्य ६ महिन्यात २० झाले. दिवसभर ही मंडळी बाहेर राहतात. घरात पाय टिकत नाही यांचा. अशा तक्रारी सुरु झाल्या. आनंदाच्या क्षणांची वाढ झाली. आणि दुखले खुपले तर या सर्वांच्या बैठका त्या पार्टनर च्या बिछाण्याशेजारी व्हायला लागल्या.  आजोबांची आजी, असली तर,  नौकरीवर जाणारी सुन, मुलगा सगळे या कंपू वर जाम  खुश.  त्यांच्या अनुपस्थितीत घरात "मोठ्यांचे गोकुळ " असायचे. त्यामुळे जाताना व येताना डॉक्टर कडेजाणे, औषध आणणे ते आनंदाने करायचे.जे दार कधीच किलकिले होत नव्हते त्या दाराला आजकाल आतून कडी नसायची. अति उच्च पदावरून निवृत्त झालेल्या त्या मालकाला आपण "कोणीतरी" होतो याचा विसर पडला. सर्वांची जात,धर्म,प्रांत,भाषा,परिस्थिती एक झाली. अवघ्या एका वर्षात त्या ठिकाणचा नूरच पालटला.

 

या कंपूचे किती किती फायदे आहेत हे त्यांच्या नंतरच्या पिढीला कळायला लागले. पैसे देऊन जे विकत मिळू शकत नाही ते "शेजारधर्म ,मानवधर्म  आणि स्वतः थोडे पुढे झाले, मन मोठे करून" तर होऊ शकते. हे आमच्या आजोबांनी पुढे होऊन करून दाखवले.  आपल्या लहानपणी लहान गावात, लहान खोल्यात, जमिनीवर झोपून मोठे झालेलो आपण....आपल्या त्या जुन्या काळाला  विसरलो आणि नसत्या पैशाच्या आणि पैशाने सगळे विकत घेत येते. या विचाराचे झालो. " प्रेम द्यायला विसरलो. दुसर्‍याला आपलं करायाल विसरलो ...तर आपल्यासाठी आत्मियतेने कोण धावणार. "आजही भारतात जोडले तर चांगले संबंध जोडता येतात. अर्ध्यारात्री धावणारी माणसे . आहेत. आपण तसे संबंध निर्माण करण्यात "पैसा "तर आड आणत नाही न.

First published: September 18, 2013, 10:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading