मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

फक्त 12 रुपयांमध्ये 60 किमी प्रवास, ही आहे पुण्यात तयार झालेली 'साथी स्कूटर'!

फक्त 12 रुपयांमध्ये 60 किमी प्रवास, ही आहे पुण्यात तयार झालेली 'साथी स्कूटर'!

या स्कूटरमध्ये  BLDC मोटर आणि 48V 26 Ah Li-ion बॅटरी दिली आहे. ही स्कूटर एकदा फूल चार्ज केल्यावर 60-70 किलोमीटर प्रवास करू शकते.

  • Published by:  sachin Salve

पुणे, 04 ऑगस्ट : भारतीय ऑटो इंडस्ट्रीमध्ये आता मोठा प्रमाणात इलेक्ट्रिकल वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे नवनवीन इलेक्ट्रिक कंपन्या दमदार बाइक आणि स्कूटर लाँच करत आहे.

Techo Electra ने आपली एक नवी कोरी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. Techo Electra Saathi असं मॉडेलचे नाव आहे. Saathi ही स्कूटर पुण्यामध्ये तयार करण्यात आली आहे. अस्सल भारतीय कंपनीने ही स्कूटर तयार केली आहे.

Techo Electra Saathi इलेक्ट्रिक मोपेडची किंमत 57,697 रुपये ऑन-रोड पुण्यातील किंमत आहे. जर तुम्हाला ही स्कूटर हवी असेल तर तुम्ही कंपनीची वेबसाईट www.techoelectra.com वर जाऊन बाइक बूक करू शकता. Saathi ची डिलेव्हरी सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे.  बाजारात या स्कूटरचा सामना थेट Gemopai Miso शी होणार आहे.

Techo Electra Saathi मध्ये एलईडी हेडलाइट्स, सेंट्रल लॉकिंग सिस्टम, अँटी-थेफ्ट अलार्म, स्मार्ट रिपेअर फंक्शन, फ्रंट आणि रियर बास्केट आणि फास्ट चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे. तसंच Saathi मध्ये टेलेस्कोपिक सस्पेंशन, ब्लॅक अलॉय व्हिल, 10-इंच ट्युबलेस टायर आणि ड्रम ब्रेक दिले आहे. या स्कूटरवर 3 वर्षांची वारँटी देण्यात आली आहे.

या स्कूटरमध्ये  BLDC मोटर आणि 48V 26 Ah Li-ion बॅटरी दिली आहे. ही स्कूटर एकदा फूल चार्ज केल्यावर 60-70 किलोमीटर प्रवास करू शकते.

पण, या स्कूटरची बॅटरी फूल चार्ज होण्यासाठी 3 ते 4 तासांचा वेळ घेते. स्कूटरमधील चार्जरवर 1.5 वर्षांची वारंटी देण्यात आली आहे.

ही बॅटरी चार्ज करण्यासाठी फक्त 1.5 वीजेचे युनिट खर्च होईल, त्यामुळे 12 रुपये खर्च करून तुम्ही 60 किलोमीटर आरामात प्रवास करू शकता, असा दावा कंपनीने केला आहे.

या बाइकचा टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रतितास इतका आहे. ही स्कूटर  स्टील-रेनफोर्स्ड चेसिसवर तयार करण्यात आली आहे.

First published:

Tags: Petrol