मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

या आहेत भारतात उपलब्ध असलेल्या Top 5 डिझेल कार्स; किफायती BS6 गाड्यांची फीचर्स

या आहेत भारतात उपलब्ध असलेल्या Top 5 डिझेल कार्स; किफायती BS6 गाड्यांची फीचर्स

अनेक कंपन्यांनी सध्या डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांचं उत्पादन थांबवलं आहे. पण Tata आणि Hundai च्या या काही गाड्या BS6 नॉर्म पूर्ण करत असताना खिशाचीही काळजी घेतात.

अनेक कंपन्यांनी सध्या डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांचं उत्पादन थांबवलं आहे. पण Tata आणि Hundai च्या या काही गाड्या BS6 नॉर्म पूर्ण करत असताना खिशाचीही काळजी घेतात.

अनेक कंपन्यांनी सध्या डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांचं उत्पादन थांबवलं आहे. पण Tata आणि Hundai च्या या काही गाड्या BS6 नॉर्म पूर्ण करत असताना खिशाचीही काळजी घेतात.

    मुंबई, 30 डिसेंबर : डिझेल गाड्या अधिक प्रदूषण करतात या कारणाने त्यातल्या अनेक BS6 च्या नियमांमध्ये बसत नाहीत. अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी डिझेल कार्सचं (Diesel Cars) उत्पादन बंद केलं असलं तरी टाटा मोटर्स (Tata Motors), ह्युंदाई (Hyundai) आणि फोर्ड (Ford) या कंपन्यांनी डिझेल कार्सचं उत्पादन सुरू ठेवलं असून, एप्रिलपासून लागू झालेल्या नव्या ‘BS 6’ (BS6)निकषांवर उतरणाऱ्या नव्या गाड्याही दाखल केल्या आहेत. डिझेल कारची खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना आता चांगले पर्याय उपलब्ध झाले आहेत. आम्ही फ्यूएल एफिशिअंट म्हणजे खिशाला परवडणाऱ्या डिझेल गाड्यांची फीचर्स खाली देत आहोत. या आहेत 5 Top Cars? ह्युंदाई ऑरा : Hundai AURA ही 1.2 लीटर डिझेल इंजिन असलेली कॉम्पॅक्ट सेदान कार आहे. एआरएआयनं (ARAI) प्रमाणित केल्यानुसार, ऑरा एएमटी (ऑटोमेटिक ट्रान्समिशन) कार प्रती लिटर 25.40 किलोमीटर मायलेज देते, तर मॅन्युअल मॉडेल 25.53 किलोमीटर मायलेज देते. ही अत्यंत इंधन कार्यक्षम (Fuel Efficient) कार असून तिची किंमत (एक्स शोरूम दिल्ली) 7.80 लाख ते 9.28 लाख रुपयांदरम्यान आहे. ह्युंदाई - Hyundai i20 ची ही तिसरी आवृत्ती. हॅचबॅक श्रेणीतील सध्या सर्वाधिक मागणी असलेली कार आहे. यामध्ये 1.5 लिटरचे फोर सिलेंडर टर्बो चार्जड डिझेल इंजिन असून, सिक्स स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअर बॉक्स आहे. ही कार प्रती लिटर 25.2 किलोमीटर मायलेज देते. या नवीन आय 20 कारची किंमत (एक्स शोरूम दिल्ली) 8.20 लाख ते 10.60 लाख रुपये आहे. मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, कारमध्ये 'हे' फिचर्स आता बंधनकारक! टाटा अल्ट्रॉझ : Hundai ची i20 कार दाखल होईपर्यंत देशातील सर्वाधिक इंधन कार्यक्षम डिझेल कारचं बिरूद टाटा मोटर्सकडे होतं. Tata altroz कार ही नवीन प्रीमियम हॅचबॅक कार मायलेजमधील चांगलं देते. अवघ्या 0.9 किलोमीटरच्या फरकानं तिचा हा मान hundai आय 20 कडं गेला. अल्ट्रॉझ प्रती लिटर 25.11 किलोमीटर मायलेज देते. यामध्ये 1.5 लिटरचे रीव्होटोर्ग इंजिन असून, यात फ़ाईव्ह स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअर बॉक्स आहे. अल्ट्रॉझची किंमत (एक्स शोरूम दिल्ली ) 6.99 लाख ते 9.09 लाख रुपये आहे. ह्युंदाई ग्रँड आय 10 एनआयओएस : Hyundai Grand i10 NIOS कारमध्ये 1.2 लिटरचे U2 सीआरडीआय इंजिन आहे. देशात उपलब्ध असणारी ही सगळ्यात लहान डिझेल इंजिनची कार आहे. यामध्ये तीन सिलेंडर 75 बीएचपी शक्तीचे इंजिन असून, यात फ़ाईव्ह स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअर बॉक्स आहे. ऑटोमेटिक ट्रान्समिशनमध्येही ही कार उपलब्ध असून पेट्रोल कार 25.1 लिटर मायलेज देते. डिझेल कारचे मायलेज अद्याप एआरआयनं प्रमाणित केलेलं नाही. या कारची किंमत (एक्स शोरूम दिल्ली ) 7.60 लाख ते 8.35 लाख रुपये आहे. महानायकाच्या ताफ्यात नव्या देखण्या पाहुणीची भर;PHOTO पाहून तुम्हीही पडाल प्रेमात ह्युंदाई वेर्ना : Hyundai Verna ही कार मिडसाईज सेदान श्रेणीतील एक उत्तम कार आहे. नवीन 115 बीएचपी शक्तीचे 1.5 लिटर क्षमतेचे इंजिन यात असून क्रेटा या कारमध्येही हेच इंजिन वापरण्यात आलं आहे. मॅन्युअल ट्रान्समिशन कार 25 किलोमीटर मायलेज देते, तर ऑटोमेटिक ट्रान्समिशन कार 21.3 लिटर मायलेज देते. या कारची किंमत (एक्स शोरूम दिल्ली ) 10.73 लाख ते 15.18 लाख रुपये आहे.
    First published:

    पुढील बातम्या