मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /Car Loan : कार लोन घेताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, फायदा होईल

Car Loan : कार लोन घेताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, फायदा होईल

कार खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला परतफेडीसाठी पेलवेल असं बजेट ठरवा. त्यानंतर, निश्चित केलेल्या बजेटमध्ये तुम्हाला कोणती गाडी खरेदी करता येऊ शकते याची चाचपणी करा.

कार खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला परतफेडीसाठी पेलवेल असं बजेट ठरवा. त्यानंतर, निश्चित केलेल्या बजेटमध्ये तुम्हाला कोणती गाडी खरेदी करता येऊ शकते याची चाचपणी करा.

कार खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला परतफेडीसाठी पेलवेल असं बजेट ठरवा. त्यानंतर, निश्चित केलेल्या बजेटमध्ये तुम्हाला कोणती गाडी खरेदी करता येऊ शकते याची चाचपणी करा.

  मुंबई, 21 नोव्हेंबर : कोविड-19 (COVID-19) महामारी सुरू झाल्यानंतर देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. या काळात कुणीही प्रवासासाठी बाहेर पडत नव्हतं. आता महामारीची तीव्रता काहीशी कमी झाली असून, लॉकडाऊन शिथिल करण्यात आलं आहे. त्यानंतर वाहन बाजारात तेजी आली आहे. कोरोनामुळे अनेक जण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा (public transport) वापर करणं टाळत आहेत. त्यामुळे कारच्या विक्रीमध्ये वाढ होताना दिसत आहे. अनेक जण कर्ज काढून कार खरेदी करत आहेत. कार विक्रीमध्ये वाढ होत असल्याचं पाहून विविध बँकांनीसुद्धा (Banks) आपल्या कार लोन (car loan) पोर्टफोलिओमध्ये बदल केले आहेत.

  तुम्हीसुद्धा कार खरेदी (Car Buying tips) करण्यासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. जास्तीत-जास्त फायद्यासह आणि सोप्या पद्धतीनं कर्ज उपलब्ध करून घ्यायचं असेल तर अगोदर विविध बँकांच्या कार लोनबाबत व्यवस्थित माहिती मिळवावी आणि त्यानंतरच कर्ज घेण्यासाठी अर्ज करावा. त्यापैकी काही गोष्टींची माहिती येथे देत आहोत.

  'Miss Kerala' विजेत्या अन् उपविजेत्या सौंदर्यवतींच्या कारला भीषण अपघात; दोघींचा जागीच मृत्यू

  कर्ज घेण्यापूर्वी बजेटचा विचार करा

  कार खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला परतफेडीसाठी पेलवेल असं बजेट ठरवा. त्यानंतर, निश्चित केलेल्या बजेटमध्ये तुम्हाला कोणती गाडी खरेदी करता येऊ शकते याची चाचपणी करा. कार खरेदी केल्यानंतर तिच्याशी निगडित इतर अनेक खर्च वाढतात. त्यामुळं कार खरेदीपूर्वी (Car Maintenance) कार विमा, पेट्रोल-डिझेल खर्च, दुरुस्ती खर्च, डेप्रिसिएशन इत्यादींचा विचार केला पाहिजे. अनेक जण या गोष्टींचा अजिबात विचार करत नाहीत, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे कार खरेदी केल्यानंतर त्यांना अचानक इतर खर्चांना तोंड द्यावं लागतं.

  या कारणामुळे केला आत्महत्येचा विचार, एका निर्णयाने बदललं Ileana D'Cruz चं आयुष्य

  क्रेडिट स्कोअर चांगला ठेवणं गरजेचं

  केवळ कारसाठीचं कर्जच नव्हे, तर कोणत्याही प्रकारचं कर्ज घेण्यासाठी चांगला क्रेडिट स्कोअर (Credit score) आवश्यक आहे. क्रेडिट कार्डची थकबाकी आणि इतर कर्जांची वेळेवर परतफेड केल्यानं तुमच्या क्रेडिट स्कोअरमध्ये भर पडते. चांगला क्रेडिट स्कोअर तुम्हाला स्वस्त आणि सुलभ कर्ज मिळवून देऊ शकतो. त्यामुळे क्रेडिट स्कोअर चांगला राखणं महत्त्वाचं आहे. कार लोन घेण्यापूर्वी या गोष्टीचा नक्की विचार करा.

  कुठली कार खरेदी करायची हे अगोदर ठरवा

  कार खरेदी करणं ही महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे. इतर लहान गोष्टींप्रमाणे कारची खरेदी वारंवार होत नाही. त्यामुळे कार खरेदी करण्यापूर्वी सर्वांगीण विचार करणं आवश्यक आहे. योग्य दरामध्ये सर्वोत्तम कार कशी मिळवता येईल, याची पाहणी केली पाहिजे. ग्राहकानं त्यांच्या गरजेनुसार कारची निवड करावी, असं तज्ज्ञांचं मत आहे. एखादी लोकप्रिय, महागडी कार आपल्याकडं असावी, असं काहींना वाटतं; मात्र अशा कारची त्यांना आवश्यकता असतेच असं नाही. कंपनीच्या एखाद्या चांगल्या ऑफरमध्ये सामान्य फीचर्सची कार मिळत असेल तर ती निवडण्यास काही हरकत नाही. असं केल्यास तुम्ही कमी कर्जात कार खरेदी करू शकता. यामुळे तुमच्या डोक्यावरचा ईएमआयचा बोजा नक्कीच कमी होईल.

  डाउन पेमेंट जास्त असल्याचा होतो फायदा

  कर्ज घेऊन कार खरेदी करताना डाउनपेमेंटला खूप महत्त्व आहे. डाउनपेमेंट (Down payment) जितकं जास्त असेल तितका तुम्हाला कमी ईएमआय भरावा लागेल. जास्त डाउनपेमेंटमुळे कर्जाचं मुद्दल आणि व्याज दोन्हीही कमी होतं. कर्जाची शिल्लक रक्कम कमी असेल तर मासिक हप्तासुद्धा कमीच भरावा लागेल.

  कर्जाची मुदत कमी ठेवा

  सहसा बँका कार कर्जाचा कालावधी जास्त ठेवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे तुमचा ईएमआय कमी होईल, असं बँकांचं म्हणणं असतं. ही गोष्ट खरीदेखील आहे; मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, की ईएमआय कमी असला तर तुम्हाला दीर्घ काळासाठी कर्जाचे हप्ते भरावे लागतात. या काळात त्यावरचं व्याज वाढत जातं. म्हणजेच तुम्हाला बँकेला जास्त पैसे द्यावे लागतात. याउलट कर्जाचा कालावधी कमी असेल, तर मुद्दल आणि व्याज कमी भरावं लागतं.

  वेळच्या वेळी ईएमआय भरा

  कर्ज घेतल्यानंतर वेळेवर ईएमआय भरण्याची जबाबदारी तुमचीच असते, ही गोष्ट लक्षात ठेवा. वेळवर ईएमआय भरल्यामुळं तुमचा क्रेडिट स्कोअर तर सुधारेलच याशिवाय एक ग्राहक म्हणून बँकेशी तुमचे चांगले संबंध राहतील. ग्राहकांनी कर्जाच्या बाबतीत शिस्तबद्ध दृष्टिकोन अवलंबला पाहिजे, असं तज्ज्ञांचं मत आहे. डोक्यावरचं कर्ज लवकरात लवकर उतरणं कधीही चांगलं असतं.

  तुम्हाला एखाद्या बँकेकडून कार लोन घेऊन कार खरेदी करण्याची इच्छा असेल तर वर सांगितलेल्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो.

  First published:

  Tags: Car, Loan, Money