मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

एकही रुपया न देता घरी आणा ही जबरदस्त बाईक, पैसे नसले तरीही नो टेन्शन, स्पीडही सुस्साट!

एकही रुपया न देता घरी आणा ही जबरदस्त बाईक, पैसे नसले तरीही नो टेन्शन, स्पीडही सुस्साट!

अलीकडे बुलेट, स्पोर्ट्स बाइककडे तरुणाईचा कल वाढत आहे. लाँग ड्राइव्हसाठी अनेक तरुण बुलेटचा वापर करताना दिसतात. तुम्ही अशा प्रकारच्या बाइक घेण्याचं नियोजन करत असलात, पण आर्थिक समस्यांमुळे बाइक खरेदी शक्य होत नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 25 जानेवारी : अलीकडे बुलेट, स्पोर्ट्स बाइककडे तरुणाईचा कल वाढत आहे. लाँग ड्राइव्हसाठी अनेक तरुण बुलेटचा वापर करताना दिसतात. तुम्ही अशा प्रकारच्या बाइक घेण्याचं नियोजन करत असलात, पण आर्थिक समस्यांमुळे बाइक खरेदी शक्य होत नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. येझदी ही जगातली प्रमुख वाहन उत्पादक कंपनी झीरो डाउन पेमेंटवर त्यांची कोणतीही बाइक खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. येझदीने भारतीय मार्केटमध्ये रोडस्टर, अ‍ॅडव्हेंचर आणि स्क्रँबलर अशी तीन खास मॉडेल्स लाँच केली आहेत. त्यामुळे तुम्ही अगदी कमी खर्चात यापैकी एक मॉडेल खरेदी करू शकता.

येझदीने एक खास ऑफर ग्राहकांसाठी लाँच केली आहे. त्यानुसार ग्राहक अगदी कमी खर्चात आणि झीरो डाउन पेमेंटमध्ये रोडस्टर, अ‍ॅडव्हेंचर किंवा स्क्रँबलर या तीनपैकी एक बाइक खरेदी करू शकतात. येझदीने कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून या संदर्भात माहिती दिली आहे. ग्राहक या ब्रँडची कोणतीही बाइक निवडू शकतात. या ऑफरनुसार तुम्हाला 5.99 टक्के दराने अगदी सहजसोप्या हप्त्यांत बाइकसाठी अर्थसाह्य केलं जाईल. चार वर्षं कालावधीच्या या अर्थसाह्यांतर्गत तुम्हाला महिन्याला हप्त्यापोटी 4,873 रुपये ईएमआय भरावा लागेल. ही ऑफर केवळ आयडीएफसी बँकेच्या वाहन वित्त पुरवठ्यावर लागू आहे. बाइक ऑनलाइन बुक करण्यासाठी टोकन अमाउंट म्हणून पाच हजार रुपये भरावे लागतील.

येझदीच्या रोडस्टर मॉडेलविषयी बोलायचं तर कंपनीच्या या मॉडेलचं डिझाइन आणि लूक मस्क्युलर आहे. रायडर आणि पाठीमागे बसणाऱ्याला आरामदायी प्रवास करता यावा यासाठी या बाइकला स्प्लिट सीट देण्यात आल्या आहेत. या बाइकमध्ये 334ccचं लिक्विड कूल्ड इंजिन असून ते 29.7PS मॅक्स पॉवर आणि 29 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. या इंजिनला 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. याशिवाय या बाइकमध्ये ट्विन एक्झॉस्ट देण्यात आले आहेत. या बाइकचं एकूण वजन 194 किलोग्रॅम आहे. बाइकच्या इंधन टाकीची क्षमता 12.5 लीटर आहे. बाइकचा व्हीलबेस 1440 mm आणि सीट हाइट 790mm आहे. ही बाइक सात वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात सीन सिल्व्हर, हंटर ग्रीन, स्मोक ग्रे, ग्लॅसिअल व्हाइट, गॅलेंट ग्रे, इन्फर्नो रेड आणि स्टील ब्लूचा समावेश आहे. दिल्लीत या बाइकची किंमत 2,01,142 रुपये (एक्स -शोरुम) आहे.

2022 मध्ये, येझदी बाइक्सने 26 वर्षांनंतर भारतात पुनरागमन केलं. यापूर्वी येझदी बाइक्स 1960 च्या उत्तरार्धात भारतीय बाजारात लाँच करण्यात आल्या होत्या. त्यानंतर 90 च्या दशकात या बाइकचं उत्पादन बंद झालं. त्या वेळी या बाइक रोडकिंग, क्लासिक, मोनार्क ब्रँडनेमने येत होत्या. सुमारे 30 वर्षांपर्यंत भारतीय बाजारात या बाइकला चांगली पसंती मिळाली. त्या वेळच्या अनेक चित्रपटांमध्ये या बाइक पाहायला मिळतात.

First published: