TVSने लाँच केली स्टायलिश स्कूटर, अशी आहेत फीचर्स आणि किंमत

TVSने लाँच केली स्टायलिश स्कूटर, अशी आहेत फीचर्स आणि किंमत

टीव्हीएसने स्टायलिश स्कूटरचे रेस एडिशन लाँच केलं आहे. याची किंमत 63 हजार रुपये इतकी आहे.

  • Share this:

मुंबई, 22 सप्टेंबर : TVS Motor ने नवी स्कूटर NTORQ 125 ची Race Edition लाँच केली आहे. दिल्लीतील एक्स-शोरूममध्ये या स्कूटरची किंमत 62 हजार 995 रुपये इतकी आहे. यामध्ये LED DRLs आणि LED हेड लॅम्प आहेत. याशिवाय Hazard lamp देखील मिळतील. टीव्हीएसने काही दिवसांपूर्वी Ntorq चे ड्रम-ब्रेक व्हेरिएंटसुद्धा लाँच केलं होतं. याची एक्स शोरूम किंमत 58 हजार 552 रुपये होती.

Race Edition मध्ये तुम्हाला नवीन ग्राफिक्स मिळतील. थ्री टोन कॉम्बिनेशन असून यात matte black, metallic black आणि metallic red colour मध्ये लाँच कऱण्यात आला आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, TVS NTORQ 125 लाँच झाल्यानंतर लोकांच्या पसंतीस उतरली आहे. दिमाखदार लूक आणि TVS SmartXonnect सोबत स्कूटरचा परफॉर्मन्ससुद्धा चांगला आहे. लवकरच काही शहरांमध्ये TVS NTORQ 125 Race Edition चे प्री बुकिंग ऑनलाइन सुरू करण्यात येईल.

वाचा : Maruti कंपनीची खास ऑफर, कार खरेदीवर एक लाख रुपयांपर्यंतची सूट!

Ntorq 125 मध्ये CVTi-REVV 124.79cc सिंगल सिलेंडर, 4-स्ट्रोक, 3-व्हॉल्व, air-cooled SOHC engine आहे. याची क्षमता 7500rpm वर 9.4PS आणि 5500rpm वर 10.5Nm इतका टॉर्क जनरेट करण्याएवढी आहे. Ntroq मध्ये डिस्क आणि ड्रम-ब्रेक सेट अप या दोन्हींचा पर्याय उपलब्ध आहे.

वाचा : तुमच्या बजेटमध्ये स्पोर्टी लूकच्या दमदार बाइक, एक लाखांपेक्षा कमी किंमत!

वाचा : खूशखबर! 'या' Honda कारवर 4 लाखांपर्यंत मोठी सूट, काय आहे ऑफर जाणून घ्या

अमोल कोल्हेंची शिवसेनेवर विखारी टीका, पाहा हा VIDEO

Published by: Suraj Yadav
First published: September 22, 2019, 12:24 PM IST
Tags: bike

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading