पाकिस्तानातही 'गणपती बाप्पा मोरया', कराचीत गणेशोत्सवाची धूम

पाकिस्तानातही 'गणपती बाप्पा मोरया', कराचीत गणेशोत्सवाची धूम

  • Share this:

 28 आॅगस्ट : गणेशोत्सव देशविदेशांतही साजरा होतोय. पाकिस्तानातही गणपती बाप्पाचा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कराचीमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी सार्वजनिकरित्या हा उत्सव साजरा केला जातोय. कराचीतल्या विविध मंदिरांमध्ये तर हा उत्सव साजरा होतोच. पण इतरही ठिकाणी अगदी मंडप घालून गणपती बाप्पाला वाजतगाजत आणलं जातं. पाकिस्तानात गेल्या अनेक पिढ्यांपासून राहणारे मराठी लोक एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात. श्री स्वामी नारायण मंदिर, शिव मंदिर क्लिफ्टन, गणेश मठ मंदिर, दिल्ली कॉलनी, जिना मद्रासी हिंदू कॉलनी, इटीसी, अशा ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशाची अगदी साग्रसंगीत पूजा केली जाते. नैवेद्याला मोदकही केले जातात. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. मिरवणूक काढली जाते, आरतीही मोठ्या थाटात केली जाते. या मिरवणुकीत, आरतीत फक्त मराठी लोक नाही तर पाकिस्तानातले हिंदू धर्मियही उत्साहानं सहभागी होतात. खास मराठी जेवणाचा बेतही असतो.गेली अनेक वर्ष कराचीत साजरा केल्या जाणाऱ्या या उत्सवाला स्थानिक प्रशासनाचं नेहमीच सहकार्य असतं.


28 आॅगस्ट : गणेशोत्सव देशविदेशांतही साजरा होतोय. पाकिस्तानातही गणपती बाप्पाचा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कराचीमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी सार्वजनिकरित्या हा उत्सव साजरा केला जातोय.
कराचीतल्या विविध मंदिरांमध्ये तर हा उत्सव साजरा होतोच. पण इतरही ठिकाणी अगदी मंडप घालून गणपती बाप्पाला वाजतगाजत आणलं जातं. पाकिस्तानात गेल्या अनेक पिढ्यांपासून राहणारे मराठी लोक एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात.
श्री स्वामी नारायण मंदिर, शिव मंदिर क्लिफ्टन, गणेश मठ मंदिर, दिल्ली कॉलनी, जिना मद्रासी हिंदू कॉलनी, इटीसी, अशा ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशाची अगदी साग्रसंगीत पूजा केली जाते. नैवेद्याला मोदकही केले जातात.
विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. मिरवणूक काढली जाते, आरतीही मोठ्या थाटात केली जाते. या मिरवणुकीत, आरतीत फक्त मराठी लोक नाही तर पाकिस्तानातले हिंदू धर्मियही उत्साहानं सहभागी होतात. खास मराठी जेवणाचा बेतही असतो.गेली अनेक वर्ष कराचीत साजरा केल्या जाणाऱ्या या उत्सवाला स्थानिक प्रशासनाचं नेहमीच सहकार्य असतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2017 08:43 PM IST

ताज्या बातम्या