#बाप्पामोरयारे - पिंपरीत बनतायत पंचगव्याच्या पर्यावरणपूरक मूर्ती

#बाप्पामोरयारे - पिंपरीत बनतायत पंचगव्याच्या पर्यावरणपूरक मूर्ती

या मूर्ती आहेत, पंचगव्य गणेश मूर्ती . शाडू मातीमध्ये गाईच्या शेणाबरोबरच गोमूत्र,तूप आणि दूध एकत्र मिसळून या मूर्ती तयार केल्या आहेत. पिंपरी चिंचवडमधल्या नितीन घोटकुले आणि संदीप या दोन तरुणांनी काही वर्षांपासून या मूर्ती तयार करायला सुरुवात केली.

  • Share this:

गोविंद वाकडे, पिंपरी, 21 आॅगस्ट : घरोघरी आता जय्यत तयारी सुरू आहे ती बाप्पाच्या आगमनाची. आपली बाप्पाची मूर्ती एकदम वेगळी असेल यासाठी सगळेच प्रयत्न करतायेत. पण पिंपरीतले हे तरूण खरोखर आगळ्यावेगळ्या मूर्ती तयार करतायेत.

या मूर्ती आहेत, पंचगव्य गणेश मूर्ती . शाडू मातीमध्ये गाईच्या शेणाबरोबरच गोमूत्र,तूप आणि दूध एकत्र मिसळून या मूर्ती तयार केल्या आहेत. पिंपरी चिंचवडमधल्या नितीन घोटकुले आणि संदीप या दोन तरुणांनी काही वर्षांपासून या मूर्ती तयार करायला सुरुवात केली आणि आता या पर्यावरणपूरक मूर्तींची मागणी भरपूर वाढली आहे

खरं तर शेणाच्या मूर्ती म्हटल्यावर सुरुवातीला अनेकांनी नाकं मुरडली होती. पण आता मात्र या पर्यावरणपूरक मूर्तींचं महत्त्व पटू लागलंय.

गेल्या दोन वर्षात नितीन आणि त्यांच्या सहकार्यांनी गोबर गणेशाच्या अशा दोन हजारापेक्षा जास्त मूर्तींची निर्मिती केली.आता यावर्षी आणखी मागणी वाढल्यानं त्यांचा उत्साहही वाढलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2017 07:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading