मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

TVS Hydrogen Fuel Scooter : पेट्रोलचं टेन्शन सोडा आणि इलेक्ट्रिकही विसरा; आता हायड्रोजनवर चालणार स्कूटर

TVS Hydrogen Fuel Scooter : पेट्रोलचं टेन्शन सोडा आणि इलेक्ट्रिकही विसरा; आता हायड्रोजनवर चालणार स्कूटर

टीव्हीएसची आईक्यूब हायड्रोजन इंजिनसोबत लाँच होऊ शकते.

टीव्हीएसची आईक्यूब हायड्रोजन इंजिनसोबत लाँच होऊ शकते.

टीव्हीएस (TVS) आपली iQube ही स्कूटर हायड्रोजन इंधन (Hydrogen Fuel) पर्यायासह लॉंच करू शकते.

मुंबई, 16 ऑगस्ट : जगभरात झपाट्यानं वाढणाऱ्या प्रदूषणाच्या (Pollution) पातळीमुळे वाहन उत्पादकांना हरित पर्याय (Green Mobility) शोधण्यास प्रेरित केलं आहे. इलेक्ट्रिक मोबिलिटी हा सर्वांत पसंतीचा पर्याय आहे. हायड्रोजनवर (Hydrogen) चालणारी वाहनं हादेखील भविष्यासाठी एक व्यवहार्य पर्याय ठरू शकतो. त्यामुळे वाहन उत्पादक याकडेही लक्ष देत आहेत. या श्रेणीत टीव्हीएस (TVS) आपली iQube ही स्कूटर हायड्रोजन इंधन (Hydrogen Fuel) पर्यायासह लॉंच करू शकते. काही कालावधीपूर्वी, भारतीय वाहन निर्मात्याचं नाव आणि डिझाइन असलेली काही पेटंट्स (Patent) ऑनलाइन दिसली आणि ती हायड्रोजनवर चालणाऱ्या स्कूटरची असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. लीक झालेल्या पेटंट दस्तऐवजांवरून असं सूचित होतं, की कंपनी एका स्कूटरवर काम करत आहे. ज्या स्कूटरच्या फ्रेमच्या पुढच्या डाउनट्युबवर दोन हायड्रोजन फ्युएल कॅनिस्टर (टाकी) बसवलेले आहेत. एक फिलर नोजल समोरच्या अ‍ॅप्रनवर स्थित आहे आणि एक पाइप दोन टाक्यांना जोडतो, असं या डिझाइनच्या रेखाचित्रांवरून दिसतं. हे वाचा - कार चोरी झाली तर मिनिटांमध्येच शोधून काढेल हे डिव्हाईस, किंमत फक्त 1099 रुपये! या स्कूटरच्या सीटखाली हायड्रोजन इंधन टाकी (Hydrogen Fuel Tank) असेल. पारंपरिक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ज्या ठिकाणी बॅटरी असते, तिथं ही टाकी असेल. तसंच, पेटंटनुसार, या स्कूटरमध्ये फ्लोअरबोर्डच्या खाली एक बॅटरी पॅकही (Battery Pack) असेल; मात्र त्याचा आकार अद्याप स्पष्ट झालेला नाही. ही बॅटरी ब्रेकिंग किंवा डिलेरेशनदरम्यान निर्माण होणारी ऊर्जा साठवून ठेवते. तसंच गरज पडेल तेव्हा अतिरिक्त परफॉर्मन्सही देईल. जेव्हा ऊर्जेची आवश्यकता कमी होईल, तेव्हा सेल बॅटरी पॅकदेखील इंधन भरू शकतो. टीव्हीएस कंपनी हब माउंटेड 4.4kWची मोटर बसवू शकते. ही मोटर (Motor) कदाचित इलेक्ट्रिक iQube स्कूटरमध्ये दिसू शकेल. हायड्रोजन इंधन कसं काम करतं? हायड्रोजन फ्युएल पारंपरिक बॅटरीप्रमाणे कार्य करतं. त्याच्या कॅथोड (Cathode) आणि अ‍ॅनोड (Anode) यादरम्यान एक इलेक्ट्रोलाइट असतो. अ‍ॅनोड हायड्रोजन मिळवतो आणि कॅथोड वातावरणातून ऑक्सिजन मिळवतो. उत्प्रेरक अ‍ॅनोडच्या संपर्कात येताच हायड्रोजनमधले प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनचं पृथक्करण करतात. कॅथोडपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त प्रोटॉन इलेक्ट्रोलाइटमधून (Electrolytes) तरंगू शकतात. त्यामुळे कॅथोडपर्यंत जाण्यासाठी इलेक्ट्रॉन बाहेरच्या वायरमधून जाणं आवश्यक आहे. एकदा ते तिथं गेल्यावर विजेच्या रूपात अडकतात आणि कंट्रोलर आणि मोटरकडे पाठवले जातात. शेवटी प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन या दोन्हींसह कॅथोडवर पोहोचल्यावर, हायड्रोजन आणि ऑक्सिजन पाण्याची वाफ उत्पादित करण्यासाठी एकत्र येतात. तो एक्झॉस्ट गॅस म्हणून बाहेर सोडला जातो.
First published:

Tags: Tech news, Technology, Vehicles

पुढील बातम्या