नवी दिल्ली, 11 जुलै : भारतीय कंपनी टाटा मोटर्स (Tata Motors) ने लॉकडाउन नंतर आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ग्राहकांना एकापेक्षा एक आकर्षक ऑफर आणल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच टाटा मोटर्सने six-month EMI holiday योजना लाँच केली आहे.
योजनेतून तुम्ही टाटाच्या मोजक्या गाड्या जसे टियागो, नेक्सॉन आणि अल्ट्रोज़ अगदी बजेटमध्ये खरेदी करू शकता. या गाड्यांवर तुम्हाला 6 महिने कोणताही EMI भरण्याची गरज नाही. सोबतच 5 वर्षांसाठी लोनमध्ये झिरो डाउन पेमेंट आणि ऑन-रोड किंमतचा 100 वा भाग फायनान्समध्ये सामील होईल.
एवढंच नाहीतर टाटा मोटर्सने आपल्या काही मॉडेलमध्ये जुलै महिन्यात 65 हजार रुपयांपर्यंत सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये टाटा मोटर्सची चांगली विक्री झाली.
ही ऑफर करूर वैश्य बँक (KVB) सोबत भागीदारी करुन लाँच करण्यात आली आहे. या ऑफरचा फायदा हा व्यवसायिक आणि पगारदारांना होणार आहे. एवढंच नाहीतर कंपनीकडून आठ वर्षांसाठी लोन देण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे ग्राहकावर कारच्या EMI भार पडणार नाही.
Six-month EMI holiday योजना - यामध्ये तुम्ही फक्त 5555 रु/महिना म्हणजे 185 रुपये प्रतिदिवस EMI वर Tata Altroz कार घरी घेऊन जाऊ शकता. त्याचबरोबर ही ऑफर Tata Nexon च्या 250 रुपये प्रतिदिवस आणि Tiago वर 166 रुपये प्रतिदिवस म्हणजे 4999 रुपये EMI वर ही कार खरेदी करू शकता. ही ऑफर फक्त Nexon, Altroz आणि Tiago देण्यात आली आहे.
झिरो डाउन पेमेंटवर कार खरेदी - टाटा मोटर्सने जर ग्राहकाला झिरो डाउन पेमेंटवर कार खरेदी करायची असेल तर तेही शक्य आहे. सोबतच तुम्हाला 6 महिन्यापर्यंत EMI मधून सूट देण्यात येणार आहे. म्हणजे, 6 महिन्यापर्यंत कोणताही EMI नाही, फक्त महिन्याला तुम्हाला व्याजाची रक्कम भरावी लागणार आहे.