Home /News /auto-and-tech /

बांबू व फायबर कार्बनपासून तयार केली प्रसिद्ध ई-सायकल; जाणून घ्या या सायकलची वैशिष्टे आणि किंमत

बांबू व फायबर कार्बनपासून तयार केली प्रसिद्ध ई-सायकल; जाणून घ्या या सायकलची वैशिष्टे आणि किंमत

आता देशात एक नव्या साच्याची सायकल उपलब्ध होत आहे. बांबू (Bamboo) आणि कार्बन फायबरपासून (Carbon Fiber) या सायकलींची फ्रेम तयार केली आहे. या सायकली पर्यावरण पूरक असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

    नवी दिल्ली, 13 जून: सर्वसाधारणपणे आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सायकली (Cycles) या स्टिल पासून (Steel) तयार केलेल्या असतात. सध्या बाजारात अशा सायकलींचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. व्यायामासाठी उत्तम पर्याय म्हणून या सायकलींना मागणी देखील चांगली आहे. परंतु, आता देशात एक नव्या साच्याची सायकल उपलब्ध होत आहे. बांबू (Bamboo) आणि कार्बन फायबरपासून (Carbon Fiber) या सायकलींची फ्रेम तयार केली आहे. या सायकली पर्यावरण पूरक असल्याचा दावा कंपनीने केला आहे. अहमदाबाद (Ahmadabad) येथील लाईट स्पीड मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी प्रसिध्द ई-सायकल (E-Cycle) उत्पादक कंपनी आहे. या कंपनीने भारतात मेड इन इंडिया या अभियाना अंतर्गत इको-फ्रेंडली ई-सायकलची निर्मिती केली आहे. या ई-सायकली पूर्ण फ्रेम बांबू आणि कार्बन फायबर पासून बनवलेली आहे. ही ई-सायकल तुम्ही मोपेड (Moped) आणि सायकल अशा दोन्ही पध्दतीने चालवू शकता. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही ई-सायकल पर्यावरण संरक्षण आणि त्याचे महत्व अत्यंत सहजतेने समजते. कारण या सायकलच्या फ्रेममध्ये बांबू आणि कार्बन फायबरचा वापर केला आहे. जाणून घेऊया या ई-सायकलची वैशिष्ट्ये... हे ही वाचा-धक्कादायक! Facebook वरून हेरली जात आहेत देहविक्रयासाठी मुलं ई-सायकलचे वजन केवळ 15 किलोग्रॅम लाईटस्पीड मोबिलिटी प्रायव्हेड लिमिटेड कंपनी आपल्या उत्पादनांची निर्मिती Bamboochi या नावाने करते. या सायकलची फ्रेम बांबू आणि कार्बन फायबरपासून तयार केली जातात, हे या कंपनीचे खास वैशिष्ट म्हणता येईल. स्टिलच्या तुलनेत बांबू हे अधिक मजबूत आणि हलके असतात. त्यामुळे Bamboochi च्या सर्व सायकलींचे वजन अन्य सायकलींच्या तुलनेत हलके असते. Bamboochi ई-सायकलची रेंज 70 किलोमीटर या ई-सायकलमध्ये कंपनीने एक पोर्टेबल लिथियम आयर्न बॅटरी (Battery) दिलेली आहे. ही बॅटरी सिंगल चार्जमध्ये ई-सायकलला 70 किलोमीटर अंतरापर्यंत जाण्याची क्षमता देते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या ई-सायकलची किंमत 1 लाख 50 हजार रुपये अशी ठेवण्यात आली आहे. ही सायकल प्रामुख्याने परदेशात विक्रीसाठी उत्पादित केली गेली आहे. युरोपियन देशांमध्ये अशा ई-सायकल्सला मोठी मागणी आहे. Bamboochi च्या या सायकल्स देखील बाजारात आहेत उपलब्ध लाईटस्पीड मोबिलिटी प्रायव्हेड लिमिटेड कंपनी सध्या 5 प्रकारच्या सायकलींची निर्मिती करते. यामध्ये GLYD,WHIZ,DRYFT, RUSH आणि FURY या प्रकारांचा समावेश आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार,या सर्व इलेक्ट्रीक सायकल्समध्ये देखील बांबू आणि कार्बन फायबरचा वापर केला जात आहे. या सायकलींची किंमत 13,000 रुपयांपासून ते 25,000 रुपयांपर्यंत आहे. सिंगल चार्जिंग मध्ये या सायकली 35 ते 100 किलोमीटर पर्यंतचे अंतर कापू शकतात.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या