मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

कारच्या टेल लाइटमध्ये लाल रंग का असतो? वाचा यामागचं खास कारण

कारच्या टेल लाइटमध्ये लाल रंग का असतो? वाचा यामागचं खास कारण

कारच्या टेल लाइटमध्ये लाल रंग का असतो? वाचा यामागचं खास कारण

कारच्या टेल लाइटमध्ये लाल रंग का असतो? वाचा यामागचं खास कारण

कारमध्ये वेगवेगळ्या गरजांसाठी लाल, केशरी आणि पांढऱ्या रंगाचे दिवे आहेत. तथापि आपण सर्वांनी पाहिलं आहे की कारचे मागील दिवे सहसा लाल रंगाचे असतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 20 नोव्हेंबर: उत्तम आणि सुरक्षित ड्रायव्हिंग अनुभवासाठी ऑटोमोबाईल कंपन्या वाहनांमध्ये विविध प्रकारच्या लाईट्स आणि इंडिकेटर बसवतात. अलर्टसाठी डॅशबोर्डवर सहसा एलईडी लाईट्स असतात. कारमधील काही लाइट्स सामान्य अलर्टसाठी असतात, परंतु काही लाइट्स या इमर्जन्सीसाठी वापरल्या जातात. कारमध्ये वेगवेगळ्या गरजांसाठी लाल, केशरी आणि पांढऱ्या रंगाच्या लाईट्सचा वापर केला जातो. तथापि, आपण सर्वांनी पाहिलं आहे की कारच्या मागील लाईट्स सहसा लाल रंगाच्या असतात.

गाडीच्या मागे फक्त लाल रंगाचे दिवे का वापरले जातात हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात नक्कीच आला असेल. आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत.

मागच्या लाईट्स लाल रंगाच्याच का असतात?

पाठीमागील बाजूस लाल रंगाच्या लाईट्स वापरल्या जातात, जेणेकरून मागून येणार्‍या वाहनाला पुढच्या वाहनाचा वेग कमी होत आहे किंवा थांबणार आहे याची सूचना मिळू शकते. या लाईट्स एकप्रकारे अलर्ट देण्याचं काम करतात आणि त्यामुळं ते त्यांच्या वाहनाचा वेग जास्त असेल तर वेग कमी करतात. अशा पद्धतीनं मागील वाहन पुढील वाहनाला धडकण्यापासून वाचतं आणि अपघात टाळले जातात.

हेही वाचा: Car Offers : ‘या’ 5 कारच्या खरेदीवर मिळतीये तगडी सूट, डिस्काउंटच्या पैशात येईल आयफोन 13

लाल रंग दूरच्या लोकांना सतर्क करतो-

लोकांना लाल रंग दूरवरूनही सहज दृष्टीस पडतो. याशिवाय लाल रंग प्रामुख्यानं धोका सूचित करण्यासाठी सर्वत्र वापरला जातो, हे आपणा सर्वांना माहीत आहे. एखाद्या ठिकाणी इशारा किंवा वॉर्निंग द्यायची असेल तर त्याचं चिन्हही लाल रंगात लिहिलेलं असतं, जेणेकरून लोकांना ते सहज कळू शकेल आणि लोक सावध होतील. इतर रंगांच्या तुलनेत लाल रंग धुक्याच्या वातावरणातही दिसून येतो.

वाहनाच्या बॅकलाइटचा लाल रंग दूरच्या व्यक्तीला चेतावणी आणि माहिती देऊ शकतो. लाल रंगाच्या दिव्यांमुळे रस्त्यावर अपघातांचे प्रमाण कमी होतो.

First published:

Tags: Car