मुंबई, 16 नोव्हेंबर: काही दिवसांपूर्वी भारतामध्ये लाँच झालेली टाटा नेक्सन इव्ही (Tata Nexon EV) भारतामध्ये बनवलेल्या सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रिक वाहनांपैकी एक आहे. या गाडीचे आम्ही तुम्हाला काही फीचर्स सांगणार आहोत.
1)फीचर लोडेड
टाटा नेक्सन ईव्ही देशातील पहिली स्वदेशी विकसित इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. यात पॉवर सनरुफ, लेदरेट सीट, फॉलो-मी-होम फीचरसोबत ऑटो हेडलॅम्प्स, उत्कृष्ट ऑडिओ परफॉरमन्ससाठी 7 इंचाची हर्मन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 7 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे.
2)खिशाला परवडेल अशी किंमत
टाटा नेक्सन ईव्हीने ह्युंदाई कोना ईव्ही आणि एमजी झेडएस इव्हीला किंमतीच्या बाबतीत मागे टाकले आहे. टाटा नेक्सन एव्हीची किंमत 13.99लाख ते 16.25 लाखांच्यामध्ये आहे.
3)संरक्षण
या दमदार इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये ड्युअल एअरबॅग्स, एबीएससोबत ईबीडी, कॉर्नर स्टेबिलिटी कंट्रोल आणि अपघातादरम्यान प्रवाशांचे संरक्षण करण्यासाठी मजबूत बॉडी देण्यात आली आहे. तसंच सुरक्षा उपकरणांचा समावेश आहे. कारमध्ये एक आयपी 67 कॉम्प्लेंट बॅटरी आणि मोटरदेखील आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, टाटा नेक्सन ईव्हीची तपासणी भारतातील सर्वात कठीण प्रदेशांमधील 10 लाख कि.मी.पर्यंत केली गेली आहे, ज्यामध्ये उंचीवर असलेले रस्ते, कच्चे रस्ते, सरळ ग्रेडियंट्स आणि अत्यंत तीव्र हवामान परिस्थितीचा या गाडीची चाचणी करण्यात आली आहे.
4)चार्जिंग अनुभव
नेक्सन ईव्हीमध्ये फास्ट चार्जिंग क्षमता आहे. ज्यानुसार बॅटरीला CCS2 फास्ट चार्जर वापरुन 0-80 टक्के चार्ज व्हायला 60 मिनिटे लागतात. ग्राहकांना एक विनामूल्य होम चार्जर इन्स्टॉलेशन आणि 24x7 इमरजेन्सी चार्जिंग सपोर्टदेखील मिळते. टाटा पॉवरबरोबर भागिदारी करून टाटा मोटर्सला भारतातील सर्वात मोठ्या सार्वजनिक चार्जिंग नेटवर्कचा लाभ मिळतो. तसेच ऑफरमध्ये बॅटरी पॅकसाठी 8 वर्षाची किंवा1.60 लाख किमीची वॉरेंटी मिळते.
5)360-डिग्री ऍपरोच
टाटा मोटर्स हे टाटा पॉवर, टाटा केमिकल्स, टाटा ऑटोकॉम्प, टाटा मोटर्स फायनान्स आणि क्रोमा यांच्यासोबत टाटा ग्रुपच्या इतर कंपन्यांसोबत कार्यरत आहेत. ज्या एकत्र येऊन एक ई-मोबिलिटी इकोसिस्टीम, “Tata uniEVerse” तयार करतात. याचाच भाग म्हणून, ग्राहकांना चार्जिंग सोल्यूशन्स, रिटेल अनुभव आणि फायनान्शियल ऑप्शन्ससह अनेक ई-मोबिलिटी अशा सुविधा मिळतात. अॅक्टिव्ह केमिकल्स मॅनिफॅक्चरिंग आणि बॅटरी रिसायकलिंगचा शोध घेण्याव्यतिरिक्त टाटा मोटर्स लिथियम-आयन बॅटरी सेल्स तयार करण्यासाठी टाटाने केमिकल्सबरोबरही करार केला आहे. टाटा मोटर्स फायनान्सद्वारे देऊ केलेल्या नेक्सन ईव्हीसाठी परवडणारी फायनान्सिंग सोल्यूशन्स सादर करणे हे देखील त्यांचे एक वैशिष्ट्य आहे. भारतीय ग्राहकांना एंड-टू-एंड इव्ही इकोसिस्टीम देणारी करणारी टाटा मोटर्स ही भारतातील एकमेव इव्ही उत्पादक कंपनी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car