मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

नोकरदार ग्राहकांसाठी टोयोटाच्या खास ऑफर्स : EMI मध्ये मिळणार मोठी सूट

नोकरदार ग्राहकांसाठी टोयोटाच्या खास ऑफर्स : EMI मध्ये मिळणार मोठी सूट

दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांसाठी मोठ्या सवलती

दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांसाठी मोठ्या सवलती

दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांसाठी मोठ्या सवलती

  • Published by:  Manoj Khandekar
नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : भारतात सणांचा कालावधी सुरु झाला आहे. विविध कंपन्या ग्राहकांसाठी ऑफर देत असून टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने देखील आपल्या ग्राहकांसाठी नवीन ऑफर आणली आहे. टोयोटाने आपल्या नोकरदार ग्राहकांसाठी ही ऑफर आणली असून खासगी क्षेत्रातील कर्मचारी आणि सरकारी कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. ग्राहकांना या योजनेमध्ये कर्जाच्या विविध ऑफर्स मिळणार आहेत. या ऑफरमध्ये ग्राहकांना खूप लाभ मिळणार असून सुरुवातीचे तीन महिने कोणताही हफ्ता भरायला लागणार नाही. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने घोषित केलेल्या नवीन योजनेनुसार, सरकारी नोकरदार या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. केंद्र सरकारने नुकत्याच घोषित केलेल्या या योजनेमध्ये सरकारी रोख  योजनेत कर्मचारी एलटीसी / एलटीएच्या रकमेचा वापर सणासुदीच्या खर्चांसाठी करू शकणार आहेत. यामध्ये एलटीसी / एलटीएला उपलब्ध असलेल्या आयकर सुटीच्या धर्तीवर कर्मचाऱ्यांना ही सूट दिली जाणार आहे. हे ही वाचा-केवळ 57,560 रुपयात खरेदी करा Heroची 'ही' बाईक, जाणून घ्या काय आहेत फीचर्स यामध्ये  12% आणि त्यावरील जीएसटी असणाऱ्या वस्तू आणि सेवांवर जास्त रक्कम खर्च करून कर्मचारी या कॅश पॅकेज स्कीमचा लाभ घेऊ शकणार आहेत. त्याचबरोबर ग्राहक हफ्त्यांचेदेखील विविध पर्याय निवडू शकणार आहेत. यामध्ये कमीतकमी व्याजदरांमध्ये चारचाकी गाडी खरेदी करता येणार असून कर्ज फेडीची मुदत देखील वाढवण्यात आली आहे. हफ्ते फेडण्यासाठी कंपनी सात वर्षांची मुदत देखील देत आहे. या योजनेविषयी बोलताना टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे विक्री विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट नवीन सोनी म्हणाले, सणासुदीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात गाड्या खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. त्याचबरोबर या कालावधीत विविध ऑफर्सदेखील मिळण्याची ग्राहकांना अपेक्षा असते. त्यामुळे आम्ही आमच्या विविध गाड्यांवर या ऑफर्स ठेवल्या असून नुकत्याच बाजारात आलेल्या टोयोटा अर्बन क्रूझरवर देखील ग्राहकांना ही ऑफर मिळणार आहे. याचबरोबर  Toyota Glanza आणि Toyota Yaris या गाड्यांवरदेखील ऑफर मिळणार आहे. त्याचबरोबर पगारदार ग्राहकांच्या हिताचा देखील आम्ही विचार करत असून हफ्त्यांमध्ये देखील सूट देणार आहोत. तसेच भारत सरकारचेदेखील त्यांनी आभार मानले असून केंद्र सरकारने उचललेल्या या पावलांमुळे ग्राहकांना दिलासा मिळणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
First published:

पुढील बातम्या