Home /News /auto-and-tech /

Upcoming Cars : SUV ते इलेक्ट्रिक कार, या महिन्यात लाँच होणार 5 सर्वोत्तम कार

Upcoming Cars : SUV ते इलेक्ट्रिक कार, या महिन्यात लाँच होणार 5 सर्वोत्तम कार

Upcoming Cars : SUV ते इलेक्ट्रिक कार, या महिन्यात लाँच होणार ‘या’ 5 सर्वोत्तम कार

Upcoming Cars : SUV ते इलेक्ट्रिक कार, या महिन्यात लाँच होणार ‘या’ 5 सर्वोत्तम कार

Upcoming Cars in India this month: या महिन्यात म्हणजेच जुलै 2022 मध्ये इलेक्ट्रिक कार, SUV आणि सेडानसह काही महत्त्वाच्या कार लॉन्च केल्या जातील. लॉन्च होणार्‍या कारमध्ये इकॉनॉमी क्लासपासून ते लक्झरी क्लासपर्यंतचा समावेश आहे.

    मुंबई, 24 जुलै : 2022 हे वर्ष आता अर्धे संपलं आहे. आता जुलै महिना सुरु झाला आहे म्हणजेच आपण या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत आहोत. या महिन्यात म्हणजेच जुलै 2022 मध्ये विविध कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार (Electric Car), एसयूव्ही (SUV) आणि सेडानसह (Sedan) काही महत्त्वाच्या कार लॉन्च (Upcoming Cars in July) केल्या जाणार आहेत. लॉन्च होणार्‍या कारमध्ये इकॉनॉमी क्लासपासून ते लक्झरी क्लासपर्यंतच्या कारचा समावेश आहे. या महिन्यात लाँच करण्यात आलेल्या बहुतांश कार विदेशी कार निर्मात्यांच्या आहेत. जर तुम्हीही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर काही दिवसांनी लॉन्च होणाऱ्या या गाड्यांवर एक नजर नक्की टाका. कदाचित यापैकी एखादी कार खरेदीसाठी तुमची पहिली पसंती बनू शकते. ह्युंदाई टक्सन (Hyundai Tucson): 2022 Hyundai Tucson ही या वर्षी भारतात लॉन्च होणार्‍या आगामी SUV पैकी एक आहे. 2022 Hyundai Tucson अधिकृत Hyundai वेबसाइटवर सूचीबद्ध केली गेली आहे. 13 जुलै रोजी या कारचं लाँचिंग अपेक्षित आहे. आउटगोइंग जनरेशनच्या तुलनेत या एसयूव्हीला नवा लूक देण्यात आला आहे. यात 2.0-लिटर पेट्रोल इंजिन असेल. एसयूव्ही ADAS सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज असेल, ज्यामध्ये अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ऑटोनॉमस ब्रेकिंग सिस्टम, लेन-कीप असिस्ट, ब्लाइंड-स्पॉट डिटेक्शन आणि लेन डिपार्चर अलर्ट यांचा समावेश आहे. ऑडी A8L (Audi A8L)- ऑडी ही जर्मन कारमेकर भारतात प्रीमियम सेडान A8L चे फेसलिफ्ट प्रकार लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. ही कार 12 जुलै रोजी लॉन्च होण्याची शक्यता आहे. देशात मे पासून A8L चे बुकिंग सुरु झाले आहे. खरेदीदारांना 10 लाख रुपये टोकन रक्कम भरावी लागेल आणि कार बुक करावी लागेल. व्हर्च्युअल कॉकपिटसाठी ऑडी A8L ला अनेक अपडेट्स मिळाल्या आहेत. ज्यात फ्रंट डिझाईन, पुन्हा डिझाइन केलेले अलॉय व्हील आणि MIB 3 ऑपरेटिंग सिस्टम यांचा समावेश आहे. हेही वाचा- Unmanned Aircraft Video : संरक्षण क्षेत्रात भारताचं मोठं करतब! पायलटशिवायच फाइटर एअरक्राफ्टचं यशस्वी उड्डाण सायट्रोन C3 (Citroen C3) फ्रेंच कार निर्माता कंपनी Citroen 20 जुलै रोजी भारतात आपली आगामी कार- C3 लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. Citroen C3 ही या कंपनीची भारतात लॉन्च होणारी दुसरी कार असेल. सध्या, कंपनी देशात Citroen C5 Aircross SUV देते. Citroen C3 4m श्रेणीमधील कार आहे आणि टाटा पंच, निसान मॅग्नाइट आणि रेनॉल्ट किगर यांच्याशी स्पर्धा करेल. या मिनी SUV ला 1.2-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. टोयोटा अर्बन क्रूझर Hyryder (Toyota Urban Cruiser Hyryder)- बहुप्रतिक्षित टोयोटा अर्बन क्रूझर हायडरचे भारतात १ जुलै रोजी अनावरण करण्यात आले आहे. एसयूव्ही अनेक पॉवरट्रेनमध्ये उपलब्ध असेल आणि हायब्रिड प्रकार असेल. अर्बन क्रूझर हायडर या महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्टमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. या आगामी SUV चे बुकिंग अधिकृतपणे भारतात सुरु झाले आहे. इच्छुक खरेदीदार टोयोटाच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा डीलरशिपवर SUV बुक करू शकतात. बुकिंगसाठी टोकन रक्कम रु. 25,000 भरावी लागणार आहे. हेही वाचा- Block झालेलं WhatsApp Account पुन्हा सुरु करता येणार, महत्त्वाची माहिती समोर Volvo XC40 recharge- स्वीडिश लक्झरी वाहन निर्माता व्हॉल्वो जुलैमध्ये भारतात आपले पहिले इलेक्ट्रिक वाहन Volvo XC40 रिचार्ज सादर करण्यासाठी सज्ज आहे. Volvo XC40 रिचार्ज एका चार्जवर 418 किमीची रेंज देईल. कंपनीचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक SUV 40 मिनिटांत (150kW DC फास्ट चार्जिंगसह) शून्य ते 80 टक्के वेगाने चार्ज होऊ शकते. एसयूव्ही घरी बसून किंवा नियमित चार्जरने सहज चार्ज करता येते. 11kW AC फास्ट चार्जिंगसह पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे 8-10 तास लागतील.
    Published by:Suraj Sakunde
    First published:

    Tags: Car

    पुढील बातम्या