अगदी जवळ येऊन ठेपलेल्या सणासुदीच्या दिवसांचे औचित्य साधून भारतातील अत्यंत लोकप्रिय आणि अग्रमानांकित स्मार्टफोन ब्रँड असलेले Redmi हे mi.com आपल्या अधिकृत संकेतस्थळावरून एक दिवाळी सेल सुरु करत आहे. यामध्ये स्मार्टफोन्स आणि अॅक्सेसरीजवर अभूतपूर्व सवलत मिळणार आहे. हा सेल 16 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे आणि 21 ऑक्टोबर रोजी संपणार आहे.
भारतातील सर्वांत मोठ्या सणाच्या निमित्ताने Redmi India ने अनेक विस्मयकारक डील्स जाहीर केले आहेत. जसे की, Redmi Note 9 Series या अत्यंत लोकप्रिय सिरीजवर तसेच ‘देश का स्मार्टफोन’ अशी ओळख असलेल्या Redmi 9A सह ऑडीओ प्रोडक्ट्स व अॅक्सेसरीज यांवर पहिल्यांदाच सवलत घोषित करताना आतापर्यंतच्या सर्वांत कमी किंमतीची घोषणा केली आहे. एवढेच नाही तर, ग्राहकांना या भव्य डिस्काऊंट्सच्याही पुढे जाऊन, Axis Bank कार्ड्स व Bank of Baroda क्रेडीट कार्ड्सच्या वापरावर ₹1000 ची त्वरित सवलत मिळवून बचत करता येईल.
रेडमी इंडिया तर्फे प्रमुख ऑफर्स:
Products | Diwali Offer price | MRP |
Redmi Note 9 | 10999 | 14999 |
Redmi Note 9 Pro | 12999 | 16999 |
Redmi Note 9 Pro Max | 15999 | 18999 |
Redmi Smart Band | 1399 | 2099 |
Redmi Earbuds 2C | 1299 | 1999 |
₹18999 किंमतीसह बाजारात दाखल झालेला आणि प्रो कॅमेराज आणि मॅक्स परफॉर्मन्स असलेला Redmi Note 9 Pro Max हा स्मार्टफोन केवळ ₹15999 या किंमतीमध्ये उपलब्ध आहे. तर, Redmi Note 9 Pro हा परफॉर्मन्स पॉवरहाऊस म्हणून प्रसिद्ध असलेला फोन ₹16,999 किंमतीला बाजारात आला होता तो आता ₹12,999 या किंमतीला मिळणार आहे. ही दोन्ही मॉडेल्स 12 व 6 महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआयवर उपलब्ध आहेत. ₹14,999 या किंमतीपासून मिळणारा Redmi Note 9 हा निर्विवाद चॅम्पियन ठरलेला फोन आतापर्यंतच्या सर्वांत कमी किंमतीला म्हणजेच ₹10,999 पासून उपलब्ध होणार आहे.
दमदार कामगिरी, आकर्षक डिस्प्ले, आणि उत्कृष्ट कॅमेराचा अनुभव रास्त दरात देण्यासाठी प्रसिद्ध असलेले Redmi 9 सिरीज फोन्सही या मर्यादित काळाच्या पहिल्या-वहिल्या सवलतीमध्ये समाविष्ट आहेत. उदा. ₹13,999 किंमतीचा Redmi 9 Prime (4GB + 128GB) केवळ ₹10,999 किंमतीला आपण खरेदी करू शकता. त्याचबरोबर, Redmi 9i सुद्धा ₹8,299 किंमतीत उपलब्ध आहे. ₹8,499 ला मिळणारा, देश का स्मार्टफोन म्हणून ओळखला जाणारा आणि लाखो भारतीयांच्या पसंतीस उतरलेला Redmi 9A केवळ ₹6,499ला मिळणार आहे.

तसेच हा लोकप्रिय ब्रँड त्याच्या लाईफस्टाईल प्रोडक्ट्स आणि नुकत्याच बाजारात आलेल्या SonicBass Wireless Earphones सारखे वेअरेबल्स यांवर मूळ किंमतीच्या जवळपास दोन तृतीयांश किंमतीने उपलब्ध करून दिवाळीचा आनंद द्विगुणीत केला आहे. Redmi Earbuds 2C व S यांवर भरघोस सूट मिळून त्यांच्या किंमती अनुक्रमे Rs. 1,299 and Rs. 1,499 झाल्याने आपण आपल्या बजेटमध्ये ट्रुली वायरलेसची निवड करू शकता.
या सेलदरम्यान, आपण ₹1 फ्लॅश सेलमध्ये सहभागी होऊन केवळ ₹1मध्ये Redmi Note 9 Pro, Mi TV, आणि बरेच काही जिंकू शकता. किंवा पिक अँड चूझ बंडल ऑफर्सच्या मदतीने खूप बचत करू शकता. Mi Gift Cardsच्या मदतीने आपण आपल्या मित्र व प्रियजनांची दिवाळी प्रकाशमय करू शकता.
Mi बरोबर आपली दिवाळी प्रकाशमान करण्यासाठी सज्ज व्हा आणि
येथून आपल्या पसंतीची Redmi प्रोडक्ट्स मिळवा.
ही एक भागीदारीतील पोस्ट आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.