UPSC परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव, रद्द होऊ शकतात हे टप्पे

UPSC म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या स्वरूपात बदल करण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये सिव्हिल सर्व्हिसच्या परीक्षेत अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट आणि इंटरव्ह्यू रद्द करण्याच्या मुद्द्यांचा समावेश आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 21, 2019 06:51 PM IST

UPSC परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव, रद्द होऊ शकतात हे टप्पे

नवी दिल्ली, 21 ऑगस्ट : UPSC म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या स्वरूपात बदल करण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये सिव्हिल सर्व्हिसच्या परीक्षेत अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट आणि इंटरव्ह्यू रद्द करण्याच्या मुद्द्यांचा समावेश आहे.

UPSC परीक्षेत बदल करण्याचा हा प्रस्ताव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देण्यात आला आहे. या परीक्षेत असलेल्या अ‍ॅप्टिट्यूड टेस्टच्या ऐवजी मानसिक क्षमता चाचणी घ्यावी, असं या प्रस्तावात म्हटलं आहे. UPSC स्पर्धा परीक्षेचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तज्ज्ञांची एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीने या सुधारणा सुचवल्या आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हा प्रस्ताव दिल्लीमधल्या एका कार्यक्रमात दिला. त्यावेळी सरसंघचालक मोहन भागवत, केंद्र सरकार आणि यूपीएससीचे खास प्रतिनिधी उपस्थित होते.

बदलाचा प्रस्ताव का ?

UPSC परीक्षेत सगळ्यांना समान संधी मिळावी यासाठी या सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत. यूपीएससी परीक्षेमध्ये नोकरीसाठी आवश्यक असणाऱ्या क्षमतांची पडताळणी होत नाही, असं या समितीचं म्हणणं आहे.अ‍ॅप्टिट्यूड टेस्टमध्ये हिंदी माध्यमातून आलेल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. त्याचबरोबर मुलाखतीही समान पद्धतीने होत नाहीत, असंही समितीचं म्हणणं आहे.

Loading...

मुलाखत रद्द का व्हावी ?

UPSC परीक्षेत घेतल्या जाणाऱ्या मुलाखतीत समानता नसते. वेगवेगळ्या तज्ज्ञांचं पॅनल वेगवेगळ्या स्पर्धकांच्या मुलाखती घेतं. त्यामुळे मुलाखतीचं पॅनल कसं असेल यावर त्या विद्यार्थ्याचं भवितव्य अवलंबून असतं. मुलाखतींचं स्वरूप एकच असावं यासाठी तज्ज्ञांना प्रशिक्षण दिलं पाहिजे, असंही या प्रस्तावात म्हटलं आहे.या मुलाखतींऐवजी लष्कराप्रमाणेच त्या उमेदवाराची मानसिक चाचणी घ्यायला हवी, असं तज्ज्ञांनी सुचवलं आहे. प्रिलिम्सप्रमाणेच मुख्य परीक्षेची उत्तरपत्रिका देण्याचाही प्रस्ताव यात आहे.

ITR भरण्यासाठी आता उरले फक्त 10 दिवस, नाहीतर पडेल भुर्दंड

==========================================================================================

राज ठाकरेंना ईडी नोटिसीबद्दल आंबेडकरांनी बाळा नांदगावकरांना काय सांगितलं होतं?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2019 06:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...