• Home
  • »
  • News
  • »
  • auto-and-tech
  • »
  • Union Budget 2021 Reactions: स्वस्त मोबाईल महागणार, कंपन्या चार्जरशिवायच विकणार फोन?

Union Budget 2021 Reactions: स्वस्त मोबाईल महागणार, कंपन्या चार्जरशिवायच विकणार फोन?

Budget 2021 Reactions

Budget 2021 Reactions

Union Budget 2021: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोबाइल फोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या उत्पादकांना करात देण्यात येणाऱ्या सवलती कमी करणार असल्याचं जाहीर केलं आहे. जाणून घ्या यावर उत्पादकांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत

  • Share this:
मुंबई, 02 फेब्रुवारी: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सोमवारी देशाचं 2020-21 या वर्षाचं बजेट संसदेत सादर केलं. या बजेटमध्ये त्यांनी मोबाइल फोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या उत्पादकांना करात देण्यात येणाऱ्या सवलती कमी करणार असल्याचं जाहीर केलं. त्याचबरोबर देश आत्मनिर्भर भारताच्या सरकारच्या धोरणाला बळकटी देण्यासाठी आयात केल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांतील सुट्या भागांवर 2.5 टक्के कस्टम्स ट्युटी लागू केली आहे. तसंच सर्किट बोर्ड, कॅमेरा कम्पोनंट्स, मोबाइलचे कनेक्टर यांवरही 2.5 टक्के कस्ट्म्स ड्युटी लावण्यात आली आहे. या निर्णयाबाबत काही इलेक्ट्रॉनिक वस्तू उत्पादकांशी आम्ही संवाद साधला. आयडीसी इंडियातील मोबाइल संशोधन विभागाचे संचालक नवकेंदरसिंग म्हणाले, ‘सरकारच्या या निर्णयामुळे स्वस्त मोबाईल फोन महागण्याची शक्यता जास्त आहे. कारण सध्या उत्पादक हे बजेट फोन अत्यंत कमी नफा ठेवूनच विकत आहेत आणि नवा करही त्यात समाविष्ट करता येण्यासारखा नाही. त्यामुळे या स्वस्त फोन्सच्या किमती वाढू शकतात.’ (हे वाचा-भारतात रियल मनी गॅम्बलिंगची परवानगी देणार Google Play; जाणून घ्या काय आहे प्रकरण) स्वस्त फोनवरच होईल परिणाम काउंटरपॉइंट इंडियामधील सीनिअर रिसर्च अनॅलिस्ट प्राचिरसिंग म्हणाले, ‘ जीएसटीमध्ये झालेल्या वाढीमुळे जसे मोबाइलचे भाव वाढले होते तशीच मोबाइल भाववाढ होईल. कालांतरानी बिल ऑफ मटेरियल्समध्ये (BoM) या वाढीचा समावेश केला जातो.नवकेंद्रसिंग पुढे म्हणाले, ‘ आतासुद्धा बहुतांश मोबाइल कंपन्या भारतातच मोबाइल चार्जर तयार करतात पण सरकारला हे उत्पादन वाढवायचं असल्यामुळे त्यांनी या विषयावर भर दिला आहे. या करवाढीचा परिणाम स्वस्त मोबाइल फोनवर होईल. कारण 15,000 रुपयांवरील स्मार्टफोनमध्ये 5G सारख्या अद्ययावत सुविधा असतात त्यामुळे त्यांच्या किमतींमध्ये ही करवाढ सामवली जाईल आणि दर फार वाढणार नाहीत.’ लोकलायझेशनवर अधिक भर प्राचिरसिंग म्हणाले ‘ अनेक मोबाइल उत्पादक पहिल्यापासूनच त्यांचे इलेक्ट्रॉनिक पार्ट भारतातच तयार करत आहेत. कॅमेरा तयार करणारे बहुतांश उत्पादक कंप्लिटली नॉक्ड-डाउन (CKD) किंवा सेमी नॉक्ड-डाउन (SKD) पद्धतीने स्थानिक बाजारातूनच पार्ट घेत आहेत. या प्रक्रियेला बळ देण्यासाठी सरकार भर देत आहे.’ थोडक्यात काय तर भारतातील मोबाईल, कम्पोनंट आणि इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग उद्योग विकसित होईपर्यंत थोड्या काळासाठी ग्राहकांना त्याचा फटका सोसावा लागणार आहे. (हे वाचा - भय्यू महाराज प्रकरणाची नवी माहिती, डॉ.आयुषी जबाब न नोंदवता कोर्टातून पडल्या बाहेर) डेलॉइट इंडियाचे पार्टनर महेश जयसिंग म्हणाले, ‘इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे सुटे भाग निर्माण करणारी इकोसिस्टिम विकसित होईपर्यंत कदाचित मोबाइल उत्पादक मोबाईलच्या किमती वाढवतील पण हे थोड्या काळासाठी असेल. मोठ्या प्रमाणात विक्री होणारे आणि दर्जेदार स्मार्टफोनच्या किमतीवर या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो. सध्या पहिल्यांदा मोबाइल फोन वापरणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या फोनच्या बॉक्समध्ये उत्पादक चार्जर देतातच. ’ मागणी कमी व्हायची शक्यता नाही याबाबत प्राचिरसिंग म्हणाले, ‘ गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सरकारने मोबाइलच्या डिस्प्ले पॅनलच्या आयातीवर 10 टक्के कर वाढवला होता तरीही उत्सवी वातावरणात मोबाईलची विक्री त्या तिमाही वाढल्याचंच लक्षात आलं. त्यामुळे या वेळीही मोबाईलची किंमत थोडी वाढेल पण त्याचा मागणीवर फारसा परिणाम होणार नाही.’
Published by:news18 desk
First published: