Home /News /auto-and-tech /

महागाईच्या जमान्यात बाईकचं मायलेज वाढवण्यासाठी अतिशय सोप्या टिप्स! पैशांची होईल अधिक बचत

महागाईच्या जमान्यात बाईकचं मायलेज वाढवण्यासाठी अतिशय सोप्या टिप्स! पैशांची होईल अधिक बचत

how to increase bike mileage : बाईक चालवताना निष्काळजीपणामुळे मायलेज कमी होते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला बाईकचे मायलेज वाढवण्यासाठी अतिशय सोप्या टिप्स सांगणार आहोत.

    मुंबई 22 मे : मोदी सरकारनंतर महाविकास आघाडी सरकारनेही पेट्रोल डिझेलवरील कर (Petrol Diesel Price) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, तरीही पेट्रोल 100 रुपयांच्या खाली येईल अशी चिन्हे नाहीत. अशात तुमची मोटारसायकल चांगली मायलेज देत नसेल आणि तुम्हाला त्यात दर महिन्याला हजारो रुपयांचे पेट्रोल भरावे लागत असेल तर घर चालवणे आणखी अवघड होऊन बसते. वास्तविक, बाईक चालवताना झालेल्या निष्काळजीपणामुळे अनेक वेळा मायलेज कमी होते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला बाईकचे मायलेज वाढवण्यासाठी (how to increase bike mileage) अतिशय सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्याचे पालन केल्यावर मायलेज मोठ्या प्रमाणात वाढते. नियमित सर्व्हिस : तुमच्या बाइकने तुम्हाला चांगलं मायलेज द्यावं असं वाटत असेल, तर त्याच्या सर्व्हिसिंगकडे नक्कीच लक्ष द्या. कारण इंजिन आणि गिअरबॉक्सला भरपूर वंगण लागते. जेणेकरून इंजिनचे व्हॉल्व्ह आणि गिअरबॉक्स त्यांचे काम आरामात करू शकतील. म्हणून, नियमित अंतराने बाइकची सर्व्हिसिंग करा. टायर प्रेशर: जेव्हा तुम्ही तुमच्या बाइकमध्ये इंधन टाण्यासाठी पेट्रोल पंपावर जाल तेव्हा तुमच्या बाइकच्या टायरमधील हवेचा दाब नक्कीच तपासा. कारण जर तुमच्या बाइकच्या टायरमधील हवा कंपनीने दिलेल्या दाबानुसार नसेल तर त्याचा थेट परिणाम बाइकच्या मायलेजवर होतो. केंद्रापाठोपाठ राज्याकडूनही पेट्रोल डिझेलवरील कर कमी! राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडणार लाल दिव्यावर इंजिन बंद करा: तुम्ही रस्त्यावर जाता तेव्हा, लाल सिग्लनवर 15 सेकंद असो किंवा तुम्ही 1 मिनिटासाठी इंजिन बंद केले पाहिजे. जर तुम्ही दिवसभरातील अनेक सिग्नलला इंजिन बंद केले तर बाईकचे इंजिन कमी इधन जाळेल ज्यामुळे थेट मायलेज वाढेल. क्लच आणि गियरचा योग्य वापर: जेव्हाही तुम्ही बाइक चालवता तेव्हा क्लचचा वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा. कारण क्लचच्या अतिवापराचा थेट परिणाम तुमच्या बाइकच्या मायलेजवर होतो. बाईक चालवताना गरजेनुसार गीअर वापरा : म्हणजे कमी स्पीडमध्ये तुम्ही बाइक फक्त पहिल्या आणि दुसऱ्या गीअरवर चालवावी आणि हाय स्पीडमध्ये तिसरा आणि चौथा गियर वापरावा. जर तुम्ही तिसरा किंवा चौथा गीअर कमी वेगाने वापरला तर त्याचा थेट परिणाम बाइकच्या मायलेजवर होतो. Petrol Diesel Prices :क्रूड ऑइल 110 डॉलर पार,जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव स्मार्ट व्हा: ऑफिस किंवा घरातून बाहेर पडण्यापूर्वी तुमच्या फोनमध्ये ट्रॅफिकची माहिती घेऊन बाहेर जा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या ट्रॅफिक जॅममध्ये अडकावे लागणार नाही. कारण बाईकचे बहुतांश ऑईल ट्रॅफिक जॅममध्ये जळून वाया जाते, ज्यामुळे मायलेज कमी होते.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Bike riding, Petrol and diesel price

    पुढील बातम्या