मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

अरेच्च्या! पूर्णपणे फिरतो हा Samsung रोटेट होणारा Smart TV; किंमत, फीचर्सबद्दल वाचा सविस्तर

अरेच्च्या! पूर्णपणे फिरतो हा Samsung रोटेट होणारा Smart TV; किंमत, फीचर्सबद्दल वाचा सविस्तर

 या टीव्हीचे वैशिष्ट्य म्हणजे एक बटण दाबल्यावर हा टीव्ही व्हर्टिकल  (उभा)आणि हॉरिझॉन्टली (आडवा) फिरू शकतो.

या टीव्हीचे वैशिष्ट्य म्हणजे एक बटण दाबल्यावर हा टीव्ही व्हर्टिकल (उभा)आणि हॉरिझॉन्टली (आडवा) फिरू शकतो.

या टीव्हीचे वैशिष्ट्य म्हणजे एक बटण दाबल्यावर हा टीव्ही व्हर्टिकल (उभा)आणि हॉरिझॉन्टली (आडवा) फिरू शकतो.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : भारतातील सर्वात विश्वासू आणि मोठा इलेक्ट्रॉनिक ब्रँड असणाऱ्या सॅमसंगने (Samsung) स्मार्ट टीव्हीचे (Smart TV) नवीन मॉडेल लाँच केले आहे. ‘द सेरो’ असे या टीव्हीच्या मॉडेलचे नाव असून सॅमसंगने स्मार्ट टीव्हीच्या मार्केटमध्ये आणखी एक दर्जेदार टीव्हीची भर टाकली आहे. या टीव्हीचे वैशिष्ट्य म्हणजे एक बटण दाबल्यावर हा टीव्ही व्हर्टिकल  (उभा)आणि हॉरिझॉन्टली (आडवा) फिरू शकतो. देशभरातील रिलायन्स स्टोअरमध्ये द सेरो हे मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध असून  1,24,990 रुपयांच्या किमतीत तुम्ही याची खरेदी करू शकता.

हा नवीन टीव्ही डिझाईनच्या दुनियेतील चमत्कार आहे. विशेष टीव्ही आणि अशा प्रकारचे गॅझेट आवडणाऱ्या ग्राहकांसाठी हा टीव्ही तयार करण्यात आला आहे. कमी जागेत देखील हा टीव्ही बसत असून 360° क्लीन डिजाइनमध्ये हा टीव्ही खूपच सुंदर दिसतो. त्याचबरोबर नेव्ही ब्लु रंगाच्या स्टॅण्डमुळे त्याची सुंदरता आणखी खुलून दिसू शकते. या टीव्हीचे नाव द सेरो हे व्हर्टिकल या शब्दाचे कोरियन भाषांतर आहे. यामध्ये रिमोटच्या मदतीने तुम्ही हव्या त्या दिशेला टीव्हीचे तोंड करू शकता. आजच्या तरुण पिढीच्या हिशोबाने हे डिझाइन केलं आहे. तरुण पिढी टीव्हीवर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन कन्टेन्ट पाहत असते. त्यामुळे सोशल मीडिया कंटेंट, स्ट्रीमिंग सर्विसेज आणि  गेमिंगच्या दृष्टीने हा टीव्ही तयार करण्यात आला आहे.

हे ही वाचा-WhatsApp युजर्ससाठी मोठी बातमी; ॲपमध्ये नवं 'Shopping Button'

मोठ्या प्रमाणात संशोधन करून या सर्व सुविधा या टीव्हीमध्ये देण्यात आल्या आहेत. मोबाईल कन्टेन्टचं मिरर सुविधा वापरून प्रदर्शन करण्यासाठी टीव्हीची स्क्रीन स्वयंचलितपणे फिरते आणि अशा प्रकारे मोबाइल-ऑप्टिमाइझ केलेला एक अनोखा अनुभव प्रदान करते. रिमोट कंट्रोल, व्हॉईस कमांड आणि स्मार्ट अपद्वारे तुम्ही टीव्हीची ही स्क्रीन फिरवू शकता. या टीव्हीमध्ये विशेष पद्धतीने डिझाईन करण्यात आलेले 4.1ch 60W फ्रंट फायरिंग स्पीकर बसवण्यात आले आहेत. तुम्हाला गाणी ऐकायची असतील किंवा मोबाईल कन्टेन्ट मिरर करायचा असेल तर तुम्ही या आवाजाचा आनंद घेऊ शकता. त्याचबरोबर सिनेमा पाहताना देखील तुम्हाला या आवाजाचा आनंद घेता येईल.

या टीव्हीमध्ये सॅमसंगच्या QLED टेक्नोलॉजी बरोबरच अनेक सुंदर फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये तुमच्या गरजेप्रमाणे फीचर्स देण्यात आले असून तुम्ही हव्या त्या पद्दतीने याचा आनंद घेऊ शकता. यामध्ये तुम्ही फोनवरूनच टॅप करून मोबाईल कंटेंट टीव्हीवर पाहू शकता. त्याचबरोबर एक अरब रंग आणि शेड्सबरोबर 100% कलर वॉल्यूम तुम्हाला या टीव्हीमध्ये मिळणार आहे. यामध्ये तुमच्या कंटेण्टला 4K रिझोल्यूशनमध्ये बदलण्यासाठी AI चा वापर करू शकता. यामुळे अतिशय स्वच्छ आणि सुंदर चित्र तुम्हाला टीव्हीवर दिसणार आहे. हा टीव्ही केवळ चालू असल्यावरच तुमच्या घराची शोभा वाढवणार नाही तर बंद असल्यावर देखील. तुम्ही टीव्ही कोणत्याही पद्धतीने ठेवून घराची शोभा वाढवू शकता. यामध्ये खास फीचर्स देण्यात आले असून एम्बिएंट मोड+ द्वारे तुम्ही टीव्हीला आजूबाजूच्या वातावरणाप्रमाणे  वापरू शकता. त्याचप्रमाणे महत्त्वाच्या सूचना देखील तुम्हाला टीव्हीच्या स्क्रीनवर दिसू शकतील. या टीव्हीमध्ये इतर फीचर्समध्ये तुम्हाला अडॅप्टिव पिक्चर, रिस्पॉन्सिव UI, टॅप व्ह्यू टेक्नॉलॉजी, अक्टिव वॉयस एम्प्लिफायर यांसारखे फीचर्स मिळतात. यामुळे टीव्हीवरील दृश्य अधिक उत्तम दिसतं.

सॅमसंग इंडियाचे कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक बिझनेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू पुल्लन म्हणाले की, “सेरोच्या माध्यमातून आम्हाला सोशल मीडिया पिढीला आमच्याशी जोडायचं आहे. ग्राहकांनी त्यांचे टीव्ही पूर्वीपेक्षा वेगळ्या प्रकारे वापरण्यास सुरुवात केली आहे, सोशल मीडियावर स्क्रोलिंग, व्हायरल व्हिडिओ पाहणं, आवडते ओटीटी प्रोग्राम पाहणे यांसारख्या गोष्टींसाठी ग्राहक टीव्ही वापरायला लागले आहेत. आम्ही द सेरोला त्यासाठीच डिझाईन केलं असून त्यावर कोणत्याही प्रकारचा कन्टेन्ट लावल्यास टीव्ही त्याला अडॅप्ट करून ग्राहकांना उत्तम आनंद देईल.

हे ही वाचा-Appleकडून MacBook Air, MacBook Pro आणि Mac Mini लाँच;जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

किंमत, उपलब्धता आणि ऑफर व गॅरंटी

द सेरो  ग्राहकांना 43- इंच स्क्रीन साइजमध्ये नेवी-ब्लू बेजेल डिजाइनसह मिळणार आहे. सध्या ही टीव्ही ग्राहकांना केवळ रिलायन्स स्टोअरमध्ये खरेदी करता येणार आहे. त्याचबरोबर या टीव्हीच्या खरेदीवर  5% कॅश बैक किंवा 1,190 रुपयांपासून सुरु होणाऱ्या मासिक हफ्त्यांमध्ये देखील खरेदी करता येणार आहे.  रिलायन्स डिजिटलच्या ‘फेस्टिवल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स’ सेल दरम्यान 16 नोव्हेंबरपर्यंत हा टीव्ही खरेदी केल्यास  AJIO आणि  रिलायंस ट्रेंड्सच्या वतीने गिफ्ट व्हाउचर देखील मिळणार आहे.  द सेरोला  10वर्षांची नो स्क्रीन बर्न-इन वॉरंटी, एक वर्षाची वॉरंटी आणि स्क्रीनवर एक वर्षाची अतिरिक्त वॉरंटी मिळणार आहे.

जगातील पहिला मोबाईलला अनुकूल असा टीव्ही

2020 च्या आपल्या टीव्हीच्या मॉडेलमध्ये कंपनीने याची भर टाकली असून लाइफस्टाइल टीवी पोर्टफोलियो अजून मजबूत केला आहे. हा जगातील पहिला मोबाइलअनुकूल टीव्ही आहे.

अशा प्रकारचं पहिलीचं डिझाइन

नवीन डिझाईनच्या या जमान्यात कंपनीने तयार केलेले हे अनोखे डिझाईन आहे. चालू नसला तरीदेखील हा टीव्ही सर्वांचे लक्ष वेधून घेणारा आहे. तुमच्या सर्व प्रकारच्या कन्टेन्टसाठी हा टीव्ही शानदार असून या टीव्हीचे स्टाइलिश ऑल-इन-वन स्टॅन्ड  तुमच्या टीव्हीच्या मागच्या बाजूच्या तारा न दिसता 360 डिग्री क्लीन लूक देतो. तुम्ही हॉरिझॉन्टल पद्धतीने टीव्ही बघा किंवा व्हर्टिकल पद्धतीने टीव्ही बघा. तुम्हाला एकाच पद्धतीच्या स्मार्ट टीव्हीचा अनुभव मिळेल.

एका टॅपमध्ये कन्टेन्ट शेअरिंग

या टीव्हीमध्ये फोनवरूनच टॅप करून मोबाईल कंटेंट टीव्हीवर पाहू शकता. कोणत्याही प्रकारचा कन्टेन्ट तुम्ही केवळ टॅप व्हूच्या माध्यमातून टीव्हीवर पाहू शकता. द सेरो अपच्या माध्यमातून तुम्ही सोशल मीडियावरील कोणताही कन्टेन्ट टीव्हीवर पाहू शकता.

शक्तिशाली आवाज

या टीव्हीमध्ये उत्तम आवाजासाठी विशेष पद्धतीने डिझाईन करण्यात आलेले 4.1ch 60W फ्रंट फायरिंग स्पीकर बसवण्यात आले आहेत.यामध्ये तुम्ही ब्लूटूथ कनेक्शनच्या मदतीने शक्तिशाली आवाजाचा आनंद घेऊ शकता.

स्पष्टता वाढवण्यासाठी इंटेलिजेन्स नॉइज डिटेक्शन

जर तुम्ही तुमचा एखादा आवडता कार्यक्रम पाहत असलात तर आजूबाजूच्या आवाजाने तो तुम्हाला स्पष्टपणे ऐकू येत नाही. यासाठी या टीव्हीमध्ये  अक्टिव व्हॉइस अम्प्लिफायर (AVA) बसवले आहे. आजूबाजूचा आवाज वाढल्यास तुमच्या टीव्हीच्या आवाजाची स्पष्टता वाढवण्याचे काम डिव्हाईस करते.

एनहांस्ड कंटेंटसाठी उत्तम डिस्प्ले

द सेरोमध्ये QLEDटेक्नोलॉजी आणि इनोवेटिव डिजाइन बरोबर एक उत्तम अनुभूती देते. मोबाईलवरील कन्टेन्ट पाहत असलेल्या व्यक्तींची वाढती संख्या विचारात घेता यामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर एक अरब रंग आणि शेड्सबरोबर 100% कलर वॉल्यूम तुम्हाला या टीव्हीमध्ये मिळणार आहेत.

याचे अडॅप्टिव पिक्चर+ फीचर प्रकाश नियंत्रित करण्याचे काम देखील करते. आसपासच्या प्रकाशाचा अंदाज घेऊन उत्तम दृश्य दाखवण्याचा टीव्ही प्रयत्न करतो. यामध्ये तुमच्या कंटेण्टला 4K रिजॉल्यूशनमध्ये बदलण्यासाठी  AI चा वापर करू शकतो. यामुळे अतिशय स्वच्छ आणि सुंदर चित्र तुम्हाला टीव्हीवर दिसणार आहे.

घरातील वातावरणाशी जुळवून घेतो

या टीव्हीचे खास वैशिष्ट्य म्हणजे  अम्बिएंट मोड+ द्वारे तुम्ही टीव्हीला आजूबाजूच्या वातावरणाप्रमाणे दाखवू शकता. भिंतींचा आणि आजूबाजूचा रंग पाहून टीव्हीची स्क्रीन अडजेस्ट होते. त्याचबरोबर या टीव्हीमध्ये तुम्ही हवामान आणि दररोजच्या तारखादेखील पाहू शकता.

First published:

Tags: Samsung