Home /News /auto-and-tech /

Maruti Suzuki च्या 'या' कारला मिळतेय सर्वाधिक पसंती; विक्रीत तब्बल 232 टक्क्यांनी वाढ

Maruti Suzuki च्या 'या' कारला मिळतेय सर्वाधिक पसंती; विक्रीत तब्बल 232 टक्क्यांनी वाढ

जे लोक 6 सीटस सोबत प्रीमियम फील (Premium Feel) असलेल्या एमपीव्हीतून प्रवास करु इच्छितात, त्यांना ध्यानात घेऊन या कारची निर्मिती करण्यात आली आहे.

    नवी दिल्ली, 22 जुलै: मारुती सुझुकी (Maruti Suzuki) हा भारतीय फोर व्हिलरप्रेमींचा (Four Wheeler) अत्यंत आवडता ब्रँड. फोर व्हिलर घेण्याचं स्वप्न पाहणारे अनेक जण स्वप्नपूर्तीसाठी मारुती सुझुकीला प्राधान्य देतात. दर्जेदार सुविधा, अनेक फिचर्स आदी कारणांमुळे फोर व्हिलर खरेदीदारांचा कल मारुती सुझुकीच्या गाड्यांकडे असतो. तुम्ही जर सध्या फोर व्हिलर आणि त्यातही मारुती सुझुकीचे एखादे मॉडेल खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. मारुती सुझुकीच्या एमपीव्ही (MPV) सेगमेंटमध्ये अर्टिगा आणि एक्सएल 6 (XL6) अशा दोन मॉडेल्सचा समावेश होतो. यात 6 सीटरच्या सेगमेंटमध्ये मारुती एक्सएल 6 (Maruti XL6) या गाडीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. अर्थात त्याचं कारण ही तसंच आहे. अत्यंत शानदार लुक, दमदार फिचर्स (Features) यामुळे या गाडीच्या विक्रीत मागील वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत 232 टक्क्यांनी घसघसशीत वाढ झाली आहे. या वाढीमागील नेमकी कारणं काय, या कारचे फिचर्स कसे आहेत याविषयी घेतलेला हा सविस्तर आढावा. मारुती एक्स एल 6 च्या एकूण वैशिष्ट्यांबाबत लाईव्ह हिंदुस्थानने वृत्त दिले आहे. आकर्षक लूक, चांगली स्पेस तसेच किफायतशीर मायलेज अशी या एमपीव्हीची ओळख. मारुती सुझुकीने एक्स एल 6 ही कार 2019 मध्ये बाजारात आणली. जे लोक 6 सीटस सोबत प्रीमियम फील (Premium Feel) असलेल्या एमपीव्हीतून प्रवास करु इच्छितात, त्यांना ध्यानात घेऊन या कारची निर्मिती करण्यात आली आहे. ही कार 6 व्हेरियंटमध्ये उपलब्ध असून त्यात एक पेट्रोल इंजिन आणि दोन ट्रान्समिशन गिअर बॉक्स आहेत. कंपनीने या गाडीच्या दुसऱ्या प्रकारात कॅप्टन सीटस (Captain seats) उपलब्ध करुन दिली आहेत. या कारची विक्री कंपनी नेक्सा (Nexa) डिलरशिपव्दारे करत आहे. या एमपीव्हीत मारुती अर्टिगाप्रमाणेच 1.5 लीटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन असून ते माइल्ड हायब्रीड तंत्राने सुसज्ज आहे. 105PS ची पॉवर आणि 138 Nm टॉर्क ते जनरेट करते. या कारमध्ये 5 स्पीट मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 4 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअर बॉक्स देण्यात आले आहेत. Petrol Pump Fraud: पेट्रोल पंपावर होणारी फसवणूक अशी टाळा, जाणून घ्या महत्त्वपूर्ण नियम कंपनीने ही कार Heartect या प्लॅटफॉर्मवर उत्पादित केली असून, यामुळे तिला नेक्सा सेफ्टी शिल्ड मिळते. या कारमध्ये EBD (इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन) सह ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, तसेच अॅण्टी ब्रेकिंग लॉक सिस्टीमचा (ABS) समावेश आहे. तसेच प्रीटेंन्शनर्स आणि फोर्स लिमीटरसह फ्रंट सीटबेल्ट, ISOFIX, हिल होल्ड असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलीटी प्रोग्रॅम (ESP), हाय स्पीड वॉर्निंग अलर्ट, ड्रायव्हर, को-ड्रायव्हर सीट बेल्ट रिमाईंडर आणि रिव्हर्स पार्किंग सेंसर देण्यात आला आहे. एक्सएल 6 या कारमधील इंटेरिअर ऑल ब्लॅक थीमचे आहे. डॅशबोर्ड, डोअर पॅड्स प्रीमियम स्टोन एक्सेंट आणि सिल्व्हर हायलाईटसने हायलाईट करण्यात आले आहेत. फिचर्सबाबत बोलायचे झाले तर क्रुझ कंट्रोल, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी (Smart Phone Connectivity), स्मार्ट प्ले स्टुडीओ, ऑटोमॅटीक हेडलॅम्प हे आधुनिकी फिचर्स या कारमध्ये आहेत. केवळ 49 रुपये प्रतिदिन EMI वर घरी घेऊन या ही टू-व्हीलर, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत मारुती एक्सएल 6 ही कार 6 कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. यात मेटॅलिक सिल्व्हर, मेटॅलिक मॅग्मा ग्रे, प्राइम ऑर्बन रेड, पर्ल ब्रेव्ह करडा, पर्ल आर्टिक व्हाईट आणि नेक्सा ब्लूचा समावेश आहे. मॅन्युएल ट्रान्समिशन कारची किंमत 9.94 ते 11.14 लाखांपर्यंत आहे. ऑटोमॅटीक व्हर्जनमध्ये 2 व्हेरियंट उपलब्ध असून, त्याची किंमत 11.14 लाख ते 11.73 लाखांपर्यंत आहे. या कारचा मॅन्युअल व्हेरियंट 17.99 किलोमीटर प्रतिलिटर तर अडव्हान्स व्हेरियंट 19.01 किलोमीटर प्रति लिटर असे मायलेज देते. मागील जून महिन्यात ही एमपीव्ही सर्वाधिक विक्री होणारी देशातील तिसरी कार ठरली. कंपनीने मागील जून महिन्यात 3978 युनिटस कारची विक्री केली असून मागील वर्षी जून महिन्यात झालेल्या विक्रीच्या तुलनेत ती 232 टक्के अधिक आहे. मागील वर्षी जून महिन्यात 1198 युनिटसची विक्री झाली होती. ही आकडेवारी पाहता ही कार लोकांच्या पसंतीस उतरत असल्याचे स्पष्ट होते.
    First published:

    Tags: Maruti suzuki cars, Tech news, Technology

    पुढील बातम्या