मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

विमानात मोबाईल Flight Mode वर का ठेवला जातो? वाचा, महत्त्वाची माहिती

विमानात मोबाईल Flight Mode वर का ठेवला जातो? वाचा, महत्त्वाची माहिती

मोबाईल फोनमध्ये 'फ्लाईट मोड'चा पर्याय असतो.

मोबाईल फोनमध्ये 'फ्लाईट मोड'चा पर्याय असतो.

मोबाईल फोनमध्ये 'फ्लाईट मोड'चा पर्याय असतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • New Delhi, India
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 2 ऑक्टोबर : जेव्हा आपण विमानाने प्रवास करतो तेव्हा प्रवास सुरू करण्यापूर्वी फ्लाइट अटेंडंटकडून काही मार्गदर्शक तत्त्वे दिली जातात. यामध्ये मोबाईल फोन बंद करणे किंवा फ्लाइट मोडमध्ये ठेवण्याची सूचना महत्त्वाची आहे. फ्लाइट मोडचा पर्याय आमच्या सर्वांच्या मोबाईल फोनमध्ये दिलेला आहे. फ्लाईट मोड चालू होताच फोनचे नेटवर्क बंद होऊन जाते.

हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात नक्कीच येतो की, फ्लाईटमध्ये फोन का बंद करण्यास सांगितले जाते. जर कोणी हे केले नाही तर काय होईल, याची कल्पना करा. आपण फ्लाइट मोड म्हणजे काय आणि विमानात ते चालू न केल्यास काय होऊ शकते, याबाबत जाणून घ्या.

फ्लाईट मोड काय असते?

मोबाईल फोनमध्ये 'फ्लाईट मोड'चा पर्याय असतो. यामध्ये, फोन नेटवर्कच्या बाहेर जातो आणि बंदही होत नाही. तुम्ही फोन फ्लाइट मोडमध्ये वापरू शकता. मात्र, नेटवर्कशी संबंधित काम जसे की कॉलिंग आणि इंटरनेट वापरू शकत नाही. तर फ्लाईट मोड चालू केल्यानंतर, कोणीही चित्रपट आणि व्हिडिओ पाहू शकतो, संगीत ऐकू शकतो आणि गेम खेळू शकतो. त्याचबरोबर काही मोबाईलमध्ये वायफाय आणि ब्लूटूथचाही वापर करता येतो.

विमानात फ्लाईट मोड चालू करण्यास का सांगितले जाते?

विमानात फ्लाइट मोड चालू नसल्यास मोबाईल फोनच्या सिग्नलचा विमानाच्या संपर्क यंत्रणेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे विमान चालवणाऱ्या पायलटसोबत संवाद साधण्यात अडचणी येऊ शकतात. विमान उड्डाण दरम्यान पायलट नेहमी नियंत्रण कक्षाच्या संपर्कात असतात. फोनचे नेटवर्क सुरू राहिल्यास पायलटला स्पष्टपणे माहिती मिळत नाही. रेडिओ फ्रिक्वेन्सीमध्ये व्यत्यय येतो. त्यामुळे विमानात प्रवास करताना फ्लाईट मोड नेहमी चालू ठेवा.

First published:

Tags: Travel by flight