महानायकाच्या ताफ्यात नव्या देखण्या पाहुणीची भर; PHOTO पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

Big B अमिताभ बच्चन यांच्या ताफ्यात एक देखणी पाहुणी दाखल झाली आहे. मर्सिडीजनंतर आता त्यांनी Toyota Innova Crysta खरेदी केली आहे.

Big B अमिताभ बच्चन यांच्या ताफ्यात एक देखणी पाहुणी दाखल झाली आहे. मर्सिडीजनंतर आता त्यांनी Toyota Innova Crysta खरेदी केली आहे.

  • Share this:
    मुंबई, 18 डिसेंबर : बॉलिवूडचे महानायक, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या ताफ्यात आता आलिशान नव्या कार कलेक्शनमध्ये आता नव्या कारची भर पडली आहे. त्यांनी टोयोटा इनोव्हा क्रिस्टा (Toyota Innova Crysta) ही नवी गाडी खरेदी केली असून त्यांना नुकतीच या गाडीची डिलिव्हरी देण्यात आली. अमिताभ यांच्या ताफ्यात मर्सिडीज बेन्झ आहेच. आता या नव्या आलिशान गाडीची भर पडली आहे. टोयोटाने गेल्या महिन्यात इनोव्हा क्रिस्टाचं आधुनिक व्हर्जन लाँच केले होते. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी स्वतःसाठी इनोव्हा क्रिस्टा खरेदी केली. नुकतीच त्यांना या गाडीची डिलीव्हरी देण्यात आली. अमिताभ गाड्यांचे शौकिन आहेत. त्यांच्या कलेक्शनमध्ये अनेक आकर्षक कार्स आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत जम बसायला लागल्यानंतर त्यांनी अनेक कंपन्यांच्या वेगवेगळ्या गाड्या विकत घेतल्या आणि चालवल्याही. काहींनी त्यांना गाड्या भेटही दिल्या असतील. सध्या multi-purpose vehicles मागणी वाढली असून, या उद्देशानेच बच्चन यांनी या नवीन कारची निवड केली. याबाबत Instagram वर एक फोटो शेअर करण्यात आला असून त्यात अमिताभ बच्चन मुंबईतील घरी या नवीन गाडीची डिलिव्हरी स्वीकारताना दिसत आहेत. गाडीला पुढच्या बाजूला एक फुलांचा हार घातला आहे. ही डिलिव्हरी स्वीकारतानाही बच्चन यांनी चेहऱ्यावर मास्क लावला आहे. रेल्वे रुळावर पडणाऱ्या प्रवाशाचे जवानाने वाचवले प्राण; पाहा थरारक VIDEO इनोव्हा क्रिस्टाच्या या नव्या मॉडेलची किंमत 16.26 लाख आहे. तर एमपीव्हीच्या टॉप मॉडेलची किंमत 24.33 लाख रुपये आहे. टोयोटा इनोव्हा क्रिस्टा 2016 मध्ये लाँच करण्यात आली होती. त्यानंतर प्रथमच कंपनीने मॉडेल अपडेट केलं आहे. या मॉडेलमध्ये ग्रील्समध्ये बदल करण्यात आले असून फ्रंट डिझाइन अधिक आकर्षक करण्यात आलं आहे. या एमपीव्हीचे हेडलाईटस आता एलईडीचे असतील. सात पूरक एअरबॅग, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स आणि ब्रेक असिस्ट अशी नवी वैशिष्ट्यं या मॉडेलमध्ये आहेत. बोर्डाचा रिझल्ट हॉटेलमध्ये! सर्वात Viral मेन्यूकार्ड या कारमध्ये 2.4 लिटर डिझेल इंजिनचा पर्याय आहे. पेट्रोल व्हेरिएंटमधील मॉडेल्समध्ये 2.7 लिटर इंजिनचा पर्याय आहे. पेट्रोल प्रकारात ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय देण्यात आला आहे. नवीन इनोव्हा क्रिस्टामध्ये डॅशबोर्डवर अॅड्रॉईड ऑटो आणि अॅपल कारप्ले सपोर्टसह 8 इंचाचा टच स्क्रिन डिस्प्ले देण्यात आला आहे. यात प्रगत कनेक्टिव्हीटी सिस्टम देखील देण्यात आली आहे.
    First published: