मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

Special Story : सेकंड-हँड कारसाठी कर्ज घ्यायचं आहे? असा करा अर्ज

Special Story : सेकंड-हँड कारसाठी कर्ज घ्यायचं आहे? असा करा अर्ज

अनेक कार उत्पादक कंपन्याही सेकंड हँड कार विक्रीच्या बाजारपेठेत उतरल्या आहेत. महिंद्रा, मारुती, टाटा अशा देशातल्या लोकप्रिय कंपन्याही ही सेवा देत आहेत.

अनेक कार उत्पादक कंपन्याही सेकंड हँड कार विक्रीच्या बाजारपेठेत उतरल्या आहेत. महिंद्रा, मारुती, टाटा अशा देशातल्या लोकप्रिय कंपन्याही ही सेवा देत आहेत.

अनेक कार उत्पादक कंपन्याही सेकंड हँड कार विक्रीच्या बाजारपेठेत उतरल्या आहेत. महिंद्रा, मारुती, टाटा अशा देशातल्या लोकप्रिय कंपन्याही ही सेवा देत आहेत.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 30 नोव्हेंबर : स्वतःच्या हक्काचं घर (Home)आणि गाडी घेणं (Car) हे अनेकांचं स्वप्न असतं; मात्र अनेकांना एकाच वेळी दोन्ही स्वप्नं पूर्ण करणं शक्य नसतं. अशा वेळी अनेकजण नवीन कार घेण्यापेक्षा जुनी, वापरलेली म्हणजेच सेकंड-हँड कार (Second Hand Car) घेणं पसंत करतात. काही जणांना नव्यानेच ड्रायव्हिंग करत असल्यानं नवीन कारपेक्षा जुनी कार वापरणं फायदेशीर वाटतं. अनेकांच्या बजेटमध्ये नवीन कार बसत नाही. नवीन कारच्या तुलनेत सेकंड हँड कार किमतीत खूप स्वस्त पडते. कारची किंमत ती जुनी होत जाईल तशी कमी (Depreciation) होत जाते. कार जितकी जुनी, तितकी तिची किंमत कमी असते. त्यामुळे जुनी कार अगदी कमी किंमतीत मिळू शकते. अशा विविध कारणांमुळे अनेक जण सेकंड हँड कार घेणं पसंत करतात. सेकंड हँड कार घेणाऱ्यांचं प्रमाणही आपल्या देशात मोठं आहे. त्यामुळे बँका (Bank)आणि वित्तीय संस्थांनी (NBFC) नवीन कारसाठी कर्ज देण्याच्या सुविधेप्रमाणे जुनी कार घेण्यासाठीही कर्ज सुविधा उपलब्ध केली आहे. हे कर्ज कसं घेता येतं, याविषयी माहिती घेऊ या.

आपल्या देशात सेकंड हँड कारची बाजारपेठ प्रचंड आहे. आता अनेक कार उत्पादक कंपन्याही सेकंड हँड कार विक्रीच्या बाजारपेठेत उतरल्या आहेत. महिंद्रा, मारुती, टाटा अशा देशातल्या लोकप्रिय कंपन्याही ही सेवा देत आहेत. त्यामुळे ग्राहकांना अत्यंत खात्रीशीररीत्या उत्तम दर्जाची सेकंड हँड कार योग्य किमतीत मिळण्याची सोय झाली आहे. या कंपन्या त्यांच्याकडे विक्रीसाठी येणाऱ्या कार्सची पूर्ण तपासणी करून ती उत्तम स्थितीत असेल तरच विक्रीसाठी उपलब्ध करतात. त्यासाठी योग्य किंमतही निश्चित करतात. नवीन कारच्या तुलनेत जवळपास निम्म्या किंमतीत चांगली, जुनी कार मिळू शकते. यामुळे अनेकदा लक्झरी श्रेणीतली सेकंड-हँड कार छोट्या कारच्या किमतीत घेता येते. नवीन कारच्या तुलनेत विमा आणि देखभाल खर्च, अन्य करही कमी असतात. त्यामुळे आजकाल अनेक जण सेकंड हँड कार घेणं पसंत करतात. अनेक बँका आणि वित्तसंस्था सेकंड हँड कारसाठी कर्ज देतात.

.तेव्हा समंथा प्रभूने सेक्ससाठी खाणंही सोडलं; फूडऐवजी निवडलं होतं Sex

नवीन कारसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या तुलनेत याचा व्याजदर (Interest Rate) काहीसा जास्त असतो. तसंच कर्ज परतफेडीची मुदत (Tenure) कमी असते. परतफेडीची मुदत 5 वर्षं किंवा नवीन कारच्या कर्जाइतकी म्हणजे 7 वर्षांपर्यंत असते. या कर्जाचा व्याजदर 9.75 टक्क्यांपासून 16 ते 17 टक्क्यांपर्यंतही असू शकतो. काही बँका कारच्या किंमतीच्या 100 टक्क्यांपर्यंत कर्ज देतात. सेकंड हँड कार 3 वर्षांपेक्षा जुनी असल्यास काही बँका आणि वित्तीय संस्था कर्ज देत नाहीत. नवीन कारच्या कर्जाच्या तुलनेत मिळणारी कर्जाची रक्कम कमी असू शकते. त्यामुळे मासिक कर्ज हप्ता (EMI) कमी असतो. आयसीआयसीआय, स्टेट बँक ऑफ इंडिया, टाटा कॅपिटल, पंजाब नॅशनल बँक,  एचडीएफसी, अॅक्सिस बँक, महिंद्रा फायनान्स या संस्था हे कर्ज देतात. सेकंड हँड कार विक्री करणारे डीलर्स डाउन पेमेंटचीही मागणी करतात. त्यामुळे त्याची तरतूद करणंही आवश्यक आहे.

काकीवरील प्रेमासाठी पत्नीची केली हत्या; अनैतिक संबंधाचा भयावह शेवट

या कर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी असून, ती ऑफलाइन किंवा ऑनलाइनदेखील करता येते.  या कर्जासाठी अर्ज करताना पासपोर्ट आकाराचे फोटो, कार मूल्यांकन अहवाल, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, एलआयसी पॉलिसी, वीज बिल, रेशनकार्ड इत्यादी कागदपत्रं लागतात. उत्पन्नाचा पुरावा म्हणून ऑडिट अहवाल, फॉर्म 16, पगाराची स्लिप, बँक स्टेटमेंट इत्यादींपैकी कागदपत्रं द्यावी लागतात.

ऑफलाइन पद्धतीत तुम्ही ज्या बँकेतून किंवा वित्तीय संस्थेतून कर्ज घेऊ इच्छित असाल त्या बँकेच्या शाखेत किंवा वित्तीय संस्थेच्या कार्यालयाला भेट द्या. त्यांचा विहित नमुन्यातला अर्ज भरा. बँक किंवा वित्तीय संस्था तुम्ही कर्जासाठी पात्र आहात की नाही याची पडताळणी करण्यासाठी काही कागदपत्रांची मागणी करतील, त्यानुसार ती कागदपत्रं जमा करावीत.

IPL 2022 : Rajasthan Royals चा स्टोक्स-आर्चरला धक्का, महागडा खेळाडूही बाहेर

कर्जाची प्रक्रिया करण्यापूर्वी वेगवेगळ्या बँका, वित्तीय संस्था कोणत्या व्याजदराने कर्ज देत आहेत, परतफेडीची मुदत किती आहे, अन्य अटी काय आहेत याची पडताळणी करावी. त्यानुसार तुम्हाला सोयीच्या ठरणाऱ्या ठिकाणी कर्जासाठी अर्ज करावा. व्याजदर, प्रक्रिया शुल्क इत्यादींबाबत चर्चा करावी. ऑनलाइन अर्ज केल्यास ही प्रक्रिया अगदी सहजपणे आणि जलद गतीने पूर्ण होऊ शकते. हे कर्ज देतानाही बँका आणि वित्तीय संस्था कर्जदाराचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) तपासतात. क्रेडिट स्कोअर कमी असेल तर अर्ज नाकारला जाऊ शकतो. संयुक्त नावानेही हे कर्ज घेता येतं.

तुम्हाला नवीन कार न घेता सेकंड हँड कार घ्यायची असेल आणि पैशांअभावी तुमचं स्वप्न पूर्ण होत नसे, तर बँका किंवा वित्तीय संस्थांना भेट देण्यास कचरू नका. एखादी चांगली कार मिळत असेल तर कर्ज घेऊन तुम्ही कार घेण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता.

First published: