Home /News /auto-and-tech /

'या' प्रसिद्ध YouTuber कडे आहेत कोट्यावधींच्या लग्झरी कार; परंतु वापरण्यास आहे मनाई, काय आहे कारण?

'या' प्रसिद्ध YouTuber कडे आहेत कोट्यावधींच्या लग्झरी कार; परंतु वापरण्यास आहे मनाई, काय आहे कारण?

जगात महागड्या गाड्यांची (Luxuries Cars) आवड असलेले कित्येक लोक आहेत. या गाड्या विकत घेऊन चालवण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र, तुम्ही कधी अशा कोणाला पाहिलंय जो केवळ या गाड्या विकत घेतो, मात्र त्या चालवू शकत नाही?

     मुंबई, 16 जून- : जगात महागड्या गाड्यांची (Luxuries Cars) आवड असलेले कित्येक लोक आहेत. या गाड्या विकत घेऊन चालवण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र, तुम्ही कधी अशा कोणाला पाहिलंय जो केवळ या गाड्या विकत घेतो, मात्र त्या चालवू शकत नाही? अमेरिकेतील डोनाल्ड डावर (Donald Dougher) हा युट्युबर जगभरात प्रसिद्ध आहे. त्याच्याकडे अब्जावधींच्या महागड्या गाड्या आहेत, मात्र त्या चालवण्याची परवानगी त्याला नाही. डोनाल्ड हा अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहरात राहतो. 2019 साली त्याने आपले यूट्युब चॅनल सुरू केलं होतं. सध्या त्याच्या यूट्युब चॅनलचे (Donald Dougher youtube) सहा मिलियनहून अधिक सबस्क्रायबर आहेत. सोबतच, इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवरदेखील (Donald Dougher Instagram) त्याला लाखो फॉलोअर्स आहेत. लाईफस्टाईल, प्रँक्स आणि कार्स अशा गोष्टींवर तो व्हिडिओ तयार करतो. डोनाल्ड सोशल मीडियाच्या माध्यमातून दर महिन्याला सुमारे 20 हजार पाउंड्स कमवतो. म्हणजेच, त्याचं मासिक उत्पन्न (Donald Dougher income) सुमारे 20 लाख रुपये आहे. तर डोनाल्डकडे असलेल्या एकूण गाड्यांची किंमत ही 100 कोटी रुपयांहून अधिक आहे. कोट्यवधींच्या गाड्यांचा मालक डोनाल्डच्या कार कलेक्शनमध्ये बुगाटी चिरॉन आणि फेरारीची ला फेरारी अशा महागड्या गाड्यांचा समावेश आहे. बुगाटीची चिरॉन ही त्या कंपनीच्या 110व्या वर्धापनदिनानिमित्त बनवण्यात आली होती. या मॉडेलच्या केवळ 110 गाड्या उपलब्ध आहेत. या गाडीचे डिझाईन फ्रान्सच्या राष्ट्रध्वजातील रंगांशी मिळतेजुळते आहे. अवघ्या 2.4 सेकंदात ही गाडी 0 ते 62 मैल प्रतितास एवढा वेग पकडू शकते. या गाडीचा टॉप स्पीड 260 मैल प्रतितास एवढा आहे. या गाडीची किंमत सुमारे 3.3 मिलियन पाउंड, म्हणजेच 31 कोटी रुपये आहे. (हे वाचा:'ही' नवी इलेक्ट्रॉनिक स्कूटर ठरतेय अनेकांची पहिली पसंत; काय आहे खास?) डावरच्या कलेक्शनमध्ये (Donald Dougher Cars) असलेली फेरारी ला फेरारी हे एक हायब्रिड मॉडेल आहे. यामध्ये असलेली इलेक्ट्रिक मोटर या गाडीला टॉप स्पीडपर्यंत पोहोचायला मदत करते. या गाडीचा टॉप स्पीड 217 मैल प्रतितास एवढा आहे. या गाडीची किंमत सुमारे 1 मिलियन पाउंड, म्हणजेच सुमारे 9 कोटी रुपये आहे. सोबतच, त्याच्याकडे एक पगानी हुआयरा रोडस्टरदेखील आहे. यामध्ये असलेले V12 इंजिन हे 753 BHP एवढी पावर जनरेट करतं. या गाडीचा टॉप स्पीड 210 मैल प्रतितास आहे. सुमारे 21 कोटी रुपयांची ही गाडी आहे. यासोबतच आणखी काही महागड्या गाड्या डोनाल्डकडे (Donald Dougher car collection) आहेत. यामुळे चालवू शकत नाही आपल्याच गाड्या (हे वाचा:तुमच्या आवडत्या YouTube वर सर्वांत पहिला कोणता Video केला होता अपलोड?, पुन्हा होतोय Viral ) स्वतःच्या मालकीच्या गाड्या असूनही डोनाल्ड त्या चालवू शकत नाही. याला कारण म्हणजे, तो अवघ्या 15 वर्षांचा आहे. कॅलिफोर्नियातील नियमांनुसार, ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी किमान 16 वर्षे वय असावं लागतं. या वयात डोनाल्डकडे स्वत:च्या मालकीच्या अब्जावधी रुपयांच्या गाड्या आहेत हे जगातलं नवलंच म्हणावं लागेल. सध्या तरी त्याला या गाड्या चालवता येत नसल्या, तरी पुढच्या वर्षी नक्कीच त्याचं वय ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी पात्र ठरेल आणि तो या कार चालवू शकेल.
    First published:

    Tags: Technology, Viral news

    पुढील बातम्या