कार घेताय? पाहा ऑगस्टमध्ये 'या' गाड्यांची झालीय सर्वाधिक विक्री

आर्थिक मंदीमुळे विक्रीत घट झाली आहे. विक्री वाढवण्यासाठी कंपन्या मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट देत आहेत.

  • Share this:

आर्थिक मंदीमुळं ऑटोमोबाइल उद्योग धोक्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये गाड्यांच्या विक्रीत घट झाली आहे. ऑगस्ट महिन्यात मारुती सुझुकीनं सर्वाधिक गाड्यांची विक्री केली आहे.

सर्वाधिक विक्री झालेल्या टॉप टेन गाड्यांमध्ये आठ गाड्या मारुती सुझुकीच्या आहेत. यात दहाव्या क्रमांकावर Maruti Suzuki Vitara Brezza ही कार आहे. गेल्या महिन्यात 7,109 गाड्यांची विक्री झाली.

नवव्या क्रमांकावर Maruti Suzuki Ertiga असून यामध्ये 8,391 गाड्यांची विक्री करण्यात आली.

मारुती सुझुकीच्या Eeco च्या 8,658 गाड्यांची विक्री गेल्या महिन्यात झाली. सर्वाधिक विक्री होण्याच्या यादीत ही आठव्या क्रमांकावर आहे.

ह्युंडाईच्या Venue या कारलाही लोकांनी पसंती दाखवली आहे. यातल्या 9,342 कारची विक्री झाली आहे.

सहाव्या क्रमांकावर ह्युंडाईच्या ग्रँड i10 Nios या 9,403 कारची विक्री झाली आहे. टॉप टेनमध्ये या दोनच कार ह्युंडाईच्या आहेत.

मारुती सुझुकीच्या आल्टो कारलासुद्धा ग्राहकांनी पसंती दर्शवली आहे. ऑगस्टमध्ये 10223 आल्टो कारची विक्री झाली आहे.

नेक्सा बलेनोच्या 11, 067 इतक्या कारची विक्री गेल्या महिन्यात झाली.

सर्वाधिक विक्री झालेल्या कारच्या यादीमध्ये मारुती सुझुकीच्या वॅगन आर कार तिसऱ्या क्रमांकावर आहे. वॅगन आरच्या 11,402 गाड्यांची विक्री ऑगस्टमध्ये झाली.

मारुती सुझुकीच्या स्विफ्ट गाडी विक्रीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑगस्टमध्ये 12,444 स्विफ्ट कार विकल्या गेल्या.

कारच्या विक्रीमध्ये मारुती सुझुकीच्या Dzire ने पहिले स्थान पटकावलं. ऑगस्ट महिन्यात 13,274 गाड्यांची विक्री झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2019 01:43 PM IST

ताज्या बातम्या