मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /आपत्कालीन सेवेतील वाहनांवर लाल आणि निळ्या रंगाचेच दिवे का असतात?; 'ही' आहेत कारणं

आपत्कालीन सेवेतील वाहनांवर लाल आणि निळ्या रंगाचेच दिवे का असतात?; 'ही' आहेत कारणं

या रंगाचे इर्मजन्सी दिवे (Emergency Light) महत्त्वाच्या कामांसाठी वापरले जातात

या रंगाचे इर्मजन्सी दिवे (Emergency Light) महत्त्वाच्या कामांसाठी वापरले जातात

या रंगाचे इर्मजन्सी दिवे (Emergency Light) महत्त्वाच्या कामांसाठी वापरले जातात

    नवी दिल्ली, 30 मे: एखाद्यावेळी रस्त्यावर प्रवास करताना आपल्या पाठीमागून सायरनचा आवाज करत लाल किंवा निळा दिवा असलेले वाहन (Red And Blue Light Vehicle) येत असल्याचं आपल्या लक्षात येतं. त्यावरील दिवे पाहताच संबंधित वाहन आपत्कालीन सेवेतील (Emergency Service) आहे, हे आपल्याला समजतं. हे वाहन फायर ब्रिगेड किंवा रुग्णवाहिका देखील असू शकतं. अनेकदा हे वाहन पोलिसांचे पण असू शकतं. पण अशा महत्वाच्या वाहनांवर केवळ लाल किंवा निळ्या रंगाचा दिवाच का लावतात, हा प्रश्न अनेकदा तुमच्या मनात नक्कीच आला असेल. जाणून घेऊया या मागील कारणं...

    लाल आणि निळा दिवा वापरण्याची ही आहेत कारणे

    ड्राईव्ह स्पिकच्या वृत्तानुसार, लाल दिवा हा थांबणे किंवा इशाऱ्यासाठी वापरला जातो. वाहनांवरील लाल आपत्कालीन दिवे जड वाहतुकीदरम्यान अनेकदा दिसून येत नाहीत. त्यामुळे बहुतेक टेल (Tail lamp) किंवा खालील बाजूचे दिवेही लाल रंगाचे असतात. मात्र निळ्या रंगाचे दिवे हे दिसण्यास थोडे वेगळे असतात, त्यामुळे हे दिवे लागलेले दिसताच वाहनचालक त्वरित सावध होऊ शकतो. तसेच एका संशोधनानुसार (Research) लाल दिवे हे दिवसा स्पष्टपणे दिसू शकतात तर निळे दिवे रात्रीच्या वेळी स्पष्ट दिसतात, असं दिसून आलं आहे. त्यामुळे लाल आणि निळ्या दिव्यांचा एकत्रित वापर केल्यानं रात्र आहे की दिवस हे पाहावं लागत नाही. तसेच ज्या वाहन चालकांना (Driver) रंग आंधळेपणाची समस्या आहे, ती लाल आणि निळा दिवा लावल्यानं कमी प्रमाणात जाणवते. तसेच ज्या लोकांना लाल रंग पाहताना त्रास होतो, त्यांना सहसा निळ्या रंगाचा दिवा पाहताना त्रास होत नाही, असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

    ...तर टोल प्लाझावर Toll भरू नका; मोदी सरकारचा वाहनधारकांना मोठा दिलासा

    आपत्कालीन वेळी वापरले जातात या रंगांचे दिवे

    या रंगाचे इर्मजन्सी दिवे (Emergency Light) महत्त्वाच्या कामांसाठी वापरले जातात. सर्व प्रथम या आपत्कालीन वाहनाचा प्रवास का गरजेचा आहे, हे या दिव्यांच्या माध्यमातून दर्शवले जाते. एखादी रुग्णवाहिका अपघातस्थळी किंवा अपघात स्थळावरुन रुग्णालयाकडे रुग्ण घेऊन जात आहे, अशी माहिती रस्त्यावरील अन्य प्रवाशांना मिळावी, यासाठी रुग्णवाहिका चालकाकडून या दिव्यांचा वापर केला जातो. यामुळे मार्गावरील अन्य प्रवासी या रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करुन देतात. त्याच प्रमाणे दुर्घटना स्थळी किंवा अन्य धोकादायक ठिकाणांजवळ देखील इमर्जन्सी वाहने हे दिवे लावून अन्य लोकांना इशारा देण्यासाठी उभी केली जाऊ शकतात. तसेच या रंगाच्या इमर्जन्सी दिव्यांमुळे अन्य वाहनचालकांना संबंधित भागात काही तरी दुर्घटना घडल्याची माहिती मिळते. यामुळे घटनास्थळ जवळ येताच अन्य वाहनचालक आपल्या वाहनाचा वेग नियंत्रणात आणत पुढे जातात.

    First published:

    Tags: Maharashtra, Mumbai, Vehicles