मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /टेंशन संपलं! आता वर्षातून एकदाच करा मोबाइल रिचार्ज; या कंपन्या देतायेत Best Offer

टेंशन संपलं! आता वर्षातून एकदाच करा मोबाइल रिचार्ज; या कंपन्या देतायेत Best Offer

प्रत्येक महिन्याला मोबाइल रिचार्ज करा किंवा त्याचं बिल भरा हे अनेकदा तापदायक ठरलं. एअरटेल, जिओ, BSNL, VI या कंपन्यांनी नवनव्या ऑफर आणत्या आहेत. पाहा कोणत्या तुम्हाला परवडतील...

प्रत्येक महिन्याला मोबाइल रिचार्ज करा किंवा त्याचं बिल भरा हे अनेकदा तापदायक ठरलं. एअरटेल, जिओ, BSNL, VI या कंपन्यांनी नवनव्या ऑफर आणत्या आहेत. पाहा कोणत्या तुम्हाला परवडतील...

प्रत्येक महिन्याला मोबाइल रिचार्ज करा किंवा त्याचं बिल भरा हे अनेकदा तापदायक ठरलं. एअरटेल, जिओ, BSNL, VI या कंपन्यांनी नवनव्या ऑफर आणत्या आहेत. पाहा कोणत्या तुम्हाला परवडतील...

नवी दिल्ली, 16 जानेवारी : प्रत्येक महिन्याला मोबाइल रिचार्ज करा किंवा त्याचं बिल भरा हे अनेकदा तापदायक ठरलं. त्यात एका व्यक्तीकडे दोन दोन मोबाइल असल्याने त्या दोन्ही मोबाइल रिचार्ज करावी लागतात. मात्र नवीन वर्षात एअरटेल (AIRTEL), बीएसएनल (BSNL), जियो (JIO) आणि वी(VI) यांनी वर्षभराच्या रिचार्जसह ग्राहकांना अधिक फायदा मिळवून देण्याची घोषणा केली आहे.

एअरटेलची नवी ऑफर

एअरटेलने वर्षभराच्या वॅलिडिटीसाठी तीन वेगवेगळे प्लान आणले आहेत. एयरटेलच्या 1498 या प्लानमध्ये ग्राहकांना वर्षभराची VALIDITY सोबत आउटगोइंग आणि इनकमिंग फ्रीमध्ये मिळतील. याशिवाय इनकमिंग फ्री मिळेल आणि 24 जीबी डेटा आणि 3600 एसएमएसचा प्लान मिळेल. वर्षभराच्या वॅलिडिटीसोबत एयरटेलने एक आणखी प्लान सादर केला आहे. ज्यात ग्राहकांना मोफत कॉलिंगसोबत दररोज 2 जीबी डेटा मिळेल आणि दररोज 100 SMS देखील मिळतील. एअरटेलच्या 2698 प्लानमध्ये मोफत कॉलिंगसह वर्षभराची वॅलिडीटीसोबत रोज 2 जीबी डेटा मिळेल. सोबतच डिज्नी आणि हॉटस्टारचा व्हीआयपी सबस्क्रिप्शन देखील 1 वर्षांसाठी मिळेल. जिओची ऑफर फायदेशीर

जिओच्या एक वर्षाच्या वॅलिडीटी प्लानची किंमत 2121 रुपये आहे. ज्यामध्ये ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा, विनामूल्य कॉलिंग, 100 एसएमएस आणि सर्व जिओ अॅप्लिकेशनचं सबस्क्रिप्शन मिळेल. जिओने दररोजच्या 2 जीबी डेटा प्लानची किंमत 2399 रुपये ठेवली आहे. या योजनेत, ग्राहकांना सर्व नेटवर्कवर विनामूल्य कॉलिंग मिळेल आणि दररोज 100 एसएमएससह जिओच्या सर्व अॅप्लिकेशनचं सबस्क्रिप्शन मिळेल. जिओच्या 2599 योजनेत दररोज 2 जीबी डेटासह डिस्नी आणि हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन मिळेल. 4999 च्या योजनेत 360 दिवसांच्या वॅलिडीटीसह ग्राहकांना संपूर्ण वर्षासाठी 350 जीबी डेटा मिळेल.

हे ही वाचा-सावधान! तुम्हालाही हा मेसेज आलाय का? गृह मंत्रालयाकडून फसवणुकीबाबत अलर्ट जारी

VI च्या नवीन रिचार्ज कूपनमध्ये ग्राहकांना फायदा

VI च्या 1499 या प्लानमध्ये एक वॅलिडीटी आणि 24 जीबी डेटा मिळेल. त्यासह VI चित्रपट आणि टीव्ही सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध असतील. VI च्या 2399 च्या प्लानमध्ये डेटा रोलओव्हरचा फायदा आठवड्याच्या शेवटी 1.5 जीबी डेटासह मिळू शकेल. याशिवाय झोमॅटोवर जेवणाच्या ऑर्डरवर दिवसाला 75 रुपयांची सूटही मिळणार आहे.

VI कंपनीने बाजारात 2599 रुपये किंमतीचा आणखी एक प्लान बाजारात आणला आहे. या प्लानमध्ये एक वर्षाची वॅलिडीटी, विनामूल्य कॉलिंग, दररोज 2 जीबी डेटा, आठवड्याच्या शेवटी डेटा रोलओव्हर आणि 5-जी सबस्क्रिप्शनचा समावेश आहे

बीएसएनएलची बंपर ऑफर

अवघ्या 365 रुपयांचा हा प्लॅन असून, 365 दिवसांसाठी म्हणजेच एक वर्ष त्याची वैधता (Validity) आहे. या प्लॅनमध्ये अमर्याद कॉलिंगची (Unlimited Calling) सुविधा आहे. कॉम्बो रिचार्ज पॅकसह हा प्लॅन उपलब्ध असून, दहा जानेवारीपर्यंत यात सुरुवातीच्या 60 दिवसांसाठी दररोज 250 मिनिटं दिली जात होती. आता ही मर्यादा हटवण्यात आली आहे. आता सर्व बीएसएनएल प्लॅनमध्ये देशभरातील ग्राहकांना एफयुपी मर्यादेशिवाय, अमर्याद व्हॉईस कॉलची सवलत देण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळतो. हा डेटा संपल्यावर ग्राहकांना 80 केबीपीएस स्पीडने डेटा मिळेल. तसंच या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएसची सुविधा आहे.

First published:

Tags: Mobile