दगडूशेठ गणपतीला सोन्याची नवी झळाळी

दगडूशेठ गणपतीला सोन्याची नवी झळाळी

मुकुट, प्रभावळ, शुंडाभूषण, अंगरखा, उपरणे, पितांबर आणि कान अशी विविध आभूषणे घडवण्यात आली आहेत. या दागिन्यांवर माणिक, हिरे आणि पांचू अशी रत्न चढविण्यात आली आहेत.

  • Share this:

पुणे, 25 आॅगस्ट : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं लोभस रूप यंदा आणखी झळाळून आलंय. कारण यंदा बाप्पाला 40 किलो सोन्याचे नवे दागिने चढवण्यात आलेत. दगडूशेठ गणपतीकरता खास पीएनजी ज्वेलेर्सनं ४० किलो सोन्याचे आणि रत्नांचे दागिने तयार केलेत.  दगडूशेठ गणपतीच्या दानपेटीमध्ये जमा झालेल्या सोन्यातून ही आभूषणं बनवण्यात आली आहे.

मुकुट, प्रभावळ, शुंडाभूषण, अंगरखा, उपरणे, पितांबर आणि कान अशी विविध आभूषणे घडवण्यात आली आहेत. या दागिन्यांवर माणिक, हिरे आणि पांचू अशी रत्न चढविण्यात आली आहेत. तब्बल 60 करागिरांनी पाच महिने अहोरात्र कठोर परिश्रम करून ही आभूषणं साकारली आहेत.

First published: August 25, 2017, 9:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading