मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

70 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत तुम्ही या 5 मस्त स्कूटर खरेदी करू शकता

70 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत तुम्ही या 5 मस्त स्कूटर खरेदी करू शकता

भारतीय ग्राहक स्वस्त दुचाकी खरेदी करण्यास प्राधान्य देतात. सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये बसणाऱ्या अशाच काही स्कूटर्सबद्दल आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : भारत हे एक प्राइस सेंसिटिव ऑटोमोबाइल मार्केट आहे. येथे मायलेज आणि वाहनांची किंमत ही विक्रीमध्ये मोठी भूमिका बजावते. भारतात कार तसेच दुचाकी वाहनांसाठी मोठा ग्राहकवर्ग आहे. भारतीय ग्राहक स्वस्त दुचाकी खरेदी करण्यास प्राधान्य देतात. सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये बसणाऱ्या अशाच काही स्कूटर्सबद्दल आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत. हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा सीएक्स - या स्कूटरची सुरुवातीची किंमत 62,365 रुपये आहे. तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर शोधत असाल तर तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. स्कूटरची रेंज 82KM पर्यंत आहे. हिरोची ही स्कूटर सध्या इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. TVS स्कूटी पेप प्लस ही स्कूटर भारतीय बाजारपेठेत चांगलीच लोकप्रिय आहे. त्याची सुरुवातीची किंमत 61,751 रुपये आहे. स्कूटरमध्ये 87.8cc चे इंजिन आहे जे 5.36bhp पॉवर जनरेट करते. जर तुम्ही परवडणारी स्कूटर शोधत असाल तर तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. Hero Maestro Edge 110 तुम्ही ही स्कूटर 69,431 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकता. स्कूटरमध्ये 110.9cc इंजिन आहे जे 8bhp पॉवर जनरेट करते. जर तुम्हाला ICE इंजिन असलेली स्कूटर घ्यायची असेल, तर हिरो स्कूटर तुमच्यासाठी किफायतशीर पर्याय आहे. हे वाचा - डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत कापूर तेलाचे आहेत इतके फायदे; असा करा वापर ओकिनावा R30 ही इलेक्ट्रिक स्कूटर 61,417 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी केली जाऊ शकते. ही कमी गतीची इलेक्ट्रिक स्कूटर आहे जी दैनंदिन प्रवासासाठी उत्तम पर्याय आहे. दैनंदिन कामांसाठी याचा वापर करता येतो. हे वाचा - तुम्हीही ‘हेलिकॉप्टर पेरेंटिंग’ तर करत नाही ना? काय आहेत त्याचे फायदे आणि तोटे? हिरो इलेक्ट्रिक फ्लॅश या स्कूटरची सुरुवातीची किंमत 59,594 रुपये आहे. त्याचा टॉप स्पीड 25 किमी प्रतितास आहे. या स्कूटरने एका चार्जवर 85 किमी अंतर कापले जाऊ शकते. जी या किंमत स्लॉटमधील सगळ्यात चांगली श्रेणी आहे.
First published:

Tags: 5 budget bike, Electric vehicles

पुढील बातम्या