Whatsappचं नवं धोरण उद्यापासून लागू; कंपनीचे नवे नियम करा मान्य अन्यथा...

Whatsappचं नवं धोरण उद्यापासून लागू; कंपनीचे नवे नियम करा मान्य अन्यथा...

एखादी गोष्ट मान्य न केल्यास तुमचं व्हॉट्सअ‍ॅप प्रोफाइलचं हटवलं जात असेल किंवा हळूहळू आपल्या व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट लिस्टमध्ये प्रवेश नदेणं, येणारे कॉल्स,आणि नोटिफिकेशन्स थांबवली जात असतील तर यापेक्षा वाईट काय असणार आहे.

  • Share this:

मुंबई 14 मे: व्हॉट्सअ‍ॅपचं (What’s App) बहुचर्चित नवीन गोपनीयता धोरण(New Privacy Policy) उद्यापासून अर्थात 15 मेपासून अंमलात येणार आहे. युजर्सच्या प्रतिकूल प्रतिक्रियांमुळे याच्याअंमलबजावणीला विलंब झाला असून अद्यापही यावर तीव्र टीका होतआहे. एक किरकोळ बदल सोडला तर गोपनीयता धोरणात काहीच फरक करण्यात आलेला नाही. हे नवीन धोरण तुम्ही स्वीकारले नाही तर, फेसबुकच्या (Facebook) मालकीचे व्हॉट्स अ‍ॅप फक्त तुमचंव्हॉट्स अ‍ॅपखातं बंद करणार नाही तर त्याबरोबर व्हॉट्सअ‍ॅप चॅट लिस्टचा (Chat List)तुमचा अॅक्सेस, नोटीफिकेशन्स(Notifications),कॉल्स(Calls)सगळंच थांबेल. एखादी गोष्ट मान्य न केल्यास तुमचं व्हॉट्सअ‍ॅप प्रोफाइलचं हटवलं जात असेल किंवा हळूहळू आपल्या व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट लिस्टमध्ये प्रवेश नदेणं, येणारे कॉल्स,आणि नोटिफिकेशन्स थांबवली जात असतील तर यापेक्षा वाईट काय असणार आहे.

खरंच काय नेमकं घडणार आहे ते जाणून घेऊ या.व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे की ज्यांनीअद्याप त्यांच्या नवीन सेवा अटी(New Terms of Services)स्वीकारलेल्या नाहीतम्हणजेचव्हॉट्सअॅप अपडेट(Update)केलेलं नाही,त्यांनाआधी यानवीन अटी स्वीकारण्यासाठीआठवण केली जाईल. तशा सूचना पाठवल्या जातील.किती काळअशी आठवण केली जाईल याबाबत मात्र कंपनीनं काही स्पष्टीकरण दिलेलं नाही. वारंवार सूचना देऊनाही युजरनं हे नवीन धोरण स्वीकारलं नाही तर त्याचे परिणामही दिसून येतील,असंव्हॉट्सअॅपने म्हटलं आहे.

फ्लिपकार्टचा आपला पासवर्ड तातडीने करा रिसेट; अन्यथा बसेल मोठा धक्का

जोपर्यंत आपणहेस्वीकारत नाहीतोपर्यंत आधीव्हॉट्सअॅपमधीलचॅट लिस्टचा तुमचा अॅक्सेस बंद केला जाईल. म्हणजेच तुम्हालाव्हॉट्सअॅपवरीलसंदेशदिसणार नाहीत. काही नोटीफिकेशन्स येत असतील तर त्यासूचनेमध्येच येणारे संदेश पाहण्यास आणित्यालाउत्तरदेता येईल.सध्याकाही कालावधीसाठी तुम्हीव्हॉट्सअ‍ॅप व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलना उत्तरदेऊ शकाल. कालांतरानं तेहीथांबेल.

‘काही आठवड्यांनंतरतुम्हाला येणारेकॉल किंवा नोटीफिकेशन्सही स्वीकारता येणार नाहीत.व्हॉट्सअॅप आपल्या फोनवर पाठवले जाणारे मेसेजेसआणि कॉल्सही(Calls)थांबवेल. काही आठवडे म्हणजे नेमके किती आठवडे असतील याचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीत व्हॉट्सअॅपनं नवीन अटी स्वीकारण्याबाबत युजर्सना पॉपअप पाठवायला सुरुवात केली होती. व्हॉट्सअ‍ॅप आपला डेटा कसा हाताळतेतसंच फेसबुकच्या भागीदारीत इन्स्टाग्राम(Instagram)आणि फेसबुक मेसेंजरसह विविधअ‍ॅप्समध्ये एकात्मिक वापराला परवानगी देते याबद्दल त्यात माहिती देण्यात आली आहे. यामुळे युजरचा डेटा इतरफेसबुक कंपन्यांना शेअर केली जाणार आहे,हेलक्षातआल्यानं युजर्सनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

याबबतभारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) एप्रिलमध्ये दिल्ली उच्च न्यायालयात(Delhi High Court)सांगितले की,व्हॉट्सअ‍ॅपच्यायानवीन गोपनीयता धोरणामुळेअत्यंत मोठ्या प्रमाणातडेटा एकत्रितकेला जाईल आणिग्राहकांची माहिती घेऊन जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत जाहिराती पाठवण्यासाठी याचा वापर केला जाईल.व्हॉट्सअॅपनं मात्र हे सगळं नाकारलं आहे.

First published: May 14, 2021, 6:41 PM IST

ताज्या बातम्या