#बाप्पामोरयारे, घरोघरी आणि मंडळांमध्ये बाप्पांचं वाजतगाजत स्वागत

#बाप्पामोरयारे, घरोघरी आणि मंडळांमध्ये बाप्पांचं वाजतगाजत स्वागत

आजपासून पुढील 12 दिवस आपला लाडक्या बाप्पा आपल्यासोबत राहणाराय.

  • Share this:

25 आॅगस्ट : गणपती बाप्पा मोरया..मंगलमूर्ती मोरया.. म्हणत ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळणं करत लाडक्या गणरायाचं आगमन झालंय. राज्यभरात आपल्या लाडक्या बाप्पा घरी आणण्यासाठी भक्तांनी बाजारात गर्दी केलीय. तर गणेश मंडळाचे मोठे गणपती रस्त्यावरून वाजत गाजत मंडळाच्या दिशेनं निघाले आहे. विशेष म्हणजे आजपासून पुढील 12 दिवस आपला लाडक्या बाप्पा आपल्यासोबत राहणार आहे.

घरोघरी बसणाऱ्या गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना झाली. गणेशमूर्तींसोबतच बाप्पाच्या पूजेसाठी लागणारं साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी झालीये. फुलबाजारातही गर्दी झालीये. तसंच गणपतीबाप्पाचे आवडते खास मोदक घेण्यासाठी मिठाईच्या दुकानात भक्तांनी गर्दी केलीय. संपूर्ण महाराष्ट्र आज गणेशमय झालाय.मुंबई,पुणे आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या मंडळांच्या गणपतींचं पूजन सुरू झालंय. अनेक सेलिब्रिटीज गणेस दर्शनासाठी उपस्थित आहेत.

पुण्यात मानाच्या गणपतींचं आगमन

महाराष्ट्राची सांस्कृतिक नगरी पुण्यात आज गणरायाचं मोठ्या दिमखात आगमन होत आहे. यानिमित्ताने पुण्यात मांगल्य आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. पुण्यातील 5 मानाच्या गणपतींची दुपारपर्यंत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा वगळता सर्व चार आणि अखिल मंडई गणेश मंडळ आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळांच्या गणपतींचीही प्राणप्रतिष्ठा दुपारपर्यंत होणार आहे. तत्पूर्वी सर्वच मंडळ श्रींची मिरवणूक काढणार आहेत. या मिरवणुकांमध्ये पारंपारिक वाद्यासह विविध पथके सहभागी होणार आहेत.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं लोभस रुप यंदा आणखी झळाळून आलंय. कारण यंदा बाप्पाला 40 किलो सोन्याचे नवे दागिने चढवण्यात आले आहेत.  दगडूशेठ गणपती करिता खास पीएनजी ज्वेलेर्समध्ये ४० किलो सोन्याचे आणि रत्नांचे दागिने तयार केलेय. दगडूशेठ गणपतीच्या दानपेटीमध्ये जमा झालेल्या सोन्यातून ही आभूषणं बनविण्यात आली आहे. मुकूट, प्रभावळ, शुंडाभुषण, अंगरखा, उपरणे, पितांबर आणि कान अशी विविध आभूषणे घडवण्यात आली आहेत. या दागिन्यांवर माणिक, हिरे आणि पांचू अशी रत्न चढविण्यात आली आहेत. तब्बल 60 करागिरांनी पाच महिने अहोरात्र कठोर परिश्रम करून ही आभूषणं साकारली आहेत.

कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह

संपूर्ण कोकणातही गणेशोत्सवाचा उत्साह संचारलाय. अस्सल पारंपरिक आणि घरगुती गणेशोत्सवाचं विशेष महत्त्व असणाऱ्या सिंधुदुर्गातले गणेशभक्त नव्या शेता-भातातून आपल्या लाडक्या गणरायाला घरी घेऊन जातायत. प्रथेप्रमाणे गणरायाची दृष्ट काढून त्याला स्थानापन्न करत आहे. गणपतीच्या सजावटीसाठी लावली जाणारी माटवीही पारंपरिक पद्धतीनेच नव्याने रुजुन आलेल्या पाना फुलांनी सजवली जातेय. महागाईची झळ बसत असली तरीही कोकणात यंदा लाखोंच्या संख्येने चाकरमानी दाखल झालेत. आजपासून गौरी गणपतीच्या विसर्जनापर्यंत पुढचे पाच दिवस भजनं आणि लोककलांनी कोकणातला हा गणेशोत्सव बहरून जाणार आहे.

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रिघ

मुंबईतल्या उत्सवांचं माहेरघर म्हणजे लालबाग-परळ. याच लालबाग-परळ मधील गणेशोत्सव पहाण्यासाठी जगभरातील गणेशभक्तं दरवर्षी येत असतात. इथल्या उत्सवाची शान आहे तो म्हणजे लालबागचा राजा. यंदा कासवावर स्वार होऊन लालबागचा राजा आलाय. नवसाला पावणारा राजा अशी ख्याती असेलेला लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहिल्या दिवशी पहाटेपासूनच भक्तांची रिघ लागली आहे. या मंडळाचं 83 वं वर्ष आहे. लालबागच्या राजाच्या मुखदर्शनासाठीच्या तीन रांगा, आणि नवसाची एक रांग आहे.अख्खं वातावरणच बाप्पामय झालंय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 25, 2017 09:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading