नवी दिल्ली, 21 मे : जर तुम्ही कार चालवत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी (Car Driving) महत्त्वाची आहे. सरकारने ट्रॅफिकबाबत नवे नियम लागू केले आहेत. आता ट्रॅफिक पोलीस उगाचच वाहन चालकांना थांबवू शकत नाहीत, तसंच कारण नसताना गाडीचं चेकिंग करू शकत नाहीत. यासाठी आदेशही जारी करण्यात आला आहे.
याबाबत कमिश्नर ऑफ पोलीस हेमंत नागराळे यांनी सर्कुलर ट्रॅफिक डिपार्टमेंटला जारी केलं आहे. या सर्कुलरनुसार, ट्रॅफिक पोलीस वाहनांची तपासणी करणार नाहीत. विशेषकरुन जिथे चेक नाका आहेत. ते केवळ वाहतुकीवर लक्ष ठेवतील आणि वाहतूक सामान्यपणे सुरू राहिल याकडे लक्षकेंद्रित करतील. ते एखादी गाडी तेव्हास थांबवू शकतील, जेव्हा ट्रॅफिकच्या वेगावर त्याचा परिणाम होत असेल.
अनेकदा ट्रॅफिक पोलीस केवळ संशयाच्या आधारे कुठेही गाडी थांबवून बूट तसंच वाहनाच्या आतील बाजूची तपासणी करतात यामुळे रस्तावरील वाहतुकीवर याचा परिणाम होतो.
या सर्कुरलमध्ये सर्व ट्रॅफिक पोलिसांना रस्त्यावरील वाहतूक वाढत असल्याने वाहन तपासणं बंद करण्यास सांगितलं असून वाहतुकीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास प्राधान्य देण्यास सांगण्यात आलं आहे. तसंच वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्यास वाहतूक पोलिसांकडून मोटर वाहन कायद्यातील तरतुदींनुसार दंड आकारला जाऊ शकतो, असंही सर्कुलरमध्ये सांगण्यात आलं आहे.
वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त नाकाबंदीदरम्यान, वाहतूक पोलीस केवळ वाहतूक नियमांचं उल्लंघन करण्यांवर कारवाई करताली आणि वाहनांची तपसाणी करणार नाहीत. या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी न झाल्यास संबंधित वाहतूक चोकीचे वरिष्ठ निरिक्षक जबाबदार असतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Traffic police, Traffic Rules