नवी दिल्ली, 3 डिसेंबर : या आणीबाणीच्या कोव्हिड-19 (Covid-19) च्या काळात सुरक्षा आणि सावधगिरी बाळगण्यासाठी अनेक उत्पादकांनी बरीच पावले उचलली आहेत. ऑनलाईन खरेदीद्वारे (Online Shoping) स्वच्छता, कॉन्टॅक्टलेस खरेदी यासारख्या नवीन फीचर्सची सुरुवात करून त्यांनी झेप घेतली आहे. अशा प्रकारच्या सुरक्षा उपायांमध्ये टाटा मोटर्सने खबरदारीचा उपाय भलत्याच स्तरावर नेला आहे. हे होमग्रोन ऑटोमेकर आता प्लास्टिकच्या आवरणामध्ये पूर्णपणे स्वच्छ केलेल्या नवीन कार्स डिलिव्हर करणार आहेत.
टाटा मोटर्सने (Tata Motors) यापूर्वीच त्यांच्या 'सेफ्टी बबल' नावाच्या अनोख्या सेफ्टी सेटअपमध्ये त्यांच्या कार आणि एसयूव्हीची डिलिव्हरी करायला सुरवात केली आहे. नवीन फीचर्स म्हणजे कारचा बॅक्टेरिया आणि व्हायरसपासून बचाव करण्यासाठी आणखी एक पाऊल. कंपनीने मायक्रोब्लॉगिंग साइटवर टाटा मोटर्सच्या सॅनिटाईज्ड फोटोज आणि व्हिडिओ क्लिप्स शेअर केल्या. ट्विटमध्ये असा उल्लेख करण्यात आला आहे की ‘ हे पहा सेफ्टी बबल – सॅनिटाइज्ड बाय टाटा मोटर्स या आमच्या उपक्रमात आम्ही ही भर घातली आहे. जेणेकरून तुमची लाडकी कार आणि एसयूव्ही डीलरशीपमध्ये तुमची वाट पाहताना विषाणूंपासून सुरक्षित राहतील.’
हे ही वाचा-HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी! RBI ने थांबवल्या बँकेच्या डिजिटल सेवा
नवीन सेफ्टी बबल हे खरं तर डिलिव्हरी प्रक्रियेदरम्यान शारीरिक संपर्क कमी करण्यासाठी वाहनाभोवती संपूर्ण प्लॅस्टिकची पारदर्शक पिशवी आहे. सॅनिटाईज्ड बाय टाटा मोटर्स या उपक्रमाला ऑगस्ट २०२० मध्ये सुरुवात झाली त्यात त्यांनी या नव्या कल्पनेची भर घातली आहे. टाटा सेफ्टी बबल येत्या काही दिवसात टाटा डीलरशिपमध्ये पाहायला मिळेल. ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोजमध्ये असे दिसून आले आहे की टाटा टियागो हॅचबॅक सेफ्टी बबलच्या पारदर्शक प्लास्टिक पिशवीखाली ठेवली आहे, त्यामुळे सर्व बाजूंनी झाकली गेली आहे आणि डीलरशिपच्या बाहेर पार्क केलेली आहे.
आपल्या ग्राहकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कंपनीने इतरही पुढाकार घेतले आहेत. ऑगस्टच्या सुरुवातीला, यावर्षी या कारमेकरने आपल्या खरेदीदारांसाठी अनेक आरोग्य आणि स्वच्छता उपकरणे सुरू केली. उत्पादनांमध्ये एअर प्यूरिफायर आणि सॅनिटायझेशन किटचा समावेश आहे. एअर प्युरिफायर आत्तापर्यंत नेक्सन आणि हॅरियर मॉडेल्समध्ये इन्स्टॉल केले जाऊ शकतात. सॅनिटायझेशन किटमध्ये हँड सॅनिटायझर, N95 मास्क, हँड ग्लोव्हज, सेफ्टी टच की, पेपर टिश्यू बॉक्स आणि मिस्ट डिफ्यूझरचा समावेश आहे. या सुरक्षा उपायांचा समावेश कंपनीच्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांसोबत त्यांची सेल्स वाढवण्यात ही मदत करतो.