TATA लवकरच लाँच करणार नवी SUV Blackbird; 'ही' आहेत फीचर्स आणिक किंमत

Tataची ही कार हुंडई क्रेटाला देणार टक्कर

News18 Lokmat | Updated On: May 10, 2019 02:44 PM IST

TATA लवकरच लाँच करणार नवी SUV Blackbird; 'ही' आहेत फीचर्स आणिक किंमत

नवी दिल्ली, 10 मे : Tata Motors (टाटा मोटर्स) ही भारतातली सर्वात मोठी कार निर्माती कंपनी लवकरच नवी कॉम्पॅक्ट SUV कार लाँच करणार आहे. टाटाने या SUV ला ब्लैकबर्ड (Blackbird) असं नाव दिलं आहे. ही कॉम्पॅक्ट SUV तयार करताना टाटा कंपनी चीनच्या SUV Chery Tiggo चा बेंचमार्क म्हणून उपयोग करत आहे. Chery ने सद्या टाटा मोटर्ससोबत 50:50 असं जॉईंट व्हेंचर केलं आहे. टाटा ची ही कार हुंडई क्रेटा ला टक्कर देणार असं म्हटलं जात आहे.

अशी राहणार किंमत - Tata Blackbird ही कार Altroz प्रमाणेच ALPHA आर्किटेक्चरवर आधारित असणार आहे. SUV ची किंमत 10-15 लाख दरम्यान राहू शकते. या कारच्या इंजिनचे डिटेल्स अद्याप समोर आलेले नाहीत. मात्र टाटाचं हे मॉडेल पेट्रोल आणि डिझल या दोन्ही ऑप्शमध्ये लाँच केलं जाऊ शकतं.


BMW ने भारतात लाँच केली MINI JCW; किंमत असेल इतकी


Loading...

TATA चे आणखी काही मॉडेल होणार लाँच - टाटा मोटर्सने याच वर्षात पार पडलेल्या 'जिनेव्हा मोटर-शो'मध्ये आणखी काही नवे मॉडेल्स ठेवले होते. ते सर्व भारतीय बाजारपेठेत लाँच होणार आहेत. यामध्ये 'हॅरियर'चं 7 सीटर व्हर्जन, Altroz हॅचबॅक आणि H2X कॉन्सेप्ट यांचा समावेश आहे. टाटा भारतात एक नवी मायक्रो​SUV सुद्धा लाँच करणार आहे. त्यानंतर टाटाची प्रत्येक सेगमेंट मायक्रो, सब कॉम्पॅक्ट आणि मिड साइज मध्ये एक SUV राहणार आहे. तर उर्वरित कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये ब्लॅकबर्ड असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2019 02:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...